Friday, July 31, 2020

अपोलो हॉस्पिटल मधील प्लाझमा डोनेशन कॅम्पची पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशंसा


 अपोलो हॉस्पिटलमधील प्लाझमा डोनेशन कॅम्पची पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशंसा

      त्याचप्रमाणे अपोलो हॉस्पिटल या ठिकाणी आयोजित प्लाझमा डोनेशन कॅम्पला भेट देऊन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री ना.श्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. येथे ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री राजन विचारे, मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती श्री विजय नाहटा, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अपोलो हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय प्रमुख श्री.संतोष मराठे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

      कोरोनावर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने कोरोनाशी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझमा अत्यंत महत्वाचा घटक असून प्लाझमा थेरपी एखाद्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरताना दिसत आहे. त्यामुळे प्लाझमा डोनेशन कॅम्पच्या माध्ययमातून नवी मुंबई महानगरपालिकेने अपोलो हॉस्पिटलच्या सहयोगाने उचललेले हे पाऊल प्रशंसनीय आहे. कोरोनामधून बरे झालेले जे नागरिक प्लाझमा डोनेशनसाठी स्वयंस्फुर्तीने पुढे येत आहेत त्यांचे कौतुक करीत ना. श्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्तीचे पालन करावे असे आवाहन केले. यावेळी प्लाझमा डोनेशन करणाऱ्या नागरिकांना मंत्रीमहोदयांच्या शुभहस्ते प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात आली.

नेरूळ रूग्णालयातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड -19 लॅबचीपालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी


      नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरूळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोव्हीड - 19 चाचणी व निदान (Rt-PCR Fully Automatic Lab) प्रयोगशाळेच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री एकनाथ शिंदे यांनी केली. दररोज 1 हजार कोव्हीड 19 चाचण्या होणारी महानगरपालिकेची स्वतःची लॅब नवी मुंबईकर नागरिकांसाठी उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या लॅबव्दारे २४ तासाच्या आत रिपोर्ट प्राप्त होणार असल्याने लवकर निदान होऊन कोव्हीड 19 चा प्रसार रोखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

‌        महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी पालकमंत्री महोदयांना लॅबच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री महोदयांनी लॅबमधील उपकरणांची व त्यांच्या कार्यप्रणालीची प्रक्रिया बारकाईने जाणून घेतली व मौलिक सूचना केल्या. याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री राजन विचारे, मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती श्री विजय नाहटा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


गृहराज्यमंत्री ना.श्री.सतेज पाटील यांचेकडून नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड 19 स्थितीचा आढावा

नवी मुंबईतील कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणा-या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.श्री.सतेज पाटील यांनी आज महापालिका मुख्यालयास भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महापालिका क्षेत्रातील कोव्हीड सद्यस्थितीची सादरीकरणाव्दारे माहिती देत कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या विविध कामांची व आगामी नियोजनाची माहिती मंत्री महोदयांना दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे आणि इतर महापालिका विभागप्रमुख उपस्थित होते.

      कोव्हीड 19 चाचण्यांसाठी काही दिवसातच नवी मुंबई महानगरपालिका स्वत:ची आरटीसीपीआर लॅब सुरू करीत असल्याबद्दल तसेच शहरातील बेड्सची संख्या रिअल टाईम नागरिकांना समजण्यासाठी ऑनलाईन लाईव्ह डॅशबोर्ड कार्यान्वित करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत गृहराज्यमंत्री ना.श्री.सतेज पाटील यांनी शहरातील व्हेंटिलेटर्स बेड्सची संख्या वाढविण्यावर भर द्यावा असे सूचित केले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि डायबेटिस, ब्लडप्रेशर असे इतर आजार असणा-या व्यक्तींकडे अधिक लक्ष द्यावे असे त्यांनी सूचित केले. ए.पी.एम.सी. मार्केट बंद करणे शक्य नाही मात्र त्याठिकाणी येणा-या प्रत्येक नागरिकाची स्क्रिनींग व्हावी याकरिता विशेष उपाययोजना करणेबाबत त्यांनी निर्देशित केले.

