मनसेने आंदोलनाचा इशारा देताच महापालिका प्रशासन लागले कामाला !
निसर्ग चक्री वादळामुळे आठवडा भरापासून सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर, पदपथावर तसेच मैदानात कोसळून पडलेली झाडे उचलण्यास महापालिकेने केली सुरुवात !
काही दिवसांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्री वादळामुळे सानपाडा प्रभाग क्रमांक ७६ मध्ये झाडांचे प्रचंड नुकसान झाले होते. प्रभागात झाडे कोसळून रस्त्यावर, पदपथावर तसेच मैदानात पडलेली होती. मात्र हि झाडे हटविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून कानाडोळा केला जात होता. त्यामुळे गेल्या आठवडा भरापासून हि कोसळून पडलेली झाडे सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर, पदपथावर तसेच मैदानात बघायला मिळत होती. कोसळून पडलेल्या झाडांमुळे प्रभागातील सोसायटीच्या तसेच आजूबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झालेले पहावयास मिळत होते. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झालेली होती. त्यातच कोरोना सारख्या आजाराने थैमान घातल्याने कचऱ्यामुळे आता येथील रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे झाडांच्या कचऱ्याचे ढिग तात्काळ हटविण्यासाठी मनसेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री.समीर जाधव यांना मंगळवारी लेखी निवेदन देऊन मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मनसेने आंदोलनाचा इशारा देताच महापालिका प्रशासनाने आजपासून हा झाडांचा कचरा उचलण्यास सुरुवात केली.
No comments:
Post a Comment