Tuesday, June 30, 2020

विशेष प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये आज 30 जूनला 7800 घरांतील 25 हजारहून अधिक नागरिकांचे मास स्क्रिनींग

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या भागांमध्ये जास्त संख्येने कोरोना बाधित सापडले आहेत अशा  मोठ्या भागांमध्ये 29 जून ते 5 जुलै या काळात (दिवाळेगाव, करावेगाव, तुर्भे स्टोअर, सेक्टर 21 तुर्भे, सेक्टर 22 तुर्भेगाव, सेक्टर 11 जुहूगाव वाशी, सेक्टर 12 खैरणे-बोनकोडेगांव, सेक्टर 19 कोपरखैरणेगांव, राबाडेगांव, चिंचपाडा ऐरोली) तसेच दि. 30 जून ते 6 जुलै या काळात 2 भागांमध्ये (सेक्टर 1 ते 9 सीबीडी बेलापूर व वाशीगांव) विशेष प्रतिबंधित क्षेत्रे (Special Containment Zone) घोषित करून लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे.

      या लॉकडाऊनच्या काळात कोरोनाची साखळी खंडीत होण्याकरिता प्रभावी उपाययोजना राबवित घरोघरी जाऊन मास स्क्रिनींग हाती घेण्यात आले असून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी तुर्भे स्टोअर व कोपरखैरणे गाव या दोन विशेष प्रतिबंधात्मक क्षेत्रात 29 जून रोजी भेट देऊन मास स्क्रिनींगच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

      या 12 विशेष प्रतिबंधात्मक क्षेत्रांपैकी 29 जून रोजी 6 क्षेत्रांमधील मास स्क्रिनींगमध्ये 3463 घरांचे मास स्क्रिनींग करण्यात आले असून आज 30 जून रोजी 10 क्षेत्रांमध्ये 7796 घरांमधील 25503 व्यक्तींचे मास स्क्रिनींग करण्यात आले आहे.

 या मास स्क्रिनींगमध्ये जे कोव्हीड 19 संशयित सापडतील त्यांचे लगेच स्वॅब टेस्टिंग करुन संस्थात्मक विलगीकरण (Isolation) करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, कर्करोग, किडनीचे विकार अशा प्रकारे इतर दीर्घकालीन आजार असणाऱ्या व्यक्तींची वेगळी नोंद स्क्रिनींग दरम्यान केली जात आहे.

      या मास स्क्रिनींगमधून कोरोना संशयित सापडून त्यांचे विलगीकरण करणे शक्य होईल व त्यांच्यामुळे त्यांच्या निकटवर्तींयांना लागण होण्याचा संभाव्य धोका टळेल असा विश्वास व्यक्त करीत नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करून कोरोनाची साखळी खंडीत करावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले आहे. 



Friday, June 26, 2020

नवी मुंबईत लवकरच २०० आयसीयू बेड्स रुग्णसेवेत दाखल

नवी मुंबईत लवकरच २०० आयसीयू बेड्स रुग्णसेवेत दाखल

 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला करोनायुद्धाचा आढावा

 

·       मास स्क्रीनिंग, काँटॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याचे निर्देश

·       ऑक्सिजन, नॉन ऑक्सिजन बेड्स वाढवण्याच्या सूचना

·       जनरल प्रॅक्टिशनर्सना दवाखाने सुरू करण्याचे आवाहन

 

नवी मुंबई  नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णांच्या उपचारांत हयगय होऊ नये, यासाठी ऑक्सिजन व नॉन ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवण्याचे निर्देश देतानाच कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कठोर अमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिले. स्क्रीनिंगमुळे संभाव्य करोनाबाधित रुग्ण सुरुवातीच्याच टप्प्यात सापडून त्याचे जलद विलगीकरण करून करोनाची साखळी तोडणे शक्य होत असल्यामुळे स्क्रीनिंगचे प्रमाण वाढवतानाच महापालिकेची टेस्टिंग लॅब सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, नवी मुंबईत लवकरच २०० आयसीयू बेड्स रुग्णसेवेत दाखल होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

जूनच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आल्यानंतर करोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होत असल्याची गंभीर दखल घेत पालकमंत्री श्री. शिंदे यांनी शुक्रवारी नवी मुंबईतील पालिका आणि पोलिस प्रशासनासमवेत आढाव बैठक घेतली. लॉकडाउनमधून काही प्रमाणात मोकळीक दिली असली तरी ज्या भागांमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त आहे, अशा कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनची कठोर अमलबजावणी करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले. मास स्क्रीनिंग आणि काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर देतानाच तपासण्यांचे प्रमाण वाढवण्याची सूचनाही त्यांनी केली. नवी मुंबईत जास्त रुग्णसंख्या असलेले भाग हॉटस्पॉट म्हणून निश्चित करून तिथे २९ तारखेपासून लॉकडाऊनची कठोर अमलबजावणी करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले.

या बैठकीला खासदार राजन विचारे, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नवी मंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गंभीर रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक असलेली रेमडेसिवीर व अन्य औषधे मागवण्याचे निर्देशही श्री. शिंदे यांनी यावेळी महापालिकेला दिले. यामुळे गरीब गरजू रुग्णांना ही औषधे उपलब्ध होतील, असे श्री. शिंदे म्हणाले.

करोनाविरोधातील लढाईत आपण महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. गेल्या तीन-सव्वा तीन महिन्यांच्या लॉकडाउनमुळे आपण हजारो लोकांना करोनाची बाधा होण्यापासून वाचवले. तसेच, अनेकांचे प्राणही वाचवण्यात आपल्याला यश आले. करोनाविरोधातील लढाईत आपण आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात सैल करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने त्यात आणखी शिथिलता आणली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्कपणे या लढाईला सामोरे जावे लागेल, असे सांगून यात कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही श्री. शिंदे यांनी दिला. जनरल प्रॅक्टिशनर्सनी आपले दवाखाने सुरू ठेवून प्रशासनाला या युद्धात मदत करावी, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले.

Sunday, June 21, 2020

वीजदर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने वीजग्राहकांसाठी खास लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.

