Wednesday, June 10, 2020

छत्रपतींच्या पुतळ्याजवळ मावळ्यांचे शिल्प, सुशोभीकरणासाठी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा पाठपुरावा

छत्रपतींच्या पुतळ्याजवळ मावळ्यांचे शिल्प, सुशोभीकरणासाठी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा पाठपुरावा 
पनवेल : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा जवळ उद्यानाचे सुशोभीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. 24 मार्चपासून कोरोना रोगापासून बचावकरता संपूर्ण देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यामुळे या कामाला ब्रेक मिळाला होता. जून महिन्यापासून या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून मंगळवारी सकाळपासून मावळे, हत्तींचे पुतळे बसवण्याच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आलेली आहे. सुशोभीकरणासाठी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पाठपुरावा केला होता.
             पनवेल शहर महापालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. दीड ते पावणे दोन कोटी खर्चून महाराजांच्या पुतळ्यासह आजूबाजूचा परिसर सुशोभित केला जात आहे.विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी या संदर्भात पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्या मागणीला यश असून कामाला सुरवात करण्यात आली होती. मात्र मध्यंतरी लॉक डाऊनमुळे काम थांबविण्यात आले होते. लॉकडाउन शिथिल करण्यात आल्याने पुन्हा पनवेल महानगर पालिकेनी अश्वारूढ़ छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण कामाला पुन्हा सुरु करण्यात आली असून मावळे आणि हत्ती शिल्प लावण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अशी एकुण २२ शिल्प आहेत. 
              पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील सुशोभीकरण्याच्या कामाला गती मिळाली आहे. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी शहरीकरणाचा मुद्दा मांडला होता. याकरिता पावणे दोन कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या परिसराचे संपूर्ण दगडी बांधकाम करण्यात आले आहे. 528 चौरस मीटर या जागेत 100 मीटर चौथरा बांधण्यात आला आहे. त्याची उंची साडेपाच फूट इतकी आहे. त्याचबरोबर पाठीमागील भिंत बांधण्यात आली आहे. परिसराला पाच फुटांचे संरक्षक भिंत बांधली आहे. यामध्ये जाळीचे आवरण करण्यात आले आहे. या ठिकाणी 11 दगडी बुरुजांची बांधणी करण्यात आली आहे. हे बांधकाम 20 मार्चपर्यंत सुरू होते, परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे 26 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्याने सुशोभीकरणाचे काम थांबविण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सहा फूट उंचीचे 15 मावळ्यांचे शिल्प उभारण्यात येत आहेत. त्याचबरोबर आठ फूट उंचीचे दोन हत्ती, घोडे, दोन तोफा या ठिकाणी बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर परिसरात हिरवळ आणि विद्युत रोषणाई ही करण्यात येणार आहे. यामध्ये शिवकालीन वेगवेगळ्या प्रसंगाचे एकूण चौदा चौदा फ्रेम असणार आहेत.



शिव छत्रपतीच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी वारंवार पाठपुरावा करत होतो. कित्येक वर्षांपासून सुशोभीकरण रखडले होते. सभागृहात विषय मांडून तो मंजूर करण्यात आला. सुशोभीकरणामुळे पनवेलची शान वाढणार आहे. मला याचा अभिमान वाटतो कि, छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी मी पाठपुरावा केला. लॉकडाऊन नंतर पुन्हा येथील कामाला सुरुवात करण्यात आली आहे. - विरोधी पक्षनेते, प्रीतम म्हात्रे

No comments:

Post a Comment