Monday, June 1, 2020

कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक तो सर्व खर्च करावा लोकनेते आमदार गणेश नाईक यांची पालिका प्रशासनाला सूचना

नवी मुंबई प्रतिनिधी
कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक तो सर्व खर्च करून गोरगरीबांना उपचार उपलब्ध करून द्यावेत अशी सूचना लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या प्रशासकांना केली आहे.
लोकनेते आमदार नाईक यांनी सोमवारी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेतली. नवी मुंबईमध्ये कोरोना चा संसर्ग सुरू झाल्यापासून या महामारीवर प्रभावीपणे नियंत्रण करता यावे यासाठी पालिका प्रशासनाला त्यांनी वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत एकूण पंधरा सूचनापत्र त्यांनी आतापर्यंत महापालिका प्रशासनाला दिली आहेत. यासंदर्भात पालिका प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेण्यासाठी लोकनेते नाईक आयुक्त मिसाळ यांना भेटले. यावेळी त्यांच्यासोबत महापौर जयवंत सुतार,माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत,ज्येष्ठ नगरसेवक डॉ. जयाजी नाथ,स्थायी समिती सभापती नवीन गवते,नगरसेविका नेत्रा शिर्के,नगरसेवक सुरज पाटील,माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत,नगरसेविका शुभांगी पाटील आदी उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांना रायगड जिल्ह्याच्या हद्दीत   क्वांर टाइन सेंटरमध्येठेवण्यात आले असून हे उचित नसल्याचे लोकनेते नाईक यांनी या भेटीत प्रशासकांच्या निदर्शना स आणून दिले. या सेंटर मधील रुग्णांना पालिका रुग्णालयांमध्ये हलवावे. पालिका हद्दीमध्ये एमआयडीसी परिसरात अनेक रिकाम्या इमारती असून विद्युत जोडणी आणि इतर सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. या इमारती ताब्यात घेऊन त्याठिकाणी क्वांर टाइन सेंटर निर्माण करता येतील आणि नवी मुंबईतील नागरिकांवर नवी मुंबईतच उपचार करता येतील असेही ते म्हणाले लोकनेते नाईक यांनी दीड महिन्यापूर्वी 1000 खाटांचे कोरोना रुग्णालय शहरात उभारावे अशी मागणी शहरातील रुग्णांची वाढती संख्या पाहून केली होती त्यानुसार वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात पालिकेच्या वतीने हे हॉस्पिटल उभे राहत असून येत्या आठ ते नऊ दिवसात पहिल्या टप्प्यातील रुग्णांना याठिकाणी दाखल करून घेता येणार आहे.
पावसाळा उंबरठ्यावर आला आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथ रोगांवर उपचार करण्यासाठी पालिकेची यंत्रणा कार्यान्वित करावी लागेल. परंतु शहरांमध्ये बहुतेक रुग्णालय कोरोना वर उपचार करणारी रुग्णालय म्हणून कार्यरत आहेत. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार करून घेण्यासाठी नागरिकांना अडचणी येतात. यासाठी महापालिकेचे वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयामधील कोरोना रुग्णालय वाशी येथील बाराशे खाटांच्या विशेष कोव्हिड रुग्णालयांमध्ये हलवून प्रथम संदर्भ रुग्णालयासह नेरूळ आणि ऐरोली येथील पालिकेची रुग्णालय कोरोना व्यतिरिक्त आजारांवर उपचार करण्यासाठी सुरू ठेवावीत,अशी महत्त्वाची मागणी देखील या भेटीत त्यांनी केली.
संशयित रुग्णांना शोधून काढण्यासाठी घरोघरी आरोग्य तपासणी मोहीम राबविण्याचा सल्ला लोकनेते नाईक यांनी पालिका प्रशासनाला दिला होता त्यानुसार तुर्भे आणि कोपरखैरणे या भागात पालिकेने मास स्क्रिनिंगला सुरुवात केली आहे या तपासणी मोहिमेची व्याप्ती वाढविण्याची सूचना लोकनेते नाईक यांनी केली.
कोरोना योद्ध्यांच्या मदतीने कोरोना महामारी विरोधातील लढाई आपण जिंकू शकतो त्यामुळे त्यांच्यासाठी आवश्यक तो सर्व खर्च करण्यास पालिका प्रशासनाने कुचराई करू नये असे सांगून महापालिका अधिकारी ,कर्मचारी, वैद्यकीय, आरोग्य सेवेतील डॉक्टर, नर्सेस इतर सहयोगी कर्मचारी ,स्वच्छता कर्मचारी सर्वांना विम्याचे संरक्षण कवच प्रदान करावे अशी आग्रहाची मागणी त्यांनी याप्रसंगी केली. एपीएमसी मधील कोरोनाची लागण कमी झाली असली तरी  पालिकेने सतर्कता राखून बाजार आवारातील संसर्ग वाढू नये यावर नजर ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी सूचना देखील त्यांनी केली.
पावसाळ्यामध्ये विजेचा धक्का लागून नागरिकांचा प्रसंगी जीवही जातो त्यामुळे विज दुरुस्तीची कामे करून घ्यावीत. कालांतराने का होईना शाळा  शाळा सुरू होणार असल्याने शाळांच्या इमारती स्वच्छ करून ठेवाव्यात असेही लोकनेते नाईक म्हणाले.


...तर पालिका मुख्यालयावर मोर्चा आणू

कोरोना विरोधातील लढाईत आमचे पालिका प्रशासनाला पूर्ण सहकार्य आहे. त्यांच्या चांगल्या कामाचे आम्ही कौतुक करीत आहोत. परंतु ही लढाई गांभीर्याने घेतली नाही तर आणि त्यामुळे अपयश ओढावले तर मात्र लोकप्रतिनिधी म्हणून आणि या शहराचा कुटुंबप्रमुख या भूमिकेतून  महापालिका मुख्यालयावर मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे.

लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी आतापर्यंत कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या महत्त्वाच्या  सूचना......

1000 खाटांचे कोरोना रूग्णालय स्थापन करावे

प्रतिदिनी 500 कोरोना चाचण्या करता येतील या क्षमतेची पालिकेच्या स्वमालकीची प्रयोगशाळा स्थापन करावी

खाजगी डॉक्टरांना पीपीई किट, मास्क ,स्यानि टायजर या वस्तू मोफत वितरीत कराव्यात

घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करावी

पावसाळापूर्व नागरी सुविधांची आणि वीज दुरुस्तीची कामे मार्गी लावावीत.

पावसाळ्यात साथरोग नियंत्रणासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी.

No comments:

Post a Comment