मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांचेमार्फत भारतीय हवामान खात्याची दि. 31 मे 2020 रोजीचा धोक्याची सूचना नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागास प्राप्त झालेली आहे. या पत्रात ‘ Low pressure area over Southeast and adjoining Eastcentral Arabian Sea and Lakshadweep area: Pre-Cyclone Watch for south Gujarat-north Maharashtra coasts: The low pressure area over Southeast & adjoining East central Arabian Sea and Lakshadweep area persists. It is very likely to concentrate into a Depression over East central and adjoining Southeast Arabian Sea during next 24 hours and likely to intensify further into a Cyclonic Storm over East central Arabian Sea during the subsequent hours.
It is very likely to move nearly northwards initially till 02nd June Morning and then recurve north-northeastwards and reach near north Maharashtra and south Gujarat coasts around 03rd June Morning’ अशी धोक्याच्या सूचनेची माहिती आहे.
त्या अनुषंगाने, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच अग्निशमन केंद्रातील आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्याबाबत व आपत्कालीन कामाकरीता नेमलेले अधिकारी व कर्मचारी व नागरी कामांकरीता नियुक्त सर्व कर्मचारी / अधिकारी / कंत्राटदार / मजूर यांना सतर्क राहण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
भारतीय हवामान विभागने दि. 31 मे 2020 रोजी प्रसारीत केलेल्या संदेशाव्दारे Sea conditions will be rough to very rough along and off Maharashtra cost from 3rd June 2020 असे नमूद केलेले आहे. तसेच मच्छीमारांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वादळाचा धोका वाढण्याची शक्यता असताना, मासेमारी करणा-या नौकांनी समुद्रात मासेमारीसाठी जाणे अधिक धोक्याचे आहे. तसेच यापूर्वी समुद्रात मोसेमारीसाठी कार्यरत असलेल्या नौकांना तात्काळ सायंकाळपर्यंत वायरलेस किंवा मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधून बंदरात बोलविण्यात यावे अशा सूचना आहेत. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी हवामान खात्याच्या धोक्याच्या सूचनेच्या अनुषंगाने सतर्क रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment