Tuesday, June 2, 2020

'हेल्पलाईन डॅशबोर्ड फॉर सिटीझन' Navi Mumbai

'हेल्पलाईन डॅशबोर्ड फॉर सिटीझन' व्दारे नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार

आरोग्य सुविधांशी संबंधीत सर्व संपर्कध्वनी क्रमांक

 

      कोव्हीड 19 व नॉन कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना नागरिकांना कोव्हीड 19 विषयक व कोव्हीड 19 व्यतिरिक्त इतर वैद्यकीय सुविधा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात याकरिता महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी सुव्यवस्थित नियोजन केले असून नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधेशी संबंधीत अधिका-यांचे नाव व संपर्कध्वनी क्रमांक असलेला "हेल्पलाईन डॅशबोर्ड फॉर सिटीझन" प्रसिध्द केलेला आहे. हा हेल्पलाईन डॅशबोर्ड महानगरपालिकेची वेबसाईट www.nmmc.gov.in तसेच सर्व प्रकारच्या सोशल मिडीयावरून नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.

      या 'हेल्पलाईन डॅशबोर्ड फॉर सिटीझन'मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेशी संबंधीत विशेष सेवा आणि तक्रार याकरीता 1800222309 / 222310 हे दोन टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिकेची वेबसाईट www.nmmc.gov.in व NMMC e-connect ॲप यावरही सूचना व तक्रारी नोंदविता येतील असे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय https://www.nmmc.gov.in/navimumbai/grievance या पल्बिक ग्रिव्हेन्स सिस्टीमवरही सूचना / तक्रारी नोंदविता येणार आहेत.

      कोव्हीड विषयक माहितीकरीता 1075 हा सेंट्रल हेल्पलाईन क्रमांक तसेच 104 हा स्टेट हेल्पलाईन क्रमांक नमूद करण्यात आला असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरीता 022-27567269 आणि 022-35155012 हे 2 हेल्पलाईन क्रमांक सकाळी 10 ते सायं. 6 या वेळेत कोव्हीड विषयक सर्व माहिती पुरविण्यासाठी जाहीर करण्यात आलेले आहेत.

      त्याचप्रमाणे नॉन कोव्हीड सर्वसाधारण माहितीकरीता वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे यांचा 022-27567262 हा दूरध्वनी क्रमांक व 9920568715 हा मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे.

      कोरोना सदृष्य लक्षणे / होम क्वॉरंटाईन / कोणत्याही रुग्णालयातील बेड्स व सुविधा उपलब्धता याकरिता कोव्हीड 19 रुग्णालयीन मदतीसाठी उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांचा दुरध्वनी क्रमांक  022-27567334 व मोबाईल क्रमांक 9892920722 त्याचप्रमाणे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे यांचा 022-27567262 हा दूरध्वनी क्रमांक व 9920568715 हा मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे.

      कोव्हीड व नॉन कोव्हीड रुग्णावाहिका सेवेकरीता नवी मुंबई महानगरपालिकेने एकूण 50 रूग्णवाहिका उपलब्ध केल्या असून त्यकरिता शासकीय 108 हा दूरध्वनी क्रमांक तसेच 1800220047 हा रुग्णवाहिका नियंत्रण कक्षाचा क्रमांक त्याचप्रमाणे रुग्णवाहिका नियंत्रण अधिकारी डॉ. वैभव झुंझारे यांचा 022-27567266 हा दूरध्वनी क्रमांक आणि 9821591454 हा मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे. मॅटर्निटी सुविधेसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आलेली असून त्यासाठीही नागरिकांनी नियंत्रण कक्ष अथवा डॉ. वैभव झुंझारे यांच्याशीच संपर्क साधावयाचा आहे.

      नॉन कोव्हीड व कोव्हीड शववाहिकांची स्वतंत्र व्यवस्था असून त्यासाठीही रुग्णवाहिका नियंत्रण कक्ष अथवा डॉ. वैभव झुंझारे यांच्याशीच संपर्क साधावयाचा आहे.

      याशिवाय नमुंमपा आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक 022-27567060 व 7061 या डॅशबोर्डवर जाहीर करण्यात आलेले आहेत.

      नागरिकांना एकाच ठिकाणी वैद्यकीय सुविधांसाठी आवश्यक सर्व क्रमांक उपलब्ध व्हावेत ही "हेल्पलाईन डॅशबोर्ड फॉर सिटीझन" या मागील महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांची संकल्पना असून या डॅशबोर्डमुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व संपर्कध्वनी क्रमांक उपलब्ध होणार आहेत.

No comments:

Post a Comment