      रूग्णशोध व तपासणी वाढविण्यासोबतच मृत्यू दर कमी करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे उद्दिष्ट आयुक्तांनी नजरेसमोर ठेवले असून शहरातील रुग्णालयांशी संपर्क साधून नागरिकांना आवश्यक सेवा शासनाने निश्चित केलेल्या दरांतच मिळतील याकडे काटेकोर लक्ष देण्याचे तसेच महात्मा फुले आरोग्य योजनेतून जास्तीत जास्त नागरिकांना उपचार मिळावेत असे त्यांनी सूचित केले.. त्याचप्रमाणे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना नियमित मास्क वापरण्याचे तसेच बाहेर वावरताना एकमेकांमध्ये सुयोग्य अंतर ठेवण्याचे आवाहन गृहराज्यमंत्री ना.श्री. सतेज पाटील यांनी केले.

अनलॉककाळात महिला नोकरदारांना नवी मुंबई ते मुंबई प्रवास करण्यासाठी विशेष बस व रेल्वेची सुविधा उपलब्ध करणेबाबत आमदार मंदाताई म्हात्रे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नवी मुंबई:- कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना याचा सर्वाधिक फटका महिला नोकरदार वर्गाला झाला आहे. यातच लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेले 4 महिने कार्यालये बंद असल्याने सक्तीच्या रजेवर असलेल्या नोकरदार महिलांना नवी मुंबई ते मुंबई अशा प्रवासाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नोकरदार महिलांना प्रवासाची होणारी वाताहत पाहता नवी मुंबई ते मुंबई ये-जा प्रवास करण्याकरिता विशेष बस व रेल्वेची सुविधा उपलब्ध करण्याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांजकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, कोरोना महामारीने लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गेली महिने नवी मुंबईसह मुंबईतील नोकरदार महिला या विनावेतन रजेवर होत्या. सद्यस्थितीत अनलॉक सुरू झाल्यानंतर नवी मुंबई मधून मुंबईकडे किंवा मुंबईमधून नवी मुंबईकडे नोकऱ्यांसाठी महिलांचा प्रवास अनियमित होत असतो. परंतु सध्याच्या नियमावलीप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांना बस,ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी हेच पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी मध्यमवर्गीय नोकरदार महिलांना ऑटो किंवा टॅक्सी हा पर्याय परवडणारा नसल्याने शेवटी बस हाच एक पर्याय या महिलांसाठी आहे. परंतु कोविडची नियमावली पाहता बसमधून प्रत्येक सीटवर एक प्रवासी व उभे पाच प्रवासी अशा पद्धतीने प्रवास करता येऊ शकतो परंतु बस डेपोमधून बसेस या नेहमी भरून येत असल्याने उर्वरित बस स्टॉपवरील महिलांना बस मिळण्यासाठी साधारण दीड ते दोन तास वाट बघावी लागत आहे. एकूण बस थांबे पाहता कोणत्याही बस थांब्यावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय नाहीअशावेळी महिलांना प्रचंड त्रासास सामोरे जावे लागते. दुसरीकडे लोकल ट्रेन केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व शासकीय कर्मचाऱ्यांनाच प्रवासासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. नोकरदार महिलांना प्रवासाची होणारी वाताहत पाहता विशेष बस किंवा रेल्वेची सुविधा उपलब्ध करण्याबाबत एक महिला आमदार म्हणून अनेक महिलांची सातत्याने माझ्याकडे मागणी होत आहे. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांजकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 


Thursday, July 30, 2020

दररोज होत आहे 2000 हून अधिक नागरिकांची कोव्हीड 19 टेस्टींग, एपीएमसी मार्केटमध्ये अँटिजेन टेस्ट सेंटरला सुरूवात

दररोज होत आहे 2000 हून अधिक नागरिकांची कोव्हीड 19 टेस्टींग


 

आजमितीस 18 ठिकाणी अँटिजेन टेस्ट सेंटर सुरू असून दररोज साधारणत: 1300 हून अधिक व्यक्तींच्या अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहेत. तसेच अँटिजेन आणि आर.टी.-पी.सी.आर. मिळून 2000 हून अधिक व्यक्तींच्या कोव्हीड 19 टेस्ट करण्यात येत आहेत.

16 जुलै पासून 27 जुलैपर्यंत 7950 व्यक्तींच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यामध्ये 1570 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तथापि अँटिजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाला आणि त्या व्यक्तीमध्ये कोव्हीड 19 सदृष्य लक्षणे आढळत असतील तर त्या व्यक्तीची लगेच आर.टी.-पी.सी.आर. टेस्ट महापालिकेच्या वतीने मोफत करून घेण्यात येत आहे. तसेच पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील 20 पेक्षा अधिक व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात येते.

  एपीएमसी मार्केटमध्ये अँटिजेन टेस्ट सेंटरला सुरूवात

 

तुर्भे येथील ए.पी.एम.सी. च्या 5 मार्केटमध्ये संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातून जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी दररोज हजारो नागरिक विविध ठिकाणाहून येत असल्याने तेथील कोरोना प्रसार नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या ए.पी.एम.सी. प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून त्या ठिकाणी जाहीर केल्याप्रमाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. 27 जुलैपासून विशेष रॅपिड अँटिजेन टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले आहे.


कोरोना सदृष्य लक्षणे जाणवल्यास अँटिजेन टेस्ट सेंटरमध्ये विनामूल्य टेस्ट करून घेण्याचे आवाहन

कोरोना सदृष्य लक्षणे जाणवल्यास अँटिजेन टेस्ट सेंटरमध्ये विनामूल्य टेस्ट करून घेण्याचे आवाहन

'मिशन ब्रेक द चेन' प्रभावीपणे राबविताना मृत्यू दर कमी करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करीत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यादृष्टीने ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, किडनीचे विकार असे आधीपासूनच आजार असणा-या व्यक्तींची जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे. याकरिता सर्वेक्षण करताना अशा व्यक्तींची वेगळी नोंद करणे व त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी सर्व आरोग्य अधिकारी यांना दिलेले आहेत. 

महत्वाचे म्हणजे कोणत्याही नागरिकाला ताप, सर्दी, घशात खवखव, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवल्यास ती न लपवता महापालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्र अथवा 5 रूग्णालयांतील फ्ल्यू क्लिनीकमध्ये जाऊन तात्काळ तपासणी करून घ्यावी व रॅपीड अँटिजेन टेस्ट मोफत करून घ्यावी असे आवाहन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.

कोव्हीड 19 टेस्टींग संख्येत वाढ करून लवकर रूग्णशोध व विलगीकरणातून कोरोनाची साखळी खंडीत करण्यावर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा भर

कोव्हीड 19 टेस्टींग संख्येत वाढ करून लवकर रूग्णशोध व विलगीकरणातून कोरोनाची साखळी

खंडीत करण्यावर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा भर

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना नियंत्रणासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 'मिशन ब्रेक द चेन' ची प्रभावी अंमलबजावणी होण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. याव्दारे लवकरात लवकर रूग्णशोध करून त्यांचे त्वरित विलगीकरण करण्यावर भर दिला जात असल्याने या कोरोना बाधितांच्या माध्यमातून संसर्गातून पसरणारी कोरोनाची साखळी खंडीत करण्यावर भर दिला जात आहे. याकरिता पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत हॉटस्पॉट क्षेत्रे म्हणून लॉकडाऊन घोषित केलेल्या भागात घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी केली जात आहे व कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या व्यक्तींची लगेच ॲटिजेन टेस्ट करण्यात येत आहे.

रॅपीड अँटिजेन टेस्टींगव्दारे केवळ अर्ध्या तासाच्या आत तपासणी अहवाल प्राप्त होत असल्याने व त्यामधून कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती त्वरित समजत असल्याने अँटिजेन टेस्ट सेंटर वाढविण्यावर आयुक्तांनी भर दिला आहे.  16 जुलै रोजी सेक्टर 10 वाशी येथील महापालिकेच्या सार्वजनिक डेडिकेटेड कोव्हीड रूग्णालय येथून रॅपीड अँटिजेन टेस्टला प्रारंभ करण्यात आला असून या टेस्ट सेंटरच्या संख्येत दररोज वाढ होईल याकडे आयुक्तांचे कटाक्षाने लक्ष आहे.


वाढीव विज बिलांच्या विरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर धडक

वाढीव विज बिलांच्या विरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर धडक
नवी मुंबई - वाढीव वीज बिलांविरोधात नवी मुंबईत मनसेने शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या नेरुळ येथील कार्यालयावर गुरुवारी धडक दिली. यावेळी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना महावितरणच्या प्रवेद्वारावर रोखले. यावेळी कार्यालयाच्या प्रवेशद्वावर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना बोलावण्यात आले. महावितरण कंपनी कडून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत मनसेने कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. ग्राहकांना सुधारित विज बिले पाठवून त्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावी तसेच ग्राहकांचा विज पुरवठा कोणत्याही प्रकारे खंडित करू नये अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली. अन्यथा महावितरण कंपनीच्या कार्यालयाची विज कापण्याचा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी यावेळी दिला. तक्रार प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण तसेच ग्राहकांचा वीज पुरवठा खंडी करणार नसल्याचे आश्वासन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला यावेळी दिले. यावेळी उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष नितीन खानविलकर, शहर सहसचिव अभिजित देसाई, शहर सहसचिव दिनेश पाटील, विभाग अध्यक्ष योगेश शेटे, विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, विभाग अध्यक्ष विनोद पाखरे, विभाग अध्यक्ष देवा प्रसाद, विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड, विभाग अध्यक्ष नितीन नाईकडे, रोजगार स्वयं रोजगारचे उपशहर संघटक अनिकेत पाटील हे उपस्थित होते.

Central Railway’s Apta – Filmmakers most preferred film shooting location after CSMT station

Apta Railway Station over Central Railway, continues to be the most popular film shooting location for film makers after Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Railway Station. In the financial year 2019-2020, four films were shot at Apta Railway station including Raat Akeli Hai, Mumbai Saga and Shubh Mangal Zayada Savdhan and 8 films were shot at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, the most popular films were Panga, Choked and Suraj se Mangal Bhari. Apta station is encompassed in camera in numerous films, including the most popular films like Dilwale Dulaniya Le Jayenge, Kuch Kuch Hota Hai, Rang de Basanti, Baaghi, Khaki, Shaadi No. 1, ChinaTown and many other box-office hit films. Shri Shivaji Sutar, Chief Public Relations Officer said “Apta known for his scenic location with one side hill, the other side a road nearby a river and easy road accessibility, located on the Panvel –Roha route with curvy track and platforms, ample space for keeping equipments and to park Vanity Vans of Actors. Such a station with less crowd is a perfect location for film shooting.” Apta Railway station has been given halt for few trains and it is crossing station as such it also has an additional track which makes doubly sweet for movement of special trains booked for film shooting. Apta is just a 2 hours journey, about 75 kms from the Film City, Mumbai. Thereby, Apta Railway Station has become the most preferred location for film shooting of web series, documentaries and TV serials.” Central Railway has been gifted with many beautiful film shooting locations fulfilling the requirements of the film makers. From the most preferred film shooting location, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus to the popular stations like Apta, Panvel, Chouk, Lonavala, Khandala, Wathar, Satara and railway yards like Turbhe and Wadi bunder. The permission for the film shooting is granted by the Public Relations Department of Central Railway, recently to expedite the film shooting permission, a single window system has been introduced, this simplification of the procedure will enable the film companies to obtain permission after submission of the necessary documents along with the script and application mentioning the requirements. Central Railway earned Rs. 1.33 cores in 21 film shootings in 2019-20, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Station with 8 film shootings including film ‘Panga’ earned Rs. 44.52 lakhs, Apta with 22.61 lakh rupees in 4 film shootings. The highest amount of Rs. 22.10 lakhs was earned from Rajnikant starrer ‘Darbaar’ shot at Panvel Station. The scenic location Wathar over Pune Division earned Rs. 37.22 lakhs from 3 films including Salman starrer ‘Dabangg 3’ giving earning of Rs. 15.70 lakhs, a shot of film ‘Lal Singh Chaddha’ between Pune to Mumbai and other film shooting locations like Turbhe and Wadi bunder Yard, Pune station were also generated good income. Though the movement is restricted to contain the spread of COVID19, Central Railway is hopeful that the beauty of Apta and other such locations will be unearthed again in the near future. Let us fight together #COVID19. infomed by the Public Relations Department, Central Railway, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai




Wednesday, July 29, 2020

महाराष्ट्र शासनाकडून नवी मुंबई महानगरपालिकेस 10 अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स प्रदान


नवी मुंबईकर नागरिकांच्या आरोग्य सुविधेमध्ये लक्षणीय भर घातल्याबद्दल आयुक्तांनी मानले आभार

 

  

       कोव्हीड 19 विरोधातील लढ्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासोबतच कोरोना बाधितांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या नियंत्रणाखाली विशेष लक्ष देण्यात येत आहे. आरोग्य सुविधांमध्ये जाणवणारी व्हेंटिलेटर्सची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना महाराष्ट्र शासनाने खंबीरपणे मदतीचा हात देत  एन.आयव्ही., ॲडव्हान्स मोडचे मॉनिटरसह सर्व सुविधा असणारे 10 अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स नवी मुंबई महानगरपालिकेस प्रदान केले आहेत.

      वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर येथील नवी मुंबई महानगरपालिकेने उभारणी केलेल्या कोव्हीड केअर सेंटर व डोडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर कार्यान्वित करण्यापूर्वी अंतिम पाहणीप्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री ना.श्री.राजेश टोