Sunday, May 31, 2020

नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वॅब तपासणीसाठी आणखी 3 प्रयोगशाळांची शासनाकडून उपलब्धता

नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वॅब तपासणीसाठी आणखी 3 प्रयोगशाळांची शासनाकडून उपलब्धता

मेट्रोपोलीस लॅब करणार मोफत 15 हजार कोरोना स्वॅब टेस्ट

  कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या व्यक्तीची स्वॅब चाचणी लवकरात लवकर होणे गरजेचे असते. यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका सुरूवातीपासूनच सतर्कतेने काम करीत असून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीची स्वॅब टेस्ट घेतल्यापासूनच त्याच्यावर योग्य उपचार सुरू करण्यात येतात.

      सध्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या स्वॅब तपासणीसाठी हाफकीन आणि एनआयव्ही या दोन प्रयोगशाळा उपलब्ध असल्याने व त्यांच्यावर इतर महानगरपालिकांच्या तपासण्यांचाही भार असल्याने तपासणी अहवाल प्राप्त होण्यास 4 ते 5 दिवस लागत होते. त्यामुळे याविषयी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी पुढाकार घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वॅब टेस्टींगसाठी अतिरिक्त प्रयोगशाळांची मागणी राज्य शासनाकडे केली होती. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने जे.जे., आय.एन.एच.एस.अश्विनी आणि टाटा ॲक्ट्रॅक लॅब अशा आणखी 3 प्रयोगशाळा नवी मुंबई महानगरपालिकेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मागणीनुसार आता नवी मुंबई महानगरपालिकेस स्बॅब तपासणीसाठी 3 नवीन अशा एकूण 5 प्रयोगशाळा उपलब्ध झाल्याने तपासणी अहवाल लवकर प्राप्त होणार आहेत.

      याशिवाय मेट्रोपोलीस या खाजगी लॅबमार्फत सिटी बॅंक आणि सिपला फाऊंडेशन यांच्या सहकार्याने त्यांच्या सीएसआर निधीतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या 15 हजार स्वॅब टेस्ट मोफत करून देण्याच्या प्रस्तावास आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी त्वरीत मान्यता दिली असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या स्वॅब टेस्टींगसाठी ही अत्यंत लाभदायक बाब आहे. मेट्रोपोलीस लॅबने दिलेल्या प्रस्तावानुसार त्यांचेकडे स्वॅब पाठविल्यानंतर एका दिवसात ते त्याचे तपासणी अहवाल देणार असून वाशी येथील डेडिकेटेड कोव्हिड रूग्णालयातून स्वॅब कलेक्शन केले जाणार आहे. मेट्रोपोलीस लॅब ही केंद्र शासनाच्या आयसीएमआर या सर्वोच्च संस्थेमार्फत कोव्हीड 19 विषयक तपासणी करण्यासाठी मान्यताप्राप्त लॅब असून त्यांस सिटीबँक व सिपला फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेस 15 हजार चाचण्या मोफत उपलब्ध करून देत असल्याबद्दल महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी या तिन्ही संस्थांचे आभार व्यक्त केले आहेत. 

SBI Sanpada distributed food,Grocery items for poor and needy people in Kharghar, Navi Mumbai


State Bank of India RBO Sanpada, Mumbai Metro Circle was conducted a event of Distribution of Grocery items among the poor and needy people in Kharghar on the May 27.
Rice, floor edible oil, chilli powder, termeric poder,onion potato, salt etc, items were distributed by the hands of Mr Rajnish Kumar, regional manager RBO Sanpada Navi Mumbai.
During the event social distances, Sanatizers, hand gloves rules were followed meticulously.
For the event Mr Atul Chavan chief manager, Mr Nitin Saxena Branch manager Kharghar branch, Kishor Surwade, Cesta , Selina, Hemant Saidane and team were present.


Thursday, May 28, 2020

पावसाळापूर्व कामांचा आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी घेतला सविस्तर आढावा

आगामी पावसाळी कालावधीच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची खबरदारी व त्या अनुषंगाने पूर्वतयारी बाबतचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेत शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रत्येक विभागाने पावसाळापूर्व कामांचे बाबनिहाय कार्यपूर्तता प्रमाणपत्र 1 जूनपर्यंत द्यावे  असे सर्व विभागांना निर्देशित केले. पावसाळापूर्व कामांच्या नियोजनाबाबत आयुक्तांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे विशेष बैठक घेतली व संबंधित विभागांमार्फत सुरु असलेल्या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

      यावेळी महापालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे आणि इतर विभागप्रमुख व अधिकारी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी प्रास्ताविक केले.

      या बैठकीत त्यांनी पावसाळापूर्व गटारे सफाई 31 मे पर्यंत व नालेसफाई एका आठवड्यात तातडीने पूर्ण करावी व त्यामधून निघणारा गाळ लगेच दुस-या दिवशी उचलण्यात यावा असे निर्देश दिले. होल्डींग पाँड्स हे शहराची कवच कुंडले असून त्यावरील फ्लॅप गेट दुरुस्त करण्याचे अंतिम टप्प्यात असलेले काम तातडीने पूर्ण करावे असेही आयुक्तांनी सूचित केले. मोठा पाऊस आणि भरतीची वेळ एकच झाल्यास नवी मुंबई शहर हे समुद्र सपाटीपेक्षा कमी पातळीवर वसलेले असल्याने शहरातील काही भागात पाणी साचते, ही संभाव्य ठिकाणे लक्षात घेऊन तेथे पाणी उपसा पंपांची सख्या वाढविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे भूस्खलनाच्या संभाव्य जागा लक्षात घेऊन त्याठिकाणाहून काही प्रमाणात झोपड्या असल्यास त्या हलवाव्यात असेही विभागांच्या सहा. आयुक्तांना निर्देशित करण्यात  आले. 

      महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे विभाग कार्यालयांच्या माध्यमातून तातडीने सर्वेक्षण करून त्याची सूची प्रसिध्द करावी व तसे फलक त्याठिकाणी लावावेत असे निर्देशित करतानाच सध्या सुरु असलेली स्थापत्य विषयक कामे तातडीने करून घ्यावीत असे सूचित करण्यात आले. उद्यान विभागामार्फत झाडांची छाटणी करताना व्यवस्थित आकार दिसेल अशाप्रकारे विहित वेळेत करावी अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.

      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी कालावधीत उद्भवणारे साथीचे आजार लक्षात घेऊन आरोग्य विभागाने सर्वोतोपरी खबरदारी घ्यावी व अनुषंगीक कार्यवाही करावी असे आयुक्तांनी विशेषत्वाने निर्देश दिले. पावसाळ्यामध्ये पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था सुरळीत राहील याकडे विशेष लक्ष देण्याचे त्यांनी अभियांत्रिकी विभागाला सूचित केले. पावसाळ्यात कुठेही वाहतुक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यासोबत सिग्नल यंत्रणा सुरळीत राहिल याविषयी दक्षता घ्यावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. एम.एस.ई.डी.सी. यांच्याशी समन्वय साधून ज्याठिकाणी ट्रान्सफॉर्मरला झाकणे नाहीत तसेच केबल उघड्या आहेत त्या त्वरीत दुरुस्त करून घेणेबाबत व संभाव्य अपघात टाळण्याबाबत एम.एस.ई.डी.सी. ला सूचित करावे असे आयुक्तांनी विद्युत विभागाला सांगितले. पावसाळापूर्व कामांच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर एम.आय.डी.सी., सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग, एम.एम.आर.डी.ए., रेल्वे, एम.टी.एन.एल., एम.एस.ई.डी.सी., प्राधिकरणांना या पूर्वीच्या शहर आपत्ती व्यवस्थापन समिती बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या त्याची अंमलबजावणी होत असल्याबाबत संबंधीत महापालिका विभागांनी पाहणी करावी व पाठपुरावा करावा असेही निर्देश आयुक्तांनी दिले. सर्व प्राधिकरणांनी समन्वय राखून कार्यकृती करावी अशा सूचना महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी यावेळी दिल्या.

      कोरोनाशी लढताना त्यासोबतच आगामी पावसाळी कालावधी लक्षात घेऊन नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेत पावसाळापूर्व कामांकडे काटेकोर लक्ष देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी आपली पावसाळा पूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत व 1 जून पर्यंत केलेल्या कामाचा कार्यपूर्तता अहवाल आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे द्यावा असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले.


"Disaster Management Cell in CIDCO Bhavan" Belapur, Navi Mumbai

सिडको महामंडळाचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष १ जून ते ३० सप्टेंबर २०२० या पावसाळी कालावधीमध्ये २४ x ७ तत्त्वावर कार्यरत  असणार आहे.  दरवर्षी पावसाळी कालावधीमध्ये  सिडकोतर्फे नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येतो. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्ती/दुर्घटना लक्षात घेता जून ते सप्टेंबर या कालावधीत सिडकोचा सुसज्ज असा आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत असतो. 

सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन इमारतीच्या तळ मजल्यावर असलेला हा नियंत्रण कक्ष कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसहित शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही २४ तास कार्यरत राहणार आहे. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग आदी महत्त्वाच्या विभागाचे कर्मचारी २४ तास संपर्कात असतील.
सिडकोच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाद्वारे वृक्षांची पडझड/वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी, रस्त्यावरील उघड्या गटारांची झाकणे पूर्ववत बसवणे, पूर/पूरसदृश परिस्थिती, रस्त्यांवरील खड्डे, रस्ते वा नाल्याजवळ साचलेला कचरा, व्यक्तींचे पाणीसाठ्याच्या ठिकाणी बुडणे, आग व आगीचे विविध प्रकार,  साथीचे रोग, विषारी प्राणी चावण्यासंबंधी बाबी, इमारत कोसळणे, भूस्खलन, पाणी साचणे या आपत्तींची दखल घेण्यात येऊन त्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येईल.  

नागरिकांनी वरीलपैकी कोणतीही आपत्ती उद्भवल्यास पुढे देण्यात आलेल्या दूरध्वनी अथवा व्हॉटसॲप क्रमांकावर किंवा ई-मेलद्वारे सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून आपत्तीसंबंधी माहिती द्यावी किंवा त्याबाबतची तक्रार नोंदवावी. 

१.
दूरध्वनी क्र. 
022-6791 8383/8384/8385, 
27562999

२.
टोल फ्री क्र.
1800226791

३.
व्हॉटसॲप क्र.
8879450450

४. 
फॅक्स क्र. 
002-67918199

५.
ई-मेल
eoc@cidcoindia.com


नागरिकांमार्फत फोनवरून अथवा व्हॉट्‌सॲपवरून माहिती अथवा तक्रार प्राप्त झाल्यावर नियंत्रण कक्षातील अधिकारी तातडीने निर्णय घेऊन ज्या नोडमध्ये सदर घटना घडली असेल तेथील प्रमुख अधिकाऱ्यास घटनेसंबंधी माहिती कळवतील व त्यासंबंधी योग्य ते मार्गदर्शन करतील. तसेच नियंत्रण कक्ष आवश्यक असलेल्या अग्निशमन केंद्र, हॉस्पिटल, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस अशा संबंधित विभागाशी तातडीने संपर्क साधून घटनास्थळी आवश्यक ती मदत ताबडतोब पोहोचविण्याची दक्षता घेईल. नागरी संरक्षण दल तसेच सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक यांचेही सहकार्य याकामी घेण्यात येणार आहे. नोडल अधिकारी, सर्व संबंधित सिडकोचे विभाग, तसेच इतर शासकीय विभाग यांच्याशी समन्वय साधण्याची महत्वाची भूमिका हा नियंत्रण कक्ष पार पाडेल. त्या घटनेसंबंधी केलेल्या कारवाईची माहिती व सद्यस्थिती नोडल अधिकारी नियंत्रण कक्षास पुरवणार आहेत. सदर माहिती नियंत्रण कक्षाकडून संपर्क साधलेल्या नागरिकांना दिली जाईल.

दगडखाणी आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागांवर धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यात येणार आहेत. अपघातप्रवण जागांवर सिडकोचे सुरक्षा रक्षक तैनात ठेवले जाणार आहेत. तसेच धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे. अतिवृष्टीच्या वेळी पाणी साठल्यास पाण्याचा उपसा करणारी यंत्रसामुग्री २४ तास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - 

Sunday, May 24, 2020

मध्यप्रदेश, झारखंडकडे रवाना होणा-या 3500 नागरिकांना महानगरपालिकेमार्फत फुड पॅकेट्सचे वितरण

कोव्हीड 19 च्या उपाययोजनांच्या अनुषंगाने जाहीर लॉकडाऊन काळात गरजू मजूर, कामगार, विस्थापित कामगार, बेघर नागरिक, काळजी घेण्यास कोणी नसलेल्या दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक अशा नवी मुंबईकर नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची काळजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात येत असून दररोज साधारणत: 24 हजारहून अधिक नागरिकांना 17 कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण वितरित करण्यात येत आहे. याकामी विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांचेही मौलिक सहकार्य महानगरपालिकेस मिळत आहे.

      अशाच प्रकारे काल रात्री नवी मुंबईतून मध्यप्रदेशातील रेवा तसेच झारखंडमधील हजारीबागकडे ट्रेनव्दारे रवाना होणा-या 3500 नागरिकांना भोजन व्यवस्था करून देणेबाबत ठाण्याचे तहसिलदार श्री. अधिक पाटील व मंडळ अधिकारी श्री. किरण भागवत यांचेमार्फत विनंती करण्यात आली होती.

       त्यास अनुसरून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी तातडीने आदेश देत त्या 3500 प्रवाशांना जेवणाची पॅकेट्स उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार आणि सहा. आयुक्त श्री. चंद्रकांत तायडे यांनी महानगरपालिकेच्या बेलापूर व नेरूळ येथील कम्युनिटी किचनव्दारे सहा. आयुक्त श्री. चंद्रकांत तांडेल व संजय तायडे यांच्या माध्यमातून हे फूड पॅकेट्स पनवेल रेल्वे स्टेशनवर तातडीने उपलब्ध करून दिले. बाहेरगांवी जाणा-या प्रवाशांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काळजी घेत उपलब्ध करून दिलेल्या या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.  

  

अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचा लोकोपयोगी उपक्रम

अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचा लोकोपयोगी उपक्रम
*संचारबंदीत मनसेकडून १२ रुपये किलोने कांदा वाटप*
नवी मुंबई - कोरोनामुळे ओढवलेल्या संकटात सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे आणि शाखा अध्यक्ष अमन गोळे यांच्याकडून महाराष्ट्राचे तसेच सर्व महाराष्ट्र सैनिकांचे लाडके युवा नेतृत्व, मनसेचे नेते *सन्मा.अमित राजसाहेब ठाकरे* यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विभागातील नागरिकांसाठी शेतकरी ते थेट ग्राहक तत्वावर स्वस्त दरात कांदा वाटप करण्यात आला. यावेळी मनसेकडून सर्व सामान्य नागरिकांसाठी *फक्त १२ रुपये किलोने* सोसायटीच्या प्रवेशद्वारावर कांदा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली.
कोरोनाशी लढण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या काळात लोकांनी भाजीपाला आणण्यासाठी घराबाहेर पडू नये आणि विनाकारण गर्दी करून कोरोनाची साथ आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांना अडसर ठरू नये या हेतूने मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे आणि शाखा अध्यक्ष अमन गोळे यांच्या सौजन्याने संकटकाळी सर्व सामान्यांना मदत म्हणून सोसायटीच्या प्रवेशद्वारावर कांदा उपलब्ध करून देण्याचा लोकोपयोगी उपक्रम मनसेकडून रविवारी हाती घेण्यात आला. विभागातील जवळजवळ १०० ते १५० कुटुंबांना मनसेकडून स्वस्त दरात कांदा वाटप करण्यात आला. संचारबंदीत सर्वसामान्य नागरिकांना सोसायटीच्या प्रवेशद्वारावर स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी मनसेचे शाखा अध्यक्ष अमन गोळे, महाराष्ट्र सैनिक वैभव जिमन, महाराष्ट्र सैनिक शशांक भिकुले, महाराष्ट्र सैनिक अजय घोडेराव यांनी विशेष मेहनत घेतली.

Friday, May 22, 2020

राज्य सरकार जबाबदारी टाळत आहे लोकनेते आमदार गणेश नाईक यांचा घणाघात


नवी मुंबईत भाजपातर्फे महाराष्ट्र बचाओ आंदोलन
महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणाबाहेर जाण्यास राज्य सरकार मधील असमन्वय कारणीभूत असून सरकार केवळ जबाबदारी टाळण्याच काम करीत आहे, असा घणाघात लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केला आहे.
कोरोनाला आळा घालण्यात राज्य सरकारला सपशेल अपयश आल असून याविरोधात जनतेच्या मनामध्ये आक्रोश धुमसतोय या संतापाला वाट करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यात माझे अंगण माझे रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलनाची हाक दिली होती. सोशल डिस्टन्स पाळून नवी मुंबईत सर्वत्र हे आंदोलन करण्यात आले.
लोकनेते नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोपरखैरणे सेक्टर 11 येथील बालाजी गार्डन सोसायटीमध्ये महाराष्ट्र बचाव आंदोलन पार पडलं. माजी खासदार डॉक्टर संजीव गणेश नाईक माजी महापौर सागर नाईक  समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक, युवा नेते संकल्प नाईक आदी मान्यवरांसह सोसायटीमधील अनेक नागरिक सहभागी झाले होते.
देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येपैकी एक तृतीयांश संख्या महाराष्ट्रात आहे. दिल्ली चेन्नई अहमदाबाद हीदेखील देशातील महानगरे आहेत. या शहरांच्या तुलनेत  मुंबई आणि उपनगरांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे सत्ताधारी आणि प्रशासना मधला असमन्वय असल्याची टीका लोकनेते नाईक यांनी याप्रसंगी केली.  केंद्र सरकार आपली जबाबदारी उचलत असताना राज्य सरकार मात्र ती टाळण्याचा प्रयत्न करीत आहे.  लॉकडाऊन मुळे देशाची अर्थव्यवस्था नाजूक बनली असताना केंद्र सरकारने वीस लाख कोटी रुपयांचे मोठे पॅकेज विविध क्षेत्रांना उभारी देण्यासाठी जाहीर केले आहे. राज्यसरकार याप्रश्नी उदासीन दिसते.
रिक्षा चालक टॅक्सी चालक घर कामगार बारा बलुतेदार यांना भरघोस आर्थिक मदत करा, डाळ साखर आणि इतर किराणा रेशनिंग दुकानांवर देण्यास सुरुवात करा, विज बिल आणि मुलांची शैक्षणिक फी माफ करा, विद्यार्थी महिला वरिष्ठ नागरिक इत्यादी घटकांसाठी मोफत प्रवासाची सोय करा, महाराष्ट्राची आर्थिक घडी बसविण्यासाठी मोठे आर्थिक पॅकेज जाहीर करा
कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयातून मोफत उपचार करावेत, अशा मागण्या लोकनेते नाईक यांनी केल्या आहेत.  त्याच बरोबर पावसाळा तोंडावर आल्याने पावसाळापूर्व कामांना गती देण्याची सूचना देखील सरकारला केली आहे.

Thursday, May 21, 2020

स्वच्छ रेडिओ नवी मुंबई चे दीड महिन्यात 21 हजारहून अधिक श्रोते

कोव्हीड - 19 च्या उपाययोजनांच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती होण्याकरिता सुरु करण्यात आलेल्या 'स्वच्छ रेडिओ नवी मुंबई' या अभिनव संकल्पनेला नवी मुंबईकर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून 6 एप्रिल पासून सुरु झालेल्या या इंटरनेट रेडिओचे आजतागायत दीड महिन्यात 21 हजार 784 श्रोते झालेले आहेत. सध्या दररोज 1200 हून अधिक श्रोते या इंटरनेट रेडिओ श्रवणाचा लाभ घेऊन सद्यस्थिती जाणून घेत आहेत.

स्वत:चा इंटरनेट रेडिओ असणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका असून या 'स्वच्छ रेडिओ नवी मुंबई' वरून कोव्हीड - 19 विषयी माहिती प्रसारणासोबतच विविध विषयांवरील कार्यक्रम सादर होत आहेत. यामध्ये, के.ई.एम. रुग्णालयाच्या सेवानिवृत्त डीन व सुप्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर या कोरोना विरोधातील लढाईच्या काळात कोरोना बाधितांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मानसिक ताणतणावांपासून कसे दूर रहावे याविषयी मौलिक मार्गदर्शन करीत असतात. संपूर्ण कुटुंबातील प्रत्येक घटकांच्या मानसिकतेचा विचार करून त्या सादर करीत असलेल्या व्याख्यानांवर अनेकांचे पसंतीपर अभिप्राय प्राप्त होत आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या व्याख्यानांमुळे मानसिक आधार मिळत असल्याची प्रतिक्रिया विशेषत्वाने महिलांकडून प्राप्त होत आहे.

सुप्रसिध्द लेखिका, गीतकार श्रीम. धनश्री देसाई यांच्या विविध विषयांवरील समुदेशनपर लेखांचे तसेच खास करून मुलांचे भावविश्व फुलविणा-या गोष्टींचे सादरीकरण या रेडिओवरून करण्यात येते. त्यालाही श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे विविध वृत्तांचे विशेष बुलेटीन, प्रेरणादायी कथा वाचन, कोरोना विषयावरील विशेष गीत प्रसारण तसेच इतर सुमधूर संगीताचे प्रसारण या रेडिओवरून केले जाते. याशिवाय साहित्य, संस्कृती, अशा विविध विषयांवरील माहिती रंजक पध्दतीने प्रसारित केली जात आहे.

      रेडिओ वरील सर्वच कार्यक्रमांना नवी मुंबईकर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून बघता बघता दररोज 1200 पेक्षा अधिक श्रोत्यांची संख्या झालेली आहे. स्वच्छ रेडिओ नवी मुंबई ऐकण्यासाठी www.swachhradionavimumbai.com या संकेत स्थळाप्रमाणेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन "स्वच्छ रेडिओ नवी मुंबई (Swachh Radio Navi Mumbai)" हे ॲप डाऊनलोड केल्यास नागरिक अगदी कुठेही या इंटरनेट रेडिओ सेवेचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय -  

http://radio.garden/listen/swachh-radio-navi-mumbai/7W02sdD5

https://www.liveonlineradio.net/hindi/swachh-radio-navi-mumbai.htm  

https://mytuner-radio.com/radio/swachh-radio-navi-mumbai-471018/

https://onlineradiobox.com/in/swachh/?cs=in.swachh&played=1

      या लिंकवरूनही हा इंटरनेट रेडिओ सहजपणे ऐकला जाऊ शकतो.

      'स्वच्छ रेडिओ नवी मुंबई' या इंटरनेट रेडिओची अभिनव संकल्पना ग्लोबल ग्रीन इनोव्हेटर्स प्रा.लि. कंपनीच्या सहयोगाने राबविण्यात येत असून रेडिओवर एखादा जनप्रबोधनपर अथवा माहिती व मनोरंजनपर कार्यक्रम सादर करावयाचा असल्यास 8655447929 या क्रमांकावर संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे.

आधुनिक माहिती व तंत्रयुगाला साजेशी ही इंटरनेट रेडिओची अभिनव संकल्पना सुजाण नवी मुंबईकर नागरिकांच्या पसंतीस उतरत असून यापुढील काळात या 'स्वच्छ रेडिओ नवी मुंबई'च्या श्रोत्यांमध्ये अधिक भर पडेल असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केला आहे. 


Wednesday, May 20, 2020

करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्व विभाग प्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी – पालकमंत्री शिंदे

ठाणे जिल्ह्यातील  कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यू दर लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व मनपा क्षेत्रात व ग्रामीण भागात  लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री  तथा जिल्हयाचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे  यांनी आज दिले.

ठाणे  जिल्हाधिकारी  कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला  जिल्हा परिषद अध्यक्ष  दिपाली पाटील,   मनपा आयुक्त विजय सिंघल, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलिस सहआयुक्त ठाणे  सुरेश कुमार मेकला, कल्याण मनपा आयुक्त विजय सुर्यवंशी, जिपमुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड यांसह  जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना व करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा घेतला. यावेळी बोलताना श्री शिंदे  म्हणाले, ठाणे जिल्ह्यात  वाढणारे कोरोनाबाधित रुग्ण ही चिंतेची बाब आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यास प्रतिबंधीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती आम्ही देण्यास तयार आहोत. जिल्ह्याकडे विविध विभागांकडे तसेच जिल्हा वार्षिक योजनेचा निधी उपलब्ध आहे. यानिधीचा उपयोग आरोग्य यंत्रणा उभारणी करण्यासाठी करण्यास यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा अत्यंत तत्पर आणि सक्षम करण्यावर भर देण्यात यावा. केंद्रीय पथकाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे जिल्ह्यात आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. आपल्याकडे कोरोना रुग्णांचे प्रमाण नियंत्रण करण्याबरोबरच भविष्यात रुग्ण वाढल्यास आपले नियोजन परिपूर्ण असावे यादृष्टीने सर्व व्यवस्था करावी. कोरोना  चाचण्या, उपचार यांना प्राधान्य देण्यात यावे. रुग्णालयांची क्षमता वाढविण्याबरोबरच अद्ययावतीकरणावर भर देण्यात यावा.  मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणेने काटेकोरपणे   नियोजन करावे अशा सुचनाही श्री शिंदे यांनी संबंधितांना दिल्या. सर्व मनपांनी कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी कोविड योद्ध्यांची नेमणूक करावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. 

आरोग्य यंत्रणेने प्रभावी उपाययोजना करण्याबरोबरच स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी असे आवाहन  श्री शिंदे यांनी केले आहे. 

कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी  माहिती दिली. तसेच अन्य अधिकाऱ्यांनी देखील त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची बैठकीत माहिती दिली.

Tuesday, May 19, 2020

Mahavitaran will Replace Faulty Agriculture Solar Pumps for Free

*Mahavitaran will Replace Faulty Agriculture Solar Pumps for Free*
Mumbai, dt. 19 May 2020:
The 3 HP or 5 HP Solar agricultural pumps that were provided by Mahavitaran under the Chief Minister's Solar Agricultural Pump scheme will be replaced or repaired for free in case there is any technical fault in the pumps due to rain, storm or any other natural calamity. 
Currently, the danger of uncertain rain and storm  is looming in the State. Hence, there are chances of technical faults in the agricultural pumps or the Solar panels. The Hon. Energy Minister, Dr. Nitin Raut has directed to repair or replace those faulty Solar pumps and panels immediately abiding all the rules. 
The Chief Minister's Solar Agriculture Pump scheme was started for giving uninterrupted electricity supply and electricity supply during night hours to the Agricultural pumps. Mahavitaran was appointed for the implementation of this scheme. As per the scheme, Mahavitaran has completed the tendering process for the implementation/procurement of the 25 thousand solar agricultural pumps in the first phase  and the process of the remaining 75 thousand Solar agricultural pumps of the second and third phase is in progress. 
The work has been given to the selected agencies after taking a particular amount from the selected farmers who applied online for the solar pumps from the Mahavitaran webportal. The implementation of the solar agricultural pumps is being done by these agencies. 
As per the agreement between the agency and Mahavitaran, after the implementation of the solar agricultural pump/solar panels, the respective agency will have to replace or repair it. It will be applicable for 5 years in case of Solar agricultural pumps and 10 years in case of Solar panels. Therefore, at present, as there are instances of uncertain rain and storm, no amount will be charged if there is any fault in the Solar agricultural pump or the Solar Panel. 
The farmers can contact the 24X7 active toll free numbers 18001023325 or 18002333435 or 1912 or even to the closest Mahavitaran office regarding the complaints of faulty Solar agricultural pump or Solar panels. Mahavitaran will forward the complaint to the concerned agency and  faulty Solar agricultural pump or Solar panels will be repaired or replaced.

कचरामुक्त शहराचे 'फाईव्ह स्टार रेटींग' संपादन करणारी नवी मुंबई राज्यातील एकमेव महानगरपालिका

सतत दुस-या वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेला कचरामुक्त शहराचे पंचतारांकित मानांकन

कचरामुक्त शहराचे 'फाईव्ह स्टार रेटींग' संपादन करणारी नवी मुंबई राज्यातील एकमेव महानगरपालिका

 

            'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत आज देशातील कचरामुक्त शहरांना देण्यात येणा-या स्टार रेटींगची घोषणा केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने ना.श्री.हरदीपसिंह पुरी यांनी केली असून त्यामध्ये नवी मुंबईला पुन्हा एकवार फाईव्ह स्टार रेटींग जाहीर झाले आहे. देशातील 6 शहरांना कचरामुक्त शहराचे 5 स्टार रेटींग जाहीर झाले असून त्यामध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. या मानांकनाबद्दल महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

      स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 3 वेळा वेगवेगळ्या केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांकडून स्टार रेटींगच्या निकषान्वये बारकाईने सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये केंद्र सरकारमार्फत नियुक्त त्रयस्थ संस्थेच्या निरीक्षक पथकांनी कागदपत्रांची पाहणी केली होती तसेच विविध स्थळांना अचानक भेट देऊन विविध ठिकाणच्या स्वच्छतेची व कचरा वर्गीकरण स्थितीची पाहणी केली होती. त्याचप्रमाणे कच-याचे संकलन व वाहतूक पध्दती तसेच कच-याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रीया याचीही बारकाईने पाहणी करण्यात आलेली होती. कोणतीही पूर्व सूचना न देता विविध ठिकाणांना भेटी देत तेथील नागरिकांशी ऐनवेळी संवाद साधून त्यांचे प्रत्यक्ष अभिप्रायही केंद्रीय पथकांकडून जाणून घेण्यात आले होते. अशा सर्वंकष पाहणीच्या आधारे गुणांकन करण्यात येऊन कचरामुक्त शहराचे स्टार रेटींग जाहीर करण्यात आले आहे.

      यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस 5 स्टार रेटींग प्राप्त झाले असून 5 स्टार रेटींग प्राप्त करणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. नवी मुंबईसह मध्यप्रदेश मधील इंदौर, कर्नाटक मधील मैसुर, गुजरातमधील सुरत व राजकोट आणि छत्तीसगढ मधील अंबिकापूर ही देशातील इतर 5 शहरे 5 स्टार रेटींगची मानकरी ठरली आहेत. मागील वर्षीही नवी मुंबई महानगरपालिकेने कचरामुक्त शहराचे 5 स्टार रेटींग प्राप्त केले होते. त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये स्वच्छ शहरात राज्यात सर्वप्रथम व देशात सातव्या क्रमांकाच्या शहराचे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाले होते.

      आज संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना नवी मुंबईला मिळालेल्या या कचरामुक्त शहराच्या फाईव्ह स्टार रेटींगबद्दल समाधान व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी या 5 स्टार रेटींगचे श्रेय दैनंदिन स्वच्छता करणा-या सफाई कामगारापासून स्वच्छतेविषयी जागरूक असणारे लोकप्रतिनिधी तसेच प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाचे असल्याचे सांगत सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

      कोरोनाच्या लढाईतही दैनंदिन स्वच्छतेविषयी जागरुकता दाखविली जात असून कोरोना बाधीतांकडून होणा-या कच-याची स्वतंत्रपणे शास्त्रोक्त रितीने विल्हेवाट लावली जात आहे. हा कचरा संकलित करताना कामगारांच्या सुरक्षेचीही सुरक्षा साधनांव्दारे काळजी घेतली जात आहे. त्याचप्रमाणे पावसाळापूर्व नाले व गटारे सफाई कामेही वेगाने सुरु आहेत. हे करताना मास्क, हँडग्लोव्हजचा वापर केला जात आहे व सोशल डिस्टसींग राखले जात आहे. 

      स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन नवी मुंबई शहर स्वच्छ व आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी घरातच थांबून व सोशल डिस्टसींग राखून आपले योगदान द्यावे असे आवाहन करीत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी यापुढील काळात 5 स्टार रेटींगच्या पुढे जात आपली 7 स्टार रेटींग प्राप्त करण्यासाठी वाटचाल राहील असा विश्वास व्यक्त केला.


 

सिडको प्रदर्शनी केंद्रातील कोरोना रुग्णालयाची पाहणी....

लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी मागणी केल्यानुसार वाशीतील शिडको प्रदर्शनी केंद्रात 1100 खाटांचे कोरोना रूग्णालय महापालिकेच्यावतीने उभे राहत आहे. या रुग्णालयाचा पाहणीदौरा लोकनेते नाईक यांनी केला. या ठिकाणच्या सोयीसुविधांची माहिती घेऊन कामाला गती द्या अशी सुचना त्यांनी याप्रसंगी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केली.
पालिकेतील कोरोना रुग्णालय सिडको प्रदर्शनी केंद्रात हलवावे...
वाशी येथील पालिकेचे प्रथम संदर्भ रुग्णालय कोरोना रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. पावसाळा लवकरच सुरू होणार आहे. पावसाळ्यात साथीचे आणि इतर आजार डोके वर काढतात. अशा परिस्थितीमध्ये प्रथम संदर्भ रुग्णालय नवी मुंबईकरांसाठी सर्व आजारांवर उपचारासाठी मोठा आधार असतो. हेच रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून कार्यरत असल्याने इतर आजारांसाठी त्यामध्ये उपचार करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. त्याकरिता हे कोरोना रुग्णालय वाशी येथील प्रदर्शनी केंद्रात हलवावे आणि प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्वीप्रमाणेच सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी खुले ठेवावे, अशी मागणी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केलेली आहे.

Sunday, May 17, 2020

कोव्हीड 19 उपाययोजनांमध्ये रूग्णवाहिकांचे सुयोग्य व्यवस्थापन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून कोव्हीड 19 बाधित रूग्णांवर उपचारासाठी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोव्हीड केअर सेंटर (CCC), डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर (DCHC) व डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल (DCH) अशी त्रिस्तरीय रचना करण्यात आलेली आहे.

यामध्ये एक महत्वाचा भाग रूग्णवाहिकांचा असल्याचे लक्षात घेत आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी उपलब्ध रूग्णवाहिकांचे विभाग निहाय सुयोग्य नियोजन करण्याकडे विशेष लक्ष दिलेले आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेकडे स्वत:च्या 12 रूग्णवाहिका असून 5 रूग्णवाहिका जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आरटीओ च्या सहयोगाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एन.एम.एम.टी.च्या 4 बसेसचे रूग्णवाहिका स्वरूपात तात्पुरते रूपांतरण करण्यात आले असून आणखी 4 बसेसची रूग्णवाहिका रूपांतरण प्रक्रिया सुरू आहे.

या उपलब्ध रूग्णवाहिकांतून कोव्हीड 19 च्या रूग्णांना ने - आण करण्यासाठी सुयोग्य व्यवस्थापन करतानाच काही रूग्णवाहिका इतर आजारांच्या सर्वसाधारण रूग्णांसाठीही कार्यान्वित ठेवण्याकडे लक्ष देण्यात आले आहे. जेणेकरून कोव्हीड व्यतिरिक्त इतर आजारांच्या रूग्णांची गैरसोय होऊ नये.

सद्यस्थितीत, वाशी येथील डेडिकेटेड कोव्हीड रूग्णालयाकडे कोव्हीड 19 रूग्णांसाठी 3 रूग्णवाहिका कार्यान्वित आहेत. तसेच इतर सर्वसाधारण रूग्णांसाठी 2 रूग्णवाहिका कार्यान्वित आहे. त्याचप्रमाणे सेक्टर 14 वाशी येथील कोव्हिड केअर सेंटर करिता 1  रूग्णवाहिका सेवेत आहे. या व्यतिरिक्त वाशी रूग्णालयामध्ये 2 शववाहिका असून त्यामधील एक पूर्णपणे कोव्हीडमुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या पार्थिवासाठी वेगळी ठेवण्यात आलेली आहे.

याशिवाय नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात 3 रूग्णवाहिका या कोव्हीड 19 रूग्णांकरिता वापरात असून सर्वसाधारण रूग्णांकरिता 2 रूग्णवाहिका कार्यान्वित आहेत.

तसेच राजमाता जिजाऊ रूग्णालय, ऐरोली अंतर्गत 2 रूग्णवाहिका कोव्हीड 19 रूग्णांकरिता उपयोगात आहेत आणि 2 रूग्णवाहिका इतर आजारांच्या रूग्णांसाठी वापरात आणल्या जात आहेत.

त्याचप्रमाणे, माता बाल रूग्णालय बेलापूर अंतर्गत 1 रूग्णवाहिका सर्वसाधारण रूग्णांकरिता व 1 रूग्णवाहिका कोव्हिड 19 रूग्णांकरिता उपयोगात आणली जात आहे. तसेच इंडिया बुल्स येथील कोव्हिड केअर सेंटरकरिता 1 रूग्णवाहिका व बहुउद्देशीय इमारत, सेक्टर 3, सी.बी.डी. बेलापूर येथील कोव्हीड केअर सेंटर करिता 1 रूग्णवाहिका कोव्हिड 19 रूग्णांकरिता कार्यान्वित आहे. 

यासोबतच खैरणे व सानपाडा  नागरी आरोग्य केंद्रांमध्येही कोव्हिड 19 रूग्णांकरिता स्वतंत्र रूग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

याव्यतिरिक्त एन.एम.एम.टी.च्या 4 बसेसचे रूग्णवाहिका स्वरूपात रूपांतरण करण्यात आले असून सदर रूग्णवाहिका स्वरूपातील बसेस पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील व्यक्ती व क्वारंटाईन करावयाच्या व्यक्ती अशा व्यक्तींसाठी वापरल्या जात आहेत. सदर बसेस स्वरूपातील रूग्णवाहिका 2 वाशी येथील सार्वजनिक रूग्णालयाकडे तसेच 1 ऐरोली व 1 इंडिया बुल्स येथे कार्यान्वित आहेत. 

याशिवाय आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून 3 रूग्णवाहिका घेण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीस्तव पाठविण्यात आलेला आहे.

सदर रूग्णवाहिकांचे नियोजन व्यवस्थित रितीने होण्याकरिता अद्ययावत जीपीएस तंत्रप्रणालीचा वापर करण्यात येत असून त्यावरील  नियंत्रणासाठी वाहन विभाग व एन.एम.एम.टी. विभाग अशा दोन अधिका-यांची नेमणूक करण्यात येत आहे.

कोव्हिड 19 रूग्णांसाठी स्वतंत्र रूग्णवाहिकांची सुयोग्य व्यवस्था करताना इतर आजारांच्या रूग्णांचीही गैरसोय होऊ नये याकडे महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष देण्यात आले आहे.

Saturday, May 16, 2020

घणसोलीतील विजेचा लपंडाव थांबवा

घनसोली परिसरांमध्ये हल्ली वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. असुरळीत वीज पुरवठ्यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. अचानक विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे घरातील अनेक विद्युत उपकरणे नादुरुस्त होतात त्याचा आर्थिक भुर्दंड रहिवाशांना बसतो. या परिसरात अनेक ठिकाणी उघड्या विद्युत डीपी आहेत. त्याचा धक्का लागून  अपघात संभवतात. विजेच्या धक्क्याने यापूर्वी लहान मुले आणि इतर रहिवाशी जखमी झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत, परिसरातील ट्रान्सफॉर्मर जुने झाले आहेत.  विद्युत वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. हे सर्व धोके आणि रहिवाशांना होणारा त्रास  लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी वाशी विभागाचे अधीक्षक अभियंता यांना पत्र पाठवून त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. घनसोली वीज कार्यालयासमोर ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी जागा उपलब्ध आहे त्याठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा आणि परिसरातील विद्युत समस्या दूर कराव्यात अशी मागणी लोकनेते नाईक यांनी अधीक्षक अभियंता यांना 13 मे रोजी पाठवलेल्या पत्रात केली आहे.

नवी मुंबईत पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत लोकनेते आमदार गणेश नाईक यांची पालिका प्रशासनाला सूचना


नवी मुंबई महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधाच्या कामात गुंतली असली तरी पावसाळापूर्व कामांनाही प्राधान्य देऊन ही कामे 31 मे पर्यंत पूर्ण करावीत अशी सूचना लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. महापालिका आयुक्त आणि पालिका प्रशासकांना त्यांनी यासंदर्भात 13 मे रोजी पत्र पाठवले आहे.
पावसाळा तोंडावर आलेला आहे. शहरात नालेसफाई ,रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेजची दुरुस्ती व सफाई तसेच इतर अत्यावश्यक कामे लवकरात लवकरात लवकर पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. ही कामे पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात शहरातील अनेक ठिकाणी पाणी तुंबून संकटकालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि म्हणूनच covid-19 नियमांचं पालन करून पावसाळापूर्व कामे 31 मे पूर्वी मार्गी लागली पाहिजेत असे लोकनेते नाईक यांनी सांगितले. पावसाळ्यामध्ये आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाची जबाबदारी वाढते. साथीचे आजार उद्भवू शकतात. पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना योग्य ती मदत पुरवावी लागते. त्यांच्या राहण्याची आणि  जेवणाची व्यवस्था करावी लागते. या सर्व बाबींचे पालिका प्रशासनाने वेळीच नियोजन करावे असा सल्ला देखील लोकनेते नाईक यांनी दिला आहे.

Mumbai Division of Central Railway gears up with Monsoon Preparations

The advent of Covid-19 pandemic in India and subsequent lockdown to arrest the spread of the coronavirus resulted in cancellation of all passenger train services. This has made possible to carry out monsoon precautionary measures in Mumbai, especially on suburban network smoothly and thoroughly. To ensure smooth and disruption frees services during ensuing monsoon Mumbai Division of Central Railway has geared up with following measures. 

 

Desilting of Drains and Culverts

More than 16 JCB’s / Poclains deployed for cleaning and desilting drain and culverts with maintaining social distancing over Mumbai suburban. Till now, 90 kms drain cleaning and first round of culverts cleaning has been completed. Muck/debris are being disposed off by 3 BRN muck specials and 2 EMU muck specials with adequate block during this lockdown period.  

 

Widening /Augmentation of Culverts

To ensure free flow of the storm water and to avoid water logging several culvert augmentations works completed at Kurla car-shed, Wadala & Tilak Nagar which are identified as flood prone areas.


Provision of Pumps

Central Railway also planned to provide heavy-duty diesel and electric pumps for fast drainage as to ensure free flow of the storm water so that the water is drained out quickly from the tracks and train operations are not disrupted during the monsoon period.

 

Traction Distribution Wing

The TRD wing of Mumbai Division, Central Railway also ensuring the maintenance of Crossovers, Turnouts, Masts, Cantilevers etc for smooth operations of trains by operating power blocks. The Live Line Checking by Tower Wagon and Foot Patrolling of sections is being carried out to ensure healthiness of OHE gears for smooth running of trains.

 

The work being carried out are badly rusty portal booms removal, 47 nos. Tunnel OHE overhauling in Ghat sections, Checking and maintaining critical clearance under ROB/ FOB in entire BB division, Insulators cleaning by in-house technology of high-pressure jet. In Asangaon -Kasara section 17 nos badly rusty portal booms and 34 nos Upright masts cut and removed. In this section together line block margin is very less, Traction Distribution Department utilised lockdown period for removal of these masts. While executing the work proper physical distancing has been maintained and all staff at site used masks and sanitizers.

 

Electrical General

22KV, 3MVA Transformer cleaning and tightening of outgoing connections at TMS substation CSMT, Power Panel & lighting panel at Parcel building, CSMT cleaned and tightening of outgoing connections, All the rectifiers at CSMT platforms cleaned and tightening the loose connections and measure the temperature of outgoing connections, Overhauling and Breakdown attention of Pumps at various locations on Mumbai Division.

 

Ghat Sections

Running of boulder material train to scan + drop boulders

Operation of Hill gangs (expert, skilled gang) to identify loose boulders

Scanning/Sounding of Tunnels

Erection of steel structures approaching tunnels to protect boulder fallen on tracks, etc

 

Signal & Telecom

Completed meggering of cables in entire Mumbai division (which was only possible in such short time due to less/no traffic), 96 nos. of point motors sealed as part of monsoon preparedness. Panel Testing done at 2 stations, Point Machines & Signal unit replacement was also carried out.

 

Monsoon Precautions Booklet

Monsoon booklet for railway staff is also under preparation. The booklet will contain details related to monsoon (the dates of high tides during the monsoon, staff/officer duties etc)

 

Coordination meetings

Further coordination meetings are being done with MCGM authorities. Several new initiatives have been put in place by the Central Railway as part of the preparedness for monsoon this year.


Friday, May 15, 2020

ए.पी.एम.सी. मार्केट परिसरात संपूर्ण निर्जंतुकीकरणाचे काम सुरु यापुढे मार्केट सुरु करताना कोरोना नियंत्रक उपाययोजानांचे काटेकोर पालन करण्याचे आयुक्तांचे निर्देश

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना करीत असताना कोरोना बाधीतांचा तपशील तपासला असता त्यामध्ये सद्यस्थितीतील 910 कोरोना बाधीतांपैकी 356 कोरोना बाधीत व्यक्ती या तुर्भे येथील ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये काम करणा-या वा त्यांच्या निकटच्या संपर्कामुळे कोरोना बाधीत झालेल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा वाढता प्रसार रोखण्यासाठी ए.पी.एम.सी. मार्केट बंद ठेवणेबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. तथापि ए.पी.एम.सी. मार्केटव्दारे संपूर्ण एम.एम.आर.डी.ए. क्षेत्रातील भाजीपाला फळे, अन्नधान्य यांची गरज भागविली जात असल्याने ते पूर्णपणे बंद करणे शक्य नाही हे लक्षात घेऊन 11 मे पासून 17 मे पर्यंत संपूर्ण आठवडाभर ए.पी.एम.सी. मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

      या कालावधीत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण ए.पी.एम.सी. मार्केट परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा कामाला लागली असून त्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. सोमवारपासून कांदा-बटाटा, मसाला व अन्नधान्य या 3 मार्केट परिसराचे निर्जंतुकीकरण पूर्ण झाले आहे व आगामी 2 दिवसात भाजीपाला मार्केट व फळ मार्केट परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. या कामाची आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी, एपीएमसी मार्केटचे सचिव श्री. अनिल चव्हाण घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व मौलीक सूचना केल्या.  

      त्याचप्रमाणे ए.पी.एम.सी. मधील पाचही मार्केट 17 मे पर्यंत बंद राहणार असून या काळात तेथील व्यापारी कामगार, वाहतुकदार यांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे. यासाठी महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार 10 वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली असून 4 दिवसात अडीच हजारहून अधिक ए.पी.एम.सी. संबंधित व्यक्तींचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे.

          18 मे पासून ए.पी.एम.सी. मार्केटचे कामकाज पुन्हा सुरु करताना जास्तीत जास्त व्यवहार हे ऑनलाईन व्हावेत म्हणजे निर्मितीच्या ठिकाणाहून माल उचलून थेट विक्रेत्यापर्यंत पोहचेल व ए.पी.एम.सी. मार्केट आवारात वाहनांची वा माणसांची गर्दी होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी ए.पी.एम.सी. प्रशासनाला केलेल्या आहेत. 
        त्याचप्रमाणे ए.पी.एम.सी. मार्केट आवारात स्क्रिनिंग झालेल्या व्यक्तीलाच प्रवेश देण्यात यावा असे आयुक्तांनी स्पष्ट केलेले आहे. तसेच विक्रेते, कर्मचारी, कामगार, ग्राहक अशा सर्वच घटकांनी परस्परांमध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार सामाजिक अंतर  (सोशल डिस्टसिंग) राखले जाईल याचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी, मार्केट आवारात एकाच वेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, मार्केट आवारातील प्रत्येक व्यक्तीने नाक व तोंड झाकणारे मास्क परिधान करणे आवश्यक आहे. तसेच कामगार यांनी हॅण्डग्लोव्हज वापरणे बंधनकारक करावे, मार्केट आवारात हात धुण्यासाठी पुरेशा प्रमाणात आवश्यक व्यवस्था करण्यात यावी तसेच हॅण्ड सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे, मार्केट आवारात महानगरपालिकेशी संपर्क ठेवून वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे, मार्केट आवारात प्रवेश करताना व बाहेर पडताना प्रत्येक वाहनाचे निर्जंतुकीकरण करण्याची व्यवस्था ए.पी.एम.सी. मार्फत करण्यात यावी, मार्केट आवारात प्रवेश करणा-या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात यावे. त्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, मार्केट आवारात सर्दी, ताप, घशात खवखव अथवा श्वासोच्छवासास त्रास अशी लक्षणे आढळणा-या व्यापारी, कर्मचारी, कामगार यांना प्रवेश देण्यात येऊ नये तसेच अशा व्यक्तींची नावे, पत्ते, संपर्कध्वनी क्रमांक महानगरपालिकेस कळविण्यात यावेत अशाप्रकारच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आयुक्तांच्या वतीने ए.पी.एम.सी. प्रशासनास स्पष्ट करण्यात आले आहे.

Thursday, May 14, 2020

दिलासादायक बातमी ठाणे जिल्ह्यात वाढते आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण

ठाणे  जिल्ह्य़ातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या  प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. ही बाब ठाणे जिल्ह्यासाठी दिलासादायक असुन आज अखेर पर्यत  ७९८ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. 
जिल्ह्य़ात आतापर्यंत तब्बल २० हजार ९२४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील १५ हजार ९२३जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. तर  २७०७  जण कोरोनाग्रस्त आहेत. आज अखेरपर्यंत ८० जणांचे मृत्यू झाले आहेत. 
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली महसूल, आरोग्य, पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद सर्वच विभाग उपलब्ध सामग्री आणि मनुष्यबळ यांच्या आधारे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या जास्त होणार नाही यासाठी  सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. नियमांचे पालन  आणि संयम यावरच ही लढाई आपल्याला जिंकता येईल असा विश्वास जिल्हाधिकारी   यांनी व्यक्त केला. 
करोनाबाधितांना लवकरात लवकर करोनामुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. लवकरच जिल्ह्यातील करोनामुक्त रुग्णांच्या प्रमाणात वाढ होईल. नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या पालन करावे. नागरिकांनी  घरी रहावे  व सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे  व प्रशासनास सहकार्य करावे असे  आवाहन जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी सांगितले.

Tuesday, May 12, 2020

नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करणेबाबत.

प्रती,
मा. अण्णासाहेब मिसाळसर, भा.प्र.से.
आयुक्त तथा प्रशासक, 
नवी मुंबई महानगरपालिका
विषय : नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करणेबाबत:-
सर,
दोनच दिवसापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेवून आरोग्य विभागात सर्व कामगारांची भरती प्रक्रिया सुरू करा. नियमानुसार कामगारांना बढती द्या, असे त्यांनी सर्व पालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
नवी मुंबई महापालिका प्रशासनात वर्षानुवर्षे ठोक मानधनावर काम करत आहेत. त्यांची सेवा आजतागायत कायम झालेली नाही. नवी मुंबईकरांना नागरी सुविधा पुरविण्याचे व नागरी समस्या सोडविण्याचे महत्वपूर्ण काम या ठोक मानधनावरील कामगारांकडून करण्यात येत आहे. कोरोना काळातही हे कामगार आपल्या जिविताची पर्वा न करता तसेच आपल्या परिवाराचाही विचार न करता नवी मुंबईकरांची सेवा करत आहेत. या सेवेचा कोठेतरी आता प्रामाणिकपणे विचार होणे आवश्यक आहे. राज्य शासनाने इतर महापालिकांना भरतीबाबत निर्देश दिले आहेत, त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनात वर्षानुवर्षे ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांचीही सेवा कायम करण्यासाठी महापालिका प्रशासनाला निर्देश द्यावेत,
जे कामगार ठोक मानधनावर पालिकेत काम करीत आहे. त्यांचा विचार भरतीदरम्यान पालिका प्रशासनाने सर्वप्रथम करावा. त्यांना पालिका सेवेचा अनुभव असल्याने त्यांची सरसकट सेवा कायम करण्यात यावी. आरोग्य विभाग, घनकचरा विभाग,  महापालिका प्रशासनामधील सर्व विभागातील ठोक मानधनावरील कामगारांना पहिले थेट भरती करून घ्यावे. या कामगारांच्या सेवेबाबतचा प्रस्ताव आपण महापालिका प्रशासनाला तात्काळ बनविण्यास सांगावे आणि मुख्यमंत्र्यांकडून तसेच नगरविकास मंत्र्यांकडून या प्रस्तावास मंजुरी मिळवून घ्यावी.
पालिका प्रशासनात काम करताना काही कामगारांची वयोमर्यादाही उलटून गेलेली असणार. तथापि त्यांची पालिका प्रशासनातच सेवा असल्याने माणूसकीच्या निकषावर वय हा मुद्दा हा प्रतिष्ठेचा अथवा तांत्रिक अडचणीचा होवू नये. त्यांना कामाचा अनुभव आहे. बिनअनुभवी कामगार भरती करण्याएवजी याच अनुभवी कामगारांची त्या ठिकाणी वर्णी लागल्यास प्रशासनाचेही नुकसान होणार नाही. मागे यासंदर्भात मा. विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोळे यांची विधानभवनातील दालनात कामगारांच्या कायम सेवेबाबत पालिका अधिकारी व इंटकचे प्रतिनिधी यांची पटोळेसरांसमवेत बैठक झालेली आहे. त्यांनीही महापालिका प्रशासनाला या कामगारांच्या कायम सेवेबाबत निर्देश दिले आहेत.
आरोग्य विभागात सर्वप्रथम पालिका प्रशासन भरती करणार आहे, त्या भरतीत ठोक मानधनावर बहुउद्देशीय कामगार, परिचारिका, (anm, jnm), लिपिक, कंपाऊन्डर तसेच घनकचरा विभागातील सर्व ठोक मानधनवरील कर्मचारी, जीवाची पर्वा न करता काम करत असून त्यातल्या काहींना कोरोनाची लागणही झालेली आहे. अत्यंत कमी पगारात हे ठोक मानधनावरील कामगार काम करत आहेत. त्यांची सामाजिक सुरक्षा धोक्यात आलेली असून मानवअधिकाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपली सेवा आज ना उद्या कायम होईल या आशेने ते पालिका प्रशासनात ते काम करत आहे, त्यांच्या परिश्रमाला आता आपण न्याय मिळवून द्यावा व त्यांची सेवा कायम करण्याविषयी संबंधित विभागाना आपण निर्देश द्यावेत, ही आपणास नम्र विनंती.
आपला नम्र
श्री. रवींद्र सावंत
नवी मुंबई इंटक अध्यक्ष
नेरूळ तालुका कॉंग्रेस अध्यक्ष
दिनांक -११/०५/२०२०

Saturday, May 9, 2020

दररोज 500 कोरोना चाचण्या क्षमतेची लॅब नवी मुंबईत उभारा लोकनेते आमदार गणेश नाईक यांची मागणी


नवी मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणायची असेल तर जास्तीत जास्त नागरिकांच्या कोरोना चाचण्या होणे गरजेचे असून त्याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून स्वमालकीची नवी मुंबईत 500 कोरोना चाचण्या दररोज करण्याची क्षमता असलेली स्वतंत्र लॅब उभारा,अशी मागणी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.
लोकनेते आमदार नाईक यांनी या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते , ठाण्याचे जिल्हाधिकारी आदींना पाठवले आहे.
नवी मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 550 वर पोहोचला आहे. नवी मुंबईत महापालिका रुग्णालयात अथवा खासगी रुग्णालयात घेतलेले स्वाबचे नमुने तपासणीसाठी मुंबईतील प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. त्याचे अहवाल येण्यासाठी सहा ते सात दिवस लागतात. यादरम्यान ज्या संशयिताची कोरोना चाचणी झालेली असते आणि तो संशयित जर कोरोना बाधित असेल तर तो इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊन त्याच्यामुळे इतरांना संसर्गाचा धोका असतो. जर नवी मुंबई मध्येच प्रयोगशाळा स्थापन केली तर कोरोना चाचण्यांचे अहवाल लवकरात लवकर प्राप्त होतील आणि बाधित व्यक्तींवर तातडीने उपचार करणेही शक्य होणार आहे. यामुळे कोरोना ची लागण झालेल्या व्यक्तींमुळे इतरांना बाधा होण्याचा धोका कमी होणार आहे. अशा प्रकारची प्रयोगशाळा नवी मुंबईत सुरू करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक त्या सर्व परवानग्या महापालिकेला तत्परतेने द्याव्यात, अशी मागणी लोकनेते आमदार नाईक यांनी केली आहे.
झोपडपट्टी आणि गावठाण भागात घरोघरी आरोग्य तपासणी करावी
नवी मुंबईतील दाटीवाटीचे विभाग असलेल्या गावठाण आणि झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्याची मागणी देखील लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.
या विभागांमध्ये लहान आकाराची असलेली घरे आणि सार्वजनिक स्वच्छतागृहामुळे  कोरोना प्रसारासाठी पोषक वातावरण असते. गेल्या काही दिवसात या परिसरातून सातत्याने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यावर नियंत्रण करायचे असेल तर या भागात डॉक्टर आणि पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची पथके तयार करून येथील नागरिकांची नियमित तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत लोकनेते नाईक यांनी मांडले आहे. सोशल डिस्टन्स राखणे, हात धुणे, मास्कचा वापर करणे इत्यादी सुरक्षिततेच्या सवयींची त्यांना माहिती द्यावी. रहिवाशांकडून त्यांच्या आरोग्याची माहिती घेऊन त्यांचे थर्मल स्क्रीनिंग करावे. या आरोग्य तपासणी मध्ये कोरोना संशयित अथवा कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी पाठविणे., अशा सर्व उपाययोजनांमुळे गावठाण आणि झोपडपट्टी भागात कोरोना वर प्रभावीपणे नियंत्रण आणता येईल, येथील रुग्ण संख्येचा  उद्रेक टाळता येईल, असा विश्वास लोकनेते नाईक यांनी व्यक्त केला आहे.

आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी पावसाळापूर्व कामांचा आढावा घेत कार्यपूर्ततेसाठी दिली 25 मे ची डेडलाईन

 सध्या कोरोनामुळे आरोग्यविषयक आपत्तीजनक परिस्थितीला सामोरे जात असताना आगमी पावसाळी कालावधीच्या दृष्टीनेही सतर्क राहण्याची गरज असून महानगरपालिकेसह सर्व प्राधिकरणांनी पावसाळापूर्व कामे 25 मे पर्यंत पूर्ण करावीत व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशाप्रकारे कामांचे नियोजन करावे असे निर्देश महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले.

      पावसाळापूर्व नियोजनाबाबत शहर आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष बैठक आयुक्तांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे घेतली व संबंधित विविध प्राधिकरणांच्या अधिका-यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी महापालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात आयुक्तांसमवेत उपस्थित अधिकारी देखील सोशल डिस्टन्सींगचे पालन करून स्थानापन्न झाले होते. या बैठकीत त्यांनी पावसाळीपूर्व गटारे सफाई, नालेसफाई यांची सुरु असलेली कामे कोरोनाविषयीची आचारसंहिता पाळून तत्परतेने करावीत असे निर्देश देतानाच आवश्यकता भासल्यास सफाई कामगारांची व्यवस्था सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळून एखादे समाजमंदिर वा शाळेत करावी असेही आयुक्तांनी सूचित केले.

      अतिक्रमण विभागामार्फत महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे विभाग कार्यालयांच्या माध्यमातून तातडीने सर्वेक्षण करून त्याची सूची प्रसिध्द करणेबाबत आयुक्तांनी निर्देश दिले. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी विभागाने सध्या सुरु असलेली स्थापत्य कामे कोव्हीड - 19 ची आचारसंहिता पालन करून पावसाळ्यापूर्वी तातडीने करून घ्यावीत असेही आयुक्तांनी निर्देशित केले. पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी आत्ताच आवश्यक उपाययोजना करण्याचे त्यांनी सूचित केले. उद्यान विभागामार्फत करण्यात येणारी झाडांची छाटणीही विहित वेळेत पूर्ण करावी अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.

      सद्यस्थितीत लॉकडाऊनमुळे बांधकामे तसेच इमारत दुरूस्ती / नुतनीकरण कामे थांबलेली आहेत, त्यामधील पावसाळीपूर्व आवश्यक कामे करण्याकरिता कोव्हीड -19 च्या आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन याबाबतच्या परवानगीसाठी महापालिका स्तरावर एक समिती गठित करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त (1) श्रीम. सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली, सहा. संचालक नगररचना आणि नगररचनाकार असे सदस्य असणारी ही समिती बांधकाम / दुरूस्तीबाबत ऑनलाईन प्राप्त होणा-या निवेदनांवर कोव्हीड 19 च्या आचारसंहितेच्या व लॉकडाऊनच्या नियमांचा विचार करून महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने निर्णय घेईल व तो संबंधितांना कळविण्यात येईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

      कोव्हीड 19 च्या प्रसाराला प्रतिबंध आणण्यासाठी उपाययोजना करताना आरोग्य विभागाने आगामी पावसाळी कालावधी लक्षात घेऊन त्याचे पूर्वनियोजन करावे असे स्पष्ट करीत त्यादृष्टीने तातडीने पावले उचलावीत असे आयुक्तांनी निर्देशित केले.  

      या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे झालेल्या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या प्रमुखांसह सहभागी असलेल्या पोलीस, वाहतुक पोलीस, एमएसईडीसी, एपीएमसी या शासकीय प्राधिकरणांसह टीबीआयए, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असो., नागरी संरक्षण दल, मच्छिमार संघटना यांचे प्रतिनिधी यांच्याशी आयुक्तांनी सविस्तर चर्चा केली व झालेल्या कामांचा आढवा घेतला. तसेच इतर संबंधित प्राधिकरण / संस्थांना याबाबतच्या सूचना निर्गमित कराव्यात असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांना आयुक्तांनी दिले.   

      पावसाळापूर्व आपत्ती नियोजन करताना सर्व विभागांनी कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन घ्यावयाच्या खबरदारीची आदर्श कार्यप्रणाली (SOP) अद्ययावत करावी आणि महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे लवकरात लवकर संपर्कध्वनी क्रमांकासह द्यावी असेही आयुक्तांनी सूचित केले.

      कोरोनाशी लढताना त्यासोबतच आगामी पावसाळी कालावधी लक्षात घेऊन पावसाळापूर्व कामांकडे काटेकोर लक्ष देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्व संबंधित विभागांनी व प्राधिकरणांनी पावसाळापूर्व कामे 25 मे 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

Friday, May 8, 2020

Vashi APMC market will be closed from May 11 to 17

वाशीच्या हिरानंदानी हॉस्पिटलमधील दहावा कोविड-१९ रुग्ण यशस्वी उपचारानंतर स्वगृही रवाना

वाशी, नवी मुंबईफोर्टिस नेटवर्कचा भाग असलेल्या वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटल येथून कोविड-१९चा दहावा रुग्ण यशस्वी उपचारांनंतर आज घरी परतला. परदेश प्रवासाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या या ६५ वर्षीय पुरुष रुग्णाला कोरडा खोकला आणि घशाजवळ सौम्यशी जळजळ आणि घरघर अशा लक्षणांसाठी २८ एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यापूर्वी कोविड-१९च्या नऊ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, या सा-यांवर हॉस्पिटलच्या आयसोलेशन विंगमध्ये लक्षणांबरहुकुम उपचार करण्यात आले होते. अत्यंत बारकाईने केलेल्या नियोजनातून मुख्य हॉस्पिटलपासून अलग अशी ही खास कोविड-१९ विंग उभारण्यात आली असून रुग्णांच्या देखभालीसाठी आपापल्या घरांपासून दूर राहणारे आरोग्यकर्मी आणि बिगर-वैद्यकीय कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण खबरदारी याठिकाणी घेण्यात आली आहे.

 

 हॉस्पिटलचा दुसरा कोविड-१९ असलेल्या ५१ वर्षीय पुरुष रुग्णाला मोठ्या प्रमाणात धाप लागणे आणि खोकला या लक्षणांसाठी उपचार देण्यात आले. या रुग्णाला अंतिम टप्प्यावरील मूत्रपिंडाचा आजारही होता. 

- कोणताही परदेश प्रवास न केलेली ४४ वर्षीय स्त्री रुग्ण हॉस्पिटलची तिसरी रुग्ण होती व सततच्या कोरड्या खोकल्याची तक्रार असल्याने तिला येथे दाखल करण्यात आले होते.

- हॉस्पिटलची चौथी रुग्ण ही परदेश प्रवासाचा कोणतीही पार्श्वभूमी नसलेली एक ५२ वर्षीय महिला होती. सततचा ताप आणि त्याचबरोबर पॅन्क्रियाच्या कर्करोगाचा पूर्वेतिहासही असलेल्या या रुग्णावर हॉस्पिटलच्या आयसोलेशन विंगमध्ये उपचार करण्यात आले आणि उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले.

- पाचवा रुग्ण, कोणताही परदेश प्रवास न केलेला ३० वर्षीय पुरुष होता. या रुग्णामध्ये आजाराची कोणतीही लक्षणे नव्हती व इतर एका कोविड-१९ पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील माणसांच्या तपासणीतून या रुग्णाला विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले होते.

 सहावा रुग्ण असलेल्या ४८ वर्षीय पुरुषावर लक्षणांनुसार उपचार करण्यात आले. हा रुग्ण ताप, प्रचंड अंगदुखी आणि अशक्तपणाची तक्रार घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता.

-  कोणतीही लक्षणे न आढळलेल्या आणखी दोन रुग्णांमध्ये एक ३५ वर्षीय स्त्री रुग्ण व एका ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश होता. हे दोन्ही रुग्ण डायलिसिसवरही होते व त्यांच्या प्रकृतीच्या या अन्य तक्रारी लक्षात ठेवून त्यांना उपचार देण्यात आले.

नववा रुग्ण असलेल्या एक ३५ वर्षीय महिलेसही परदेश प्रवासाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. छातीत दुखणे, ताप, घसा बसणे, धाप लागणे, एकूणच अशक्तपणा आणि डोकेदुखी या लक्षणांवरून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ही महिला प्री-डायबेटिकसुद्धा होती. हॉस्पिटलच्या आयसोलेशन विंगमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले व त्यानंतर तिला घरी पाठविण्यात आले.

 

उपचारांना अधिकाधिक चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर हॉस्पिटलमधील मेडिकल टीम्सनी आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार घरच्या घरी क्वारंटाइनमध्ये राहताना घ्यावयाच्या काळजीविषयी सर्व रुग्णांचे समुपदेशन केले.

 

गुंतागुंतीची आणि गंभीर प्रकरणे हाताळण्याविषयी इंटरनल मेडिसीन विभागाच्या ज्येष्ठ सल्लागार डॉ. फराह इंगले आणि इंटेन्सिव्ह केअर विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर टी म्हणाले,  ''आम्ही नवजात बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, इतर गंभीर आजारांची पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांपासून ते सौम्यशी लक्षणे दाखविणा-यांपर्यंत खूप वेगवेगळ्या गटांत मोडणा-या रुग्णांवर उपचार करत आहोत. या आजारावरील उपचारांची संपूर्ण पद्धती समजावून घेत आमच्या टीम्स रुग्णांच्या वाढत्या संख्येशी दोन हात करण्यासाठी सुसज्ज आहे.''

 

कोविड-१९वर यशस्वी मात करत डिस्चार्ज घेणा-या रुग्णांविषयी बोलताना फोर्टिस नेटवर्कचा भाग असलेल्या हिरानंदानी हॉस्पिटल, वाशीचे फॅसिलिटी डायरेक्टर श्री. संदीप गुदुरु म्हणाले, ''रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा काळ मोठा कष्टप्रद आहे, कारण ते एकमेकांना भेटू शकत नाहीयेत. मात्र, या कुटुंबियांनी आमच्या टीम्सवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. दहा रुग्णांवरील उपचार पूर्ण झाले असून त्यांना घरी रवाना करण्यात आले आहे या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. या यशासाठी मी इथल्या वैद्यकीय आणि बिगर-वैद्यकीय कर्मचा-यांचे कौतुक करतो; ही मंडळी समाजाची अधिक चांगली सेवा करता यावी म्हणून निव्वळ कर्तव्यभावनेच्या पलीकडे जात सेवा बजावत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) अधिका-यांकडून आणि महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून मिळणारे पाठबळ यांच्या सहाय्याने प्रत्येक रुग्णावर जास्तीत-जास्त कार्यक्षमतेने उपचार करण्यावर, त्याची देखभाल करण्यावर आम्ही आपले लक्ष केंद्रित केले आहे व विषाणूविरोधातल्या या लढ्यामध्ये येणारे प्रत्येक आव्हान आम्ही पार करू असा आम्हाला विश्वास आहे.''

 

वाशी-ए नेटवर्क हॉस्पिटलद्वारे उभारण्‍यात आलेल्‍या कोविड-१९ टास्‍कफोर्सचे नेतृत्‍व डॉ. चंद्रशेखर टी.क्रिटीकल मेडिसीन विभागडॉ. फराह इंगळेइंटर्नल मेडिसीन विभागडॉ. ब्रजेश कंवरकार्डिओलॉजी विभागडॉ. अतुल इंगलेनेफ्रोलॉजी विभागडॉ. कुमार साळवीपेडिएट्रिक्‍स विभागआणि डॉ. सुजाता चक्रवर्तीजनरल मेडिसीन विभाग सांभाळत आहेत.


Thursday, May 7, 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एपीएमसी तात्काळ बंद करा लोकनेते आमदार गणेश नाईक यांची मागणी

एपीएमसी बाजार आवारातील अनेक घटकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यामुळे नवी मुंबई शहरात या रोगाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला असल्याने एपीएमसी तात्काळ बंद करावी,
अशी मागणी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. 
आमदार नाईक यांनी देशाचे पंतप्रधान ,राज्याचे मुख्यमंत्री ,पणन मंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते ,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ,कोकण विभागीय आयुक्त ,ठाण्याचे जिल्हाधिकारी यांना 7 मे 2020 रोजी पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. रुग्णांचा आकडा 484 च्या पलीकडे गेला आहे. एकूण रुग्ण संख्या पैकी शंभरपेक्षा अधिक बाधित झालेल्या व्यक्ती या एपीएमसी मधील व्यापारी, माथाडी ,मापाडी, अधिकारी-कर्मचारी आहेत किंवा  त्यांच्यामुळे बाधित झालेल्या त्यांच्या कुटुंबातील आणि समाजातील इतर व्यक्ती आहेत. अनेकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. एपीएमसीमध्ये दररोज दुपटीने मालाची आवक होते सहाजिकच त्यामुळे गर्दीही होते. सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. एपीएमसीमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या संसर्गामुळे बाजार आवारात भीतीचे वातावरण आहे. ही भीती येथील घटकांच्या मनामध्ये एवढी बसली आहे की काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाजार समिती व्यवस्थापनाकडे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेले आहेत. आपल्यामुळे आपल्या कुटुंबाच्या आणि समाजातील इतर व्यक्तींच्या जीवाशी खेळ नको अशी भूमिका येथील घटकांनी घेतली आहे. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून एपीएमसी मधील घटकांचे कोरोना संसर्गापासून रक्षण करण्यासाठी त्याच बरोबर बाजार आवारातील संसर्गाचा नवी मुंबई शहरात इतरत्र फैलाव रोखण्यासाठी परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत एपीएमसी तात्काळ बंद करावी असे आमदार गणेश नाईक यांनी आपल्या मागणी पत्रात नमूद केले आहे.
वाशीचे कामगार रुग्णालय विलगीकरण कशासाठी उपलब्ध करून द्यावे...
नवी मुंबईत कोरोना बाधीतांचा आकडा वाढतो आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात रुग्णवाढीचा वेग जास्त असेल असा अंदाज केंद्रीय पथकाने याअगोदरच महाराष्ट्राचा पाहणी दौरा करताना वर्तविला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता नवी मुंबई महापालिकेला देखील विलगीकरण कक्ष आणि वैद्यकीय उपचारासाठी जास्तीत जास्त जागांची आवश्यकता भासणार आहे. सध्या नवी मुंबई महापालिकेने काही इमारती ताब्यात घेऊन त्याठिकाणी अलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. पालिका रुग्णालयांमधून आणि काही खाजगी रुग्णालयांमधून कोरोना वर उपचार सुरू आहेत. यापुढील काळात वाढत्या रुग्णसंख्येचा धोका ओळखून अधिकाधिक इमारती पालिकेला उपलब्ध करून घ्याव्या लागतील. कोरोना विरोधातील या लढाईमध्ये पालिकेला सक्षम करण्याची गरज आहे. राज्य कामगार विमा कर्मचारी मंडळाच्यावतीने वाशी येथील कामगार रुग्णालय इमारतीचा अलीकडेच पुनर्विकास करण्यात आलेला आहे. रुग्णालयाची प्रशस्त इमारत बांधून पूर्ण झाली असून वापराविना पडून आहे. ही इमारत नवी मुंबई महापालिकेकडे काही काळ कोरोना वरील वैद्यकीय उपचारासाठी आणि विलगीकरण पक्षासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी महत्त्वाची मागणीदेखील आमदार गणेश नाईक यांनी 7 मे रोजी पत्र पाठवून केंद्रीय आरोग्यमंत्री ,राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, आरोग्यमंत्री कामगार मंत्री , विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Wednesday, May 6, 2020

नवी मुंबईसाठी 1000 खाटांचे कोरोना रुग्णालय तातडीने उभारा आमदार गणेश नाईक यांची मागणी

नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून तो 440च्या पार गेला आहे. केंद्र सरकारचे पथक अलीकडेच महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले होते त्यावेळेस मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल , असा धोका या पथकाने व्यक्त केला होता. नजीकच्या काळातील हा  धोका वेळीच ओळखून नवी मुंबई महापालिकेने अशा संभाव्य परिस्थितीला खंबीरपणे हाताळण्यासाठी नवी मुंबईमध्ये 1000 खाटांचे कोरोना उपचार रुग्णालय तातडीने उभारावे , अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. या मागणीचे लेखी पत्र त्यांनी 4 मे रोजी महापौर जयवंत सुतार आणि पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना दिले आहे.
नवी मुंबई मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे महापालिकेने उपचारासाठी पालिका रुग्णालयांमधून आणि काही खाजगी रुग्णालयांमधून सोय केलेली आहे काही इमारती ताब्यात घेऊन त्याठिकाणी अलगीकरण कक्ष सुरू केलेले आहेत. परंतु कोरोनाचा संभाव्य मोठा धोका पाहता या सुविधा अपुऱ्या पडण्याची शक्यता आहे. तोकड्या वैद्यकीय सेवा - सुविधांमुळे गोंधळा सारखी परिस्थिती उद्भवू नये याची वेळीच दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी लवकरात लवकर 1000 खाटांचे रुग्णालय सुरू करावे लागणार आहे असे आमदार नाईक यांनी म्हटले आहे.  ऑक्सिजन बेड ,बिना ऑक्सिजन बेड ,अति दक्षता कक्ष, पॅथॉलॉजी लॅब, फीवर क्लीनिक या सुविधांसह हे रुग्णालय सुसज्ज असावे अशी सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.  आमदार नाईक यांच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने अशाप्रकारचे 1000 खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्र हे या रुग्णालयासाठी सुयोग्य ठिकाण असून त्याची चाचपणी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ  करीत असल्याचे समजते.

Selfless & Nobel service rendered by Kharghar Forum and CITIZEN'S WARRIORS

Ever since *Narendra Modiji* decided to send the STRANDED workers to their respective states, looking at the fact that STRANDED workers have been suffering a lot.  *KHARGHAR FORUM* decided to find a way out for this situation and contacted Kharghar Police Station with a plan.
In collaboration between Kharghar Police and *Kharghar Forum CITIZENS WARRIOR Mrs. Gulshan Narulaji created a link for data entry* for Kharghar Police station.
Further by implementing *SINGLE WINDOW INITIATIVE* facilitated the  the STRANDED MIGRANT with one step service at one place. 
Service such as,
1. Form 
2. Xerox 
3. Medical Fitness Certificate 
4. Data Entry 
5. Group Formation 
6. City Bus to Panvel Railway Station.
It was ensured to have *100% data entry* of all the stranded workers of Madhya Pradesh,  which was updated using the link *by the CITIZEN WARRIORS of Kharghar Forum*. 
Seeing the departure of the last migrant group, gave the warriors a sigh of relief and feeling of happiness after which they took some rest and departed to their residence. 
Kharghar Forum is very proud of such CITIZEN's WARRIORS, who worked from 2.45pm to 9.45 pm, SELFLESSLY & CONTINUOUSLY for 7 hours*.
*Overwhelmed with the selfless and Nobel service rendered by Kharghar Forum and CITIZEN'S WARRIORS, Shri. Pradip Tidar (Senior police Inspector) kharghar police station FELICITATED the TEAM with a HANDMADE BOUQUET SPECIALLY CREATED THE POLICE THEMSELVES.* 
*Yesterday's CITIZENS WARRIORS* 
Kharghar FORUM 
1 Gulshan Narula Sec 10
2 Shankar Iyer Sec12
3 JayPrakash Dube Kamothe 
4 Surya Dudham Sec 5
5 Anjan Panigrahi Sec 5
6 Kaushal Sharma Sec 16
7 Mukesh Pawar Sec 20
8 Shastri Ji Sec
9 Atul Sandev Sec 21
10 Abhijit Mitra Sec 5
11 Rajesh Shrivastav Sec 15
12 Ramesh Yadav Sec 12
13 Abhay Kulkarni 
14 Kiran Gite Sec 11
15 Shamla Mam Sec 4
16 Sunita Bhor Kalamboli
And 
17 Leena Garad  . . . . . .
18 Arjun Garad . . . . . . .
👍🏻👍🏻👆🏻