दि.२१ जून २०२० : लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी केलेल्या वीजवापराचे प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर संगणीकृत बिलिंग प्रणालीद्वारे एप्रिल, मे महिन्यासह जूनचे देण्यात आलेले तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल स्लॅब बेनिफीटसह योग्य व अचूक आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा अतिरिक्त भुर्दंड लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर वीजबिल दुरुस्तीसाठी कार्यालयांत गर्दी करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 
दरम्यान, दोन ते तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाची माहिती घेण्यासाठी तसेच स्लॅब बेनिफिट, भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीजवापर व स्लॅबप्रमाणे लावलेला वीजदर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने वीजग्राहकांसाठी खास https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. केवळ ग्राहक क्रमांक देऊन या लिंकद्वारे वीजबिलाचा संपूर्ण हिशोब व महावितरणकडून करण्यात आलेले ग्राहकांना वीजबिलांचे विश्लेषण पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
कोरोना विषाणूमुळे राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे महावितरणकडून मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र बंद करण्यात आले होते. रिडींग बंद झाल्यामुळे राज्यातील लघुदाब ग्राहकांना सरासरी वीजबिल देण्यात आले तसेच वेबपोर्टल व मोबाईल अॅपद्वारे मीटरचे रिंडीग पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये २ कोटी ३० लाख ग्राहकांपैकी केवळ २ लाख ६५ हजार वीजग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडींग पाठविले. त्याप्रमाणे त्यांना वीजवापराचे अचूक मासिक वीजबिल देण्यात येत आहे.  
उर्वरित वीजग्राहकांना पाठविण्यात आलेली सरासरी वीजबिले दुरुस्त करण्यासाठी रिडींग घेणे आवश्यक होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दि. १ जूनपासून स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागात मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र सुरु करण्यात आले आहे. मीटर रिडींग प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर वीजग्राहकांना लॉकडाऊन कालावधीमधील एप्रिल व मेसह जून महिन्याचे वीजबिल एकत्रित पाठविण्यात येत आहे. उदा. ग्राहकांना जूनमध्ये ३.०७ महिन्यांचे ३०७ युनिटचे वीजबिल आले असेल तर एप्रिल, मे व जूनमध्ये प्रत्येकी १०० युनिटचा वीजवापर झाला आहे. मात्र जूनच्या बिलातील ३०७ युनिटला थेट ३०१ ते ५०० युनिटचा स्लॅब दर न लावता तीन महिन्यांच्या प्रत्येकी १०० युनिटला ० ते १०० युनिटचा स्लॅब दर लावण्यात येत आहे. याशिवाय ३१ मार्चपर्यंत वापरलेल्या युनिटची संख्या दर्शवून ३१ मार्च 2020 पूर्वी जे वीजदर लागू होत तेच दर लावण्यात आले आहेत. एवढी अचूकता महावितरणने संगणीकृत प्रणालीमध्ये वापरलेली आहे. 
वीजग्राहकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत सरासरी वीजबिलांचा भरणा केला असल्यास जूनमधील तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलामध्ये एप्रिल व मे महिन्यांचा स्थिर आकार व विद्युत शुल्क वगळता उर्वरित रक्कम समायोजित करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी वीजबिलामध्ये नमूद करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना हिवाळ्यातील वीजवापराप्रमाणे सरासरी देयके पाठविण्यात आली होती. मात्र ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊनमध्ये वाढलेला प्रत्यक्ष वीजवापर व दि. १ एप्रिल २०२० पासून लागू झालेले नवीन वीजदर यामुळे एप्रिल, मे व जून महिन्यांचे मासिक परंतु एकत्रित दिलेले वीजबिल अधिक युनिटचे व रकमेचे असण्याची शक्यता आहे.
एप्रिल, मे व जून महिन्यांचे वीजबिल वीजग्राहकांना एकत्रित परंतु, स्वतंत्र मासिक हिशोबानुसार देण्यात आलेले आहे. हे तीन महिन्यांचे जूनमध्ये देण्यात आलेले वीजबिल अतिशय अचूक आहे. योग्य स्लॅब व वीजदरानुसार तसेच प्रत्यक्ष वीजवापरानुसारच आहे. एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड या वीजबिलामध्ये लावण्यात आलेला नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी कोणताही संभ्रम न ठेवता वीजबिल दुरुस्तीसाठी कार्यालयात जाऊ नये तसेच महावितरणच्या अधिकृत वीजबिल केंद्र किंवा घरबसल्या ऑनलाईनद्वारे वीजबिलाच्या रकमेचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

Thursday, June 18, 2020

शाळा सुरु करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आराखडा तयार करावा लोकनेते आ.गणेश नाईक यांची सुचना

नवी मुंबई प्रतिनिधी
टप्प्याटप्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने  घेतला आहे. मात्र त्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आराखडा तयार करावा आणि पालकांमधील संभ्रमाचे वातावरण दूर करावे, अशी सुचना लोकनेेते आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षणाधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
शाळा सुरु झाल्यावर कोरोना संक्रमणाचा धोका वाढणार आहे. विद्यार्थ्यांना वर्गात अंतर ठेवून बसण्याची सोय, स्कूल बसमध्ये प्रवास करताना सोशल डिस्टंसिंग कसे पाळणार, दररोज विद्यार्थ्यांसह शाळेत प्रवेश करणार्‍यांचे थर्मल स्क्रिनिंग करणार काय, वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण किती  वेळा करणार  या सर्व उपाययोजनांचे वेळापत्रक ठरवून मुल्यमापन करणे गरजेचे असल्याचे लोकनेेते नाईक यांनी म्हंटले आहे.
दुसरीकडे शासनाने सध्या सुरु केलेल्या ऑनलाईन शिक्षणामध्ये अनेक त्रुटी असून ८० टक्के विद्यार्थी आणि पालक नाखुष असल्याचे लोकनेेते नाईक यांनी म्हंटले आहे. राज्यातील ग्रामिण भागातील आणि  शहरातील गरीब विद्यार्थ्यांकडे स्वतंत्र मोबाईल संच, इंटरनेट सेवा, नेटवर्क इत्यादीचा आभाव आहे. त्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे कठिण बनले आहे. तासनतास मोबाईलकडे बघून विद्यार्थ्यांच्या डोळयांवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याचा धोका आहे. विशेषतः अपंग विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण जीवाला घोर असणार आहे.  
तीसरी महत्वाची बाब म्हणजे  शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१मध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे शाळांमधील सुविधांचा वापर होणार नाही. शाळांच्या खर्चाची बचत होणार असेल तर पालक-शिक्षक कमिटीच्या बैठकीत चर्चा करुन विद्यार्थ्यांना फि मध्ये सवलत देण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी शाळा या दृष्टीने चालढकल करीत आहेत, असे लोकनेते नाईक यांनी निदर्शनास आणले आहे. शाळांनी फिवाढ न करता विद्यार्थ्यांना प्रचलित फि मध्ये सवलत द्यावी आणि  शासनाच्या या संदर्भातील निर्देशांचे महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याची खबरदारी शिक्षणाधिकार्‍यांनी घ्यावी, अशी मागणी लोकनेते नाईक यांनी केली आहे.

Saturday, June 13, 2020

Navi Mumbai इंडिया बुल्स येथील कोव्हिड केअर सेंटर मधून कोरोनाबाधित अथवा त्यांच्या निकटच्या संपर्कातील 100 टक्के व्यक्ती ब-या होऊन सुखरूप परतल्या घरी

  13 मार्चला नवी मुंबईमध्ये फिलीपाईन्स प्रवाशाच्या माध्यमातून पहिला कोरोना बाधित व्यक्ती वाशीत सापडण्याच्या आधीपासूनच नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड 19 विषयी आवश्यक खबरदारी घेण्यास सुरूवात केली होती. सुरूवातीच्या काळातील कोव्हीड 19 विषयक शासकीय मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता परदेशी प्रवास करून आलेल्या प्रत्येक व्यक्तींना क्वारंटाईन करणे आवश्यक होते.

      त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने योग्य जागांचा शोध सुरू केला असता कोन, पनवेल येथील इंडिया बुल्स इमारतींमध्ये क्वारंटाईन करण्यासाठीच्या मार्गदर्शक सुचनांस अनुरूप अशा स्वतंत्र इमारती उपलब्ध असून त्यामध्ये एका व्यक्तीसाठी एक अशा पुरेशा आकारमानाच्या स्वतंत्र खोल्या व कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत योग्य अशा स्वच्छतागृहाची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध असल्याचे मा. कोकण विभागीय आयुक्त यांचेमार्फत सूचित करण्यात आले. त्यांच्या सूचनेनुसार त्यामधील इमारती नवी मुंबई महानगरपालिकेकरिता उपलब्ध करून घेण्यात आल्या.

      सुरूवातीच्या काळात कोरोनाच्या भीतीने आमच्या विभागात कोरोनाचे विलगीकरण कक्ष नकोत अशाप्रकारे येथील नागरिकांकडून विरोध होत होता. अशावेळी कोरोनाची संसर्गातून होणारी लागण टाळण्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र खोली व स्वतंत्र स्वच्छतागृह असलेली अत्यंत उपयोगी व्यवस्था इंडिया बुल्स येथे सहजपणे व कमी खर्चात उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे कोव्हीड 19 उपचारासाठी आवश्यक असलेली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी योग्य असे मोकळे वातावरण व हवामान याची त्याठिकाणी असलेली उपलब्धता याचाही विचार करण्यात आला व इंडिया बुल्स येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात आले.

      हे कोव्हीड केअर सेंटर नवी मुंबई शहरापासून काहीसे दूर अंतरावर असल्याने काही नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी विविध माध्यमांचा आधार घेतला. त्याची दखल घेत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी तेथील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली व त्यामध्ये अधिक सुधारणांच्या दृष्टीने निर्देशही दिले. तेथील वातावरण हे लवकर बरे होण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक होते व तेथे आवश्यक सुविधा व उपचारांची सोय व्यवस्थितरित्या उपलब्ध करून देण्यात आली होती. यामुळे तेथील व्यवस्थेबद्दल अनेक नागरिकांनी विविध माध्यमांतून समाधानही व्यक्त केले.

      त्याठिकाणी कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रूग्णांसाठी स्वतंत्र इमारतीमध्ये व्यवस्था होती तसेच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईन करणे आवश्यक असलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र इमारतीत व्यवस्था होती. ज्यामधून कोरोनाची साखळी खंडीत होण्यासाठी मदत झाली.  

      त्यामुळे इंडिया बुल्स येथे दाखल करण्यात आलेल्या 10 एप्रिलपासून ते आत्तापर्यंतच्या नागरिकांची आकडेवारी तपासली असता 799 कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती ब-या होऊन तसेच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या निकटच्या संपर्कात आलेल्या 931 क्वारंटाईन व्यक्तींपैकी 100 टक्के म्हणजेच 1730 व्यक्ती सुखरूप घरी परतल्या आहेत. त्यामुळे इंडिया बुल्स येथील कोव्हिड केअर सेंटरचा उपयोग निश्चितच चांगल्या प्रकारे झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याठिकाणी उपचार करणा-या किंवा आरोग्य सेवा पुरविणा-या एकाही डॉक्टर अथवा पॅरामेडिकल स्टाफला कोरोनाची लागण झालेली नाही.

      यापुढील पावसाळी कालावधी लक्षात घेता इंडिया बुल्स येथे कोव्हीड 19 संबंधित व्यक्तींना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये यादृष्टीने तसेच सेक्टर 30 ए वाशी मध्ये सिडको एक्झिबिशन सेंटर येथे महानगरपालिकेमार्फत सीसीसी व डिसीएचसी सुविधा असणारे कोव्हीड 19 रूग्णालय सुरू झाले असल्याने इंडिया बुल्स येथे सध्या कोव्हीड 19 संबंधित व्यक्ती न पाठविण्याचे महानगरपालिेकेने ठरविलेले आहे. तथापि त्याठिकाणी आत्तापर्यंत ठेवण्यात आलेले कोरोनाबाधित वा त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती यांच्या प्रकृती सुधारणेसाठी आरोग्याच्या दृष्टीने इंडिया बुल्स येथील व्यवस्था लाभदायकच ठरलेली दिसून येते. 

Wednesday, June 10, 2020

MLA Naik very Serious about COVID-19 cases in city met with NMMC Chief Annasaheb Misal


Former Minister and Airoli MLA Ganesh Naik met with NMMC Commissioner Annasaheb Misal June 10. The visit was to follow up on the most pressing issues in the backdrop of fighting the COVID-19 pandemic in Navi Mumbai. There is an absolute lax in measures and issues by the NMMC administration. Airoli MLA Ganesh Naik first met the NMMC Commissioner in his office and took up several issues that the administration seems to be overlooking in Navi Mumbai in the backdrop of COVID-19 pandemic. From the delay in making the NMMC created COVID Hospital at Vashi’s CIDCO Exhibition Ground, to the negligence against schools demanding fees, MLA Ganesh Naik demanded efforts and actions to contain the pandemic and its impact on citizens lives and health in Navi Mumbai on war footing. It is rather unfortunate that, the NMMC created COVID Hospital at Vashi’s CIDCO Exhibition Ground is being delayed for a political inauguration. Citizens lives are at stake. It’s unfortunate if some people are trying to seek political mileage from the COVID-19 pandemic in Navi Mumbai like this.

NMMC सन 2020-21 मधील अनधिकृत शाळांची यादी

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक 20 मार्च2020 अखेर खालील प्राथमिक शाळा शासनाची/नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता  घेता अनधिकृत चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. आर.टी.ई. अधिनियम 2009 मधील कलम-18 अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही.  तरी संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या म.न.पा. किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे आणि परवानगी शिवाय सुरू केलेली शाळा बंद करावी. तसेच या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत.  ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेतत्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजीकच्या शासन मान्य शाळेत प्रवेश घ्यावा.  जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.


छत्रपतींच्या पुतळ्याजवळ मावळ्यांचे शिल्प, सुशोभीकरणासाठी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा पाठपुरावा

छत्रपतींच्या पुतळ्याजवळ मावळ्यांचे शिल्प, सुशोभीकरणासाठी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा पाठपुरावा 
पनवेल : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा जवळ उद्यानाचे सुशोभीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. 24 मार्चपासून कोरोना रोगापासून बचावकरता संपूर्ण देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यामुळे या कामाला ब्रेक मिळाला होता. जून महिन्यापासून या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून मंगळवारी सकाळपासून मावळे, हत्तींचे पुतळे बसवण्याच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आलेली आहे. सुशोभीकरणासाठी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पाठपुरावा केला होता.
             पनवेल शहर महापालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. दीड ते पावणे दोन कोटी खर्चून महाराजांच्या पुतळ्यासह आजूबाजूचा परिसर सुशोभित केला जात आहे.विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी या संदर्भात पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्या मागणीला यश असून कामाला सुरवात करण्यात आली होती. मात्र मध्यंतरी लॉक डाऊनमुळे काम थांबविण्यात आले होते. लॉकडाउन शिथिल करण्यात आल्याने पुन्हा पनवेल महानगर पालिकेनी अश्वारूढ़ छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण कामाला पुन्हा सुरु करण्यात आली असून मावळे आणि हत्ती शिल्प लावण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अशी एकुण २२ शिल्प आहेत. 
              पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील सुशोभीकरण्याच्या कामाला गती मिळाली आहे. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी शहरीकरणाचा मुद्दा मांडला होता. याकरिता पावणे दोन कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या परिसराचे संपूर्ण दगडी बांधकाम करण्यात आले आहे. 528 चौरस मीटर या जागेत 100 मीटर चौथरा बांधण्यात आला आहे. त्याची उंची साडेपाच फूट इतकी आहे. त्याचबरोबर पाठीमागील भिंत बांधण्यात आली आहे. परिसराला पाच फुटांचे संरक्षक भिंत बांधली आहे. यामध्ये जाळीचे आवरण करण्यात आले आहे. या ठिकाणी 11 दगडी बुरुजांची बांधणी करण्यात आली आहे. हे बांधकाम 20 मार्चपर्यंत सुरू होते, परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे 26 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्याने सुशोभीकरणाचे काम थांबविण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सहा फूट उंचीचे 15 मावळ्यांचे शिल्प उभारण्यात येत आहेत. त्याचबरोबर आठ फूट उंचीचे दोन हत्ती, घोडे, दोन तोफा या ठिकाणी बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर परिसरात हिरवळ आणि विद्युत रोषणाई ही करण्यात येणार आहे. यामध्ये शिवकालीन वेगवेगळ्या प्रसंगाचे एकूण चौदा चौदा फ्रेम असणार आहेत.



शिव छत्रपतीच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी वारंवार पाठपुरावा करत होतो. कित्येक वर्षांपासून सुशोभीकरण रखडले होते. सभागृहात विषय मांडून तो मंजूर करण्यात आला. सुशोभीकरणामुळे पनवेलची शान वाढणार आहे. मला याचा अभिमान वाटतो कि, छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी मी पाठपुरावा केला. लॉकडाऊन नंतर पुन्हा येथील कामाला सुरुवात करण्यात आली आहे. - विरोधी पक्षनेते, प्रीतम म्हात्रे

विरोधी पक्ष नेता प्रीतम म्हात्रे यांनी दिले अजगराला जीवनदान

विरोधी पक्ष नेता प्रीतम म्हात्रे यांनी दिले अजगराला जीवनदान 
पनवेल : जुन्या मुंबई पुणे महामार्ग येथील खालापूर येथे प्रितम म्हात्रे यांच्या फार्म हाऊस मध्ये सकाळ च्या दरम्यान 11 फुटाचा अजगर आढळून आला. स्वतः प्रीतम म्हात्रे आणि फॉर्म हाऊस काम करणारे गणेश महादू कैवारी आणि अनिल शिवाजी पवार यांनी त्याला पकडले. त्यानंतर त्यांनी खालापूरच्या फॉरेस्ट ऑफिसर व त्यांच्या कर्मचार्‍यांना हा अजगर सुपूर्द केला. त्यामुळे अजगराला जीवनदान मिळाले आहे. 
अजगर बघताच अनेकांना धडकी भरते.  काही जण त्यांना मारून टाकतात. हल्लीच जेवणाच्या शोधात असणार्‍या एका गर्भवती हत्तींनीला मारण्यात आले असताना दुसरीकडे विरोधी पक्ष नेत्यांनी या अजगराला जीवदान दिले आहे. त्यामुळे पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या या धाडसाचे व औदार्याचे सर्वञ कौतुक होत आहे.

मनसेने आंदोलनाचा इशारा देताच महापालिका प्रशासन लागले कामाला !

मनसेने आंदोलनाचा इशारा देताच महापालिका प्रशासन लागले कामाला ! 
निसर्ग चक्री वादळामुळे आठवडा भरापासून सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर, पदपथावर तसेच मैदानात कोसळून पडलेली झाडे उचलण्यास महापालिकेने केली सुरुवात ! 
काही दिवसांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्री वादळामुळे सानपाडा प्रभाग क्रमांक ७६ मध्ये झाडांचे प्रचंड नुकसान झाले होते. प्रभागात झाडे कोसळून रस्त्यावर, पदपथावर तसेच मैदानात पडलेली होती. मात्र हि झाडे हटविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून कानाडोळा केला जात होता. त्यामुळे गेल्या आठवडा भरापासून हि कोसळून पडलेली झाडे सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर, पदपथावर तसेच मैदानात बघायला मिळत होती. कोसळून पडलेल्या झाडांमुळे प्रभागातील सोसायटीच्या तसेच आजूबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झालेले पहावयास मिळत होते. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झालेली होती. त्यातच कोरोना सारख्या आजाराने थैमान घातल्याने कचऱ्यामुळे आता येथील रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे झाडांच्या कचऱ्याचे ढिग तात्काळ हटविण्यासाठी मनसेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री.समीर जाधव यांना मंगळवारी लेखी निवेदन देऊन मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मनसेने आंदोलनाचा इशारा देताच महापालिका प्रशासनाने आजपासून हा झाडांचा कचरा उचलण्यास सुरुवात केली.






Tuesday, June 9, 2020

पावसाळा कालावधीत वृक्ष / वृक्षांच्या फांद्या उचलणेबाबत कार्यवाहीसाठी जाहीर आवाहन

पावसाळी कालावधीत जोरदार वा-यामुळे पडणारे वृक्ष व वृक्षाच्या फांदयामुळे रस्ते वाहतुकीला आणि रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय होते. याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक मा.श्री. अण्णासाहेब मिसाळ यांचे मार्गदर्शनानुसार, जोरदार वारा आणि पावसामुळे पडलेले वृक्ष व वृक्षाच्या फांदया त्वरित उचलण्याकरिता आणि वाहतुकीला आणि रहदारीला निर्माण होणारे अडथळे दूर करुन नागरिकांना यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने नियोजन करण्यात आलेले आहे.

आपत्कालीन प्रसंगी वृक्ष व वृक्षांच्या फांद्या कोसळून वाहतुकीला, रहदारीला अडचण निर्माण होत असल्याचे नागरिकांना आढळल्यास त्याबाबतच्या तत्पर कार्यवाहीसाठी कृपया संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी ( दिघा ते बेलापूर 8 विभाग कार्यालये ) यांचेशी किंवा 101 या क्रमांकावर अग्निशमन विभाग यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. या संदर्भात नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या https://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर (वेबसाईट) तक्रार निवारण प्रणाली (public grievance system) मध्ये ऑनलाईन तक्रारही दाखल करता येईल.

याशिवाय गृहनिर्माण सोसायटी परिसरातील वृक्षांच्या अनावश्यक / धोकादायक फांद्या छाटणी करावयाची असल्यास परवानगीसाठी निम्नदर्शित नमूद करण्यात आलेल्या विभाग कार्यालयाकडील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचेशी संपर्क साधता येईल.

  तरी पावसाळी कालावधीत पडलेले वृक्ष व वृक्षांच्या फांद्या यामुळे वाहतुकीला व रहदारीला अडचण निर्माण होऊ नये आणि गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधेचा नागरिकांनी उपयोग करून घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. 

Monday, June 8, 2020

एन.एम.एम.टी. कडून प्रवाशांना 215 बसेसव्दारे 858 बसफे-यांची सुविधा उपलब्ध

संपूर्ण देशात कोरोना (COVID-19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखावा याकरिता 25 मार्च 2020 पासून संपूर्ण देशात टाळेबंदी (LOCK DOWN) लागू करण्यात आली आहे. या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने लॉकडाऊनचे उद्दिष्ट साध्य व्हावे व अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कामाचे ठिकाण ते निवासस्थान या दरम्यान बस सेवा उपलब्ध करुन दिली आहे.

      ही सेवा पुरवित असताना कर्मचारी संख्या, कामाच्या वेळा व सोशल डिस्टंन्सींग या नियमांचे उल्लंघन होणार नाही याबाबतची दक्षता घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार बसेस व बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 

      याव्दारे रुग्णालये, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना त्यांच्या निवासस्थानापासून कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी नवी मुंबई शहर तसेच ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, पनवेल, उरण, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, दहिसरमोरी, खारघर, उलवे इत्यादी ठिकाणाहून बस सेवा पूरविली जात आहे. या माध्यमातून  दैनंदिन 112  बसेसच्या 398 फे-यांव्दारे अत्यावश्यक सेवेतील दैनंदिन सरासरी 10 हजार कर्मचा-यांना या प्रवाशी सेवेचा लाभ होत आहे.

      महाराष्ट्र शासनाने मिशन बिगीन अगेन (Unlock – 1) च्या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात प्रवासावरील निर्बंध उठविले आहेत. या पार्श्वभूमीवर 08 जून 2020 पासून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने लॉकडाऊन कालावधीतील अत्यावश्यक दैनंदिन 112 बसेसच्या 398 फे-यांच्या सेवेबरोबरच सर्वसामान्य प्रवासी नागरिकांसाठी तसेच सरकारी, खाजगी कार्यालयांमधील सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सोशल व फिजीकल डिस्टंन्सींग या नियमाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेत प्रवाशांना मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बसमधील आसन क्षमतेच्या 50% व 5 अथवा 3 प्रवाशांना उभे राहून प्रवासाची मुभा असेल. एन.एम.एम.टी मार्फत पुर्वीच्या 112 बसेस सोबतच वाढीव 22 बस मार्गांवर दैनंदिन 103 जादा बसेसचे जादा शेडयुल एन.एम.एम.टी. मार्फत कार्यान्वित करण्यात आलेले आहे. एन.एम.एम.टी. मार्फत प्रवाशांना 215 बसेसव्दारे 858 बस फे-यांची प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

आज 08 जून 2020 पासून नवी मुंबई शहर व लगतच्या परिसरातील प्रवासी नागरिकांना 215 बसेसच्या माध्यमातून 858 बस फेऱ्यांव्दारे प्रवासी वाहतूकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार व प्रवाशी संख्येचा आढावा घेऊन गरजेनुसार बस फेऱ्यांमधे वाढ करण्यात येईल असे सूचित करण्यात येत आहे.



Tuesday, June 2, 2020

'हेल्पलाईन डॅशबोर्ड फॉर सिटीझन' Navi Mumbai

'हेल्पलाईन डॅशबोर्ड फॉर सिटीझन' व्दारे नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार

आरोग्य सुविधांशी संबंधीत सर्व संपर्कध्वनी क्रमांक

 

      कोव्हीड 19 व नॉन कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना नागरिकांना कोव्हीड 19 विषयक व कोव्हीड 19 व्यतिरिक्त इतर वैद्यकीय सुविधा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात याकरिता महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी सुव्यवस्थित नियोजन केले असून नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधेशी संबंधीत अधिका-यांचे नाव व संपर्कध्वनी क्रमांक असलेला "हेल्पलाईन डॅशबोर्ड फॉर सिटीझन" प्रसिध्द केलेला आहे. हा हेल्पलाईन डॅशबोर्ड महानगरपालिकेची वेबसाईट www.nmmc.gov.in तसेच सर्व प्रकारच्या सोशल मिडीयावरून नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.

      या 'हेल्पलाईन डॅशबोर्ड फॉर सिटीझन'मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेशी संबंधीत विशेष सेवा आणि तक्रार याकरीता 1800222309 / 222310 हे दोन टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिकेची वेबसाईट www.nmmc.gov.in व NMMC e-connect ॲप यावरही सूचना व तक्रारी नोंदविता येतील असे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय https://www.nmmc.gov.in/navimumbai/grievance या पल्बिक ग्रिव्हेन्स सिस्टीमवरही सूचना / तक्रारी नोंदविता येणार आहेत.

      कोव्हीड विषयक माहितीकरीता 1075 हा सेंट्रल हेल्पलाईन क्रमांक तसेच 104 हा स्टेट हेल्पलाईन क्रमांक नमूद करण्यात आला असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरीता 022-27567269 आणि 022-35155012 हे 2 हेल्पलाईन क्रमांक सकाळी 10 ते सायं. 6 या वेळेत कोव्हीड विषयक सर्व माहिती पुरविण्यासाठी जाहीर करण्यात आलेले आहेत.

      त्याचप्रमाणे नॉन कोव्हीड सर्वसाधारण माहितीकरीता वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे यांचा 022-27567262 हा दूरध्वनी क्रमांक व 9920568715 हा मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे.

      कोरोना सदृष्य लक्षणे / होम क्वॉरंटाईन / कोणत्याही रुग्णालयातील बेड्स व सुविधा उपलब्धता याकरिता कोव्हीड 19 रुग्णालयीन मदतीसाठी उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांचा दुरध्वनी क्रमांक  022-27567334 व मोबाईल क्रमांक 9892920722 त्याचप्रमाणे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे यांचा 022-27567262 हा दूरध्वनी क्रमांक व 9920568715 हा मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे.

      कोव्हीड व नॉन कोव्हीड रुग्णावाहिका सेवेकरीता नवी मुंबई महानगरपालिकेने एकूण 50 रूग्णवाहिका उपलब्ध केल्या असून त्यकरिता शासकीय 108 हा दूरध्वनी क्रमांक तसेच 1800220047 हा रुग्णवाहिका नियंत्रण कक्षाचा क्रमांक त्याचप्रमाणे रुग्णवाहिका नियंत्रण अधिकारी डॉ. वैभव झुंझारे यांचा 022-27567266 हा दूरध्वनी क्रमांक आणि 9821591454 हा मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे. मॅटर्निटी सुविधेसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आलेली असून त्यासाठीही नागरिकांनी नियंत्रण कक्ष अथवा डॉ. वैभव झुंझारे यांच्याशीच संपर्क साधावयाचा आहे.

      नॉन कोव्हीड व कोव्हीड शववाहिकांची स्वतंत्र व्यवस्था असून त्यासाठीही रुग्णवाहिका नियंत्रण कक्ष अथवा डॉ. वैभव झुंझारे यांच्याशीच संपर्क साधावयाचा आहे.

      याशिवाय नमुंमपा आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक 022-27567060 व 7061 या डॅशबोर्डवर जाहीर करण्यात आलेले आहेत.

      नागरिकांना एकाच ठिकाणी वैद्यकीय सुविधांसाठी आवश्यक सर्व क्रमांक उपलब्ध व्हावेत ही "हेल्पलाईन डॅशबोर्ड फॉर सिटीझन" या मागील महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांची संकल्पना असून या डॅशबोर्डमुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व संपर्कध्वनी क्रमांक उपलब्ध होणार आहेत.

Monday, June 1, 2020

Sea conditions will be rough to very rough along and off Maharashtra cost from June 3

 मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांचेमार्फत भारतीय हवामान खात्याची  दि. 31 मे 2020 रोजीचा  धोक्याची सूचना नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागास प्राप्त झालेली आहे. या पत्रात ‘ Low pressure area over Southeast and adjoining Eastcentral Arabian Sea and Lakshadweep area: Pre-Cyclone Watch for south Gujarat-north Maharashtra coasts: The low pressure area over Southeast & adjoining East central Arabian Sea and Lakshadweep area persists. It is very likely to concentrate into a Depression over East central and adjoining Southeast Arabian Sea during next 24 hours and likely to intensify further into a Cyclonic Storm over East central Arabian Sea during the subsequent hours.

            It is very likely to move nearly northwards initially till 02nd June Morning and then recurve north-northeastwards and reach near north Maharashtra and south Gujarat coasts around 03rd June Morning’ अशी धोक्याच्या सूचनेची माहिती आहे.

      त्या अनुषंगाने, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच अग्निशमन केंद्रातील आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्याबाबत व आपत्कालीन कामाकरीता नेमलेले अधिकारी व कर्मचारी व नागरी कामांकरीता नियुक्त सर्व कर्मचारी / अधिकारी / कंत्राटदार / मजूर यांना सतर्क राहण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

भारतीय हवामान विभागने  दि. 31 मे 2020 रोजी प्रसारीत केलेल्या संदेशाव्दारे Sea  conditions will be rough to very rough along and off Maharashtra cost from 3rd June 2020 असे नमूद केलेले आहे. तसेच मच्छीमारांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वादळाचा धोका वाढण्याची शक्यता असताना, मासेमारी करणा-या नौकांनी समुद्रात मासेमारीसाठी जाणे अधिक धोक्याचे आहे. तसेच यापूर्वी समुद्रात मोसेमारीसाठी कार्यरत असलेल्या नौकांना तात्काळ सायंकाळपर्यंत वायरलेस किंवा मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधून बंदरात बोलविण्यात यावे अशा सूचना आहेत. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी हवामान खात्याच्या धोक्याच्या सूचनेच्या अनुषंगाने सतर्क रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. 


मॅटर्निटी, कोव्हीड व नॉनकोव्हीड रूग्णांसाठी स्वतंत्र रूग्णवाहिकांचे सुयोग्य व्यवस्थापन

नागरिकांना कोव्हीड 19 आजाराप्रमाणेच कोव्हीड व्यतिरिक्त इतर आजारांकरिता तसेच महिलांना मॅटर्निटीकरिता पुरेशा प्रमाणात रूग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात याकडे विशेष लक्ष देत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी रूग्णवाहिकांचे सुयोग्य व्यवस्थापन केले असून त्यावर नियंत्रणाकरिता पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे यांचेकडे रूग्णवाहिका नियोजनाची जबाबदारी सोपविलेली आहे.

रूग्णवाहिकांच्या नियोजनामध्ये कोव्हीड 19 बाधित रूग्णांकरिता स्वतंत्र रूग्णवाहिका, कोव्हीड 19 बाधित रूग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती व कोव्हिड 19 संशयित व्यक्तींकरिता स्वतंत्र रूग्णवाहिका अशी संरचना केली आहे. कोव्हीड 19 करिता 19 रूग्णवाहिका कार्यरत असणार आहेत.

अशाचप्रकारे कोव्हीड 19 व्यतिरिक्त इतर आजाराच्या रूग्णांचीही काळजी घेत त्यांच्याकरिता 6 रूग्णवाहिका कार्यरत असणार आहेत.

त्याचप्रमाणे मॅटर्निटी प्रयोजना करिता प्रत्येक रूग्णालयास 1 याप्रमाणे 3 व परिमंडळ 1 व 2 साठी 2 अशा एकूण 5 रूग्णवाहिका कार्यरत असणार आहेत.

सध्या नवी मुंबई महानगरापालिकेच्या परिवहन उपक्रमातील 8 एन.एम.एम.टी. बसेसचे रूग्णवाहिकांमध्ये रूपांतर करण्यात आलेले असून आणखी 10 बसेसचे रूपांतरण रूग्णवाहिकेमध्ये करण्यात येत आहे.

याशिवाय आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून 3 रूग्णवाहिका घेण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीस्तव पाठविण्यात आलेला आहे.

सदर रूग्णवाहिकांचे नियोजन व्यवस्थित रितीने होण्याकरिता अद्ययावत जीपीएस तंत्रप्रणालीचा वापर करण्यात येत असून कोव्हिड 19 रूग्णांसाठी स्वतंत्र रूग्णवाहिकांची सुयोग्य व्यवस्था करताना इतर आजारांच्या रूग्णांची व प्रसूतीसाठी येणा-या महिलांची गैरसोय होऊ नये याकडे महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी काळजीपूर्वक लक्ष दिले आहे. 

CIDCO launches Sanwaad Citizen PortalOne Stop Portal for CIDCO's various online services

" Sanwaad Citizen Portal is CIDCO's another ambitious step towards the direction of digitization and customer-friendly functions which will be surely beneficial for citizens during this lockdown period. Through the medium of this portal, CIDCO's all online services will be available collectively at one place and at one click", said by Shri. Lokesh Chandra, Vice Chairman and Managing Director, CIDCO while inaugurating the online portal Sanwaad on 1st June 2020. On the backdrop of the present lockdown to prevent the spread of COVID-19, the inauguration ceremony of this portal was held through online medium via video conferencing. 

During this occasion, Shri. Ashwin Mudgal, Jt. Managing Director, Dr. Prashant Narnavare, Jt. Managing Director, Shri. Ashok Shingare, Jt. Managing Director, Shri. Nisar Tamboli, Chief Vigilance Officer and all Head of Departments were present through online medium via video conferencing. 

Before this, while recognizing the need of time and to fulfill the objectives of e-administration, CIDCO has digitized most of its services and made them available on online medium. In this, services such as online RTI, Online Complaint Redressal, Online Payment Gateway, various services of Estate Department, Water bill payment, Service charges, services provided by Vigilance department, etc are included. Due to online medium, all related processes of these services are quicker and transparent, which at last benefits the citizens. 

Previously, citizens had to login separately for availing various services. But now through Sanwaad Citizen Portal, they will have to register only at the beginning for login and can access all the online services through that login. There is no longer need to visit CIDCO's office or it's nodal offices, as citizens can avail any services on one click through this portal by staying at home itself. 

Similarly, facilities like tracking status of the application, online bill payment, etc. which were previously available through separate online services are also included in this portal. This one stop portal will prove to be highly beneficial for the citizens especially during this tough lockdown period.

कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक तो सर्व खर्च करावा लोकनेते आमदार गणेश नाईक यांची पालिका प्रशासनाला सूचना

नवी मुंबई प्रतिनिधी
कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक तो सर्व खर्च करून गोरगरीबांना उपचार उपलब्ध करून द्यावेत अशी सूचना लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या प्रशासकांना केली आहे.
लोकनेते आमदार नाईक यांनी सोमवारी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेतली. नवी मुंबईमध्ये कोरोना चा संसर्ग सुरू झाल्यापासून या महामारीवर प्रभावीपणे नियंत्रण करता यावे यासाठी पालिका प्रशासनाला त्यांनी वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत एकूण पंधरा सूचनापत्र त्यांनी आतापर्यंत महापालिका प्रशासनाला दिली आहेत. यासंदर्भात पालिका प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेण्यासाठी लोकनेते नाईक आयुक्त मिसाळ यांना भेटले. यावेळी त्यांच्यासोबत महापौर जयवंत सुतार,माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत,ज्येष्ठ नगरसेवक डॉ. जयाजी नाथ,स्थायी समिती सभापती नवीन गवते,नगरसेविका नेत्रा शिर्के,नगरसेवक सुरज पाटील,माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत,नगरसेविका शुभांगी पाटील आदी उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांना रायगड जिल्ह्याच्या हद्दीत   क्वांर टाइन सेंटरमध्येठेवण्यात आले असून हे उचित नसल्याचे लोकनेते नाईक यांनी या भेटीत प्रशासकांच्या निदर्शना स आणून दिले. या सेंटर मधील रुग्णांना पालिका रुग्णालयांमध्ये हलवावे. पालिका हद्दीमध्ये एमआयडीसी परिसरात अनेक रिकाम्या इमारती असून विद्युत जोडणी आणि इतर सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. या इमारती ताब्यात घेऊन त्याठिकाणी क्वांर टाइन सेंटर निर्माण करता येतील आणि नवी मुंबईतील नागरिकांवर नवी मुंबईतच उपचार करता येतील असेही ते म्हणाले लोकनेते नाईक यांनी दीड महिन्यापूर्वी 1000 खाटांचे कोरोना रुग्णालय शहरात उभारावे अशी मागणी शहरातील रुग्णांची वाढती संख्या पाहून केली होती त्यानुसार वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात पालिकेच्या वतीने हे हॉस्पिटल उभे राहत असून येत्या आठ ते नऊ दिवसात पहिल्या टप्प्यातील रुग्णांना याठिकाणी दाखल करून घेता येणार आहे.
पावसाळा उंबरठ्यावर आला आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथ रोगांवर उपचार करण्यासाठी पालिकेची यंत्रणा कार्यान्वित करावी लागेल. परंतु शहरांमध्ये बहुतेक रुग्णालय कोरोना वर उपचार करणारी रुग्णालय म्हणून कार्यरत आहेत. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार करून घेण्यासाठी नागरिकांना अडचणी येतात. यासाठी महापालिकेचे वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयामधील कोरोना रुग्णालय वाशी येथील बाराशे खाटांच्या विशेष कोव्हिड रुग्णालयांमध्ये हलवून प्रथम संदर्भ रुग्णालयासह नेरूळ आणि ऐरोली येथील पालिकेची रुग्णालय कोरोना व्यतिरिक्त आजारांवर उपचार करण्यासाठी सुरू ठेवावीत,अशी महत्त्वाची मागणी देखील या भेटीत त्यांनी केली.
संशयित रुग्णांना शोधून काढण्यासाठी घरोघरी आरोग्य तपासणी मोहीम राबविण्याचा सल्ला लोकनेते नाईक यांनी पालिका प्रशासनाला दिला होता त्यानुसार तुर्भे आणि कोपरखैरणे या भागात पालिकेने मास स्क्रिनिंगला सुरुवात केली आहे या तपासणी मोहिमेची व्याप्ती वाढविण्याची सूचना लोकनेते नाईक यांनी केली.
कोरोना योद्ध्यांच्या मदतीने कोरोना महामारी विरोधातील लढाई आपण जिंकू शकतो त्यामुळे त्यांच्यासाठी आवश्यक तो सर्व खर्च करण्यास पालिका प्रशासनाने कुचराई करू नये असे सांगून महापालिका अधिकारी ,कर्मचारी, वैद्यकीय, आरोग्य सेवेतील डॉक्टर, नर्सेस इतर सहयोगी कर्मचारी ,स्वच्छता कर्मचारी सर्वांना विम्याचे संरक्षण कवच प्रदान करावे अशी आग्रहाची मागणी त्यांनी याप्रसंगी केली. एपीएमसी मधील कोरोनाची लागण कमी झाली असली तरी  पालिकेने सतर्कता राखून बाजार आवारातील संसर्ग वाढू नये यावर नजर ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी सूचना देखील त्यांनी केली.
पावसाळ्यामध्ये विजेचा धक्का लागून नागरिकांचा प्रसंगी जीवही जातो त्यामुळे विज दुरुस्तीची कामे करून घ्यावीत. कालांतराने का होईना शाळा  शाळा सुरू होणार असल्याने शाळांच्या इमारती स्वच्छ करून ठेवाव्यात असेही लोकनेते नाईक म्हणाले.


...तर पालिका मुख्यालयावर मोर्चा आणू

कोरोना विरोधातील लढाईत आमचे पालिका प्रशासनाला पूर्ण सहकार्य आहे. त्यांच्या चांगल्या कामाचे आम्ही कौतुक करीत आहोत. परंतु ही लढाई गांभीर्याने घेतली नाही तर आणि त्यामुळे अपयश ओढावले तर मात्र लोकप्रतिनिधी म्हणून आणि या शहराचा कुटुंबप्रमुख या भूमिकेतून  महापालिका मुख्यालयावर मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे.

लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी आतापर्यंत कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या महत्त्वाच्या  सूचना......

1000 खाटांचे कोरोना रूग्णालय स्थापन करावे

प्रतिदिनी 500 कोरोना चाचण्या करता येतील या क्षमतेची पालिकेच्या स्वमालकीची प्रयोगशाळा स्थापन करावी

खाजगी डॉक्टरांना पीपीई किट, मास्क ,स्यानि टायजर या वस्तू मोफत वितरीत कराव्यात

घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करावी

पावसाळापूर्व नागरी सुविधांची आणि वीज दुरुस्तीची कामे मार्गी लावावीत.

पावसाळ्यात साथरोग नियंत्रणासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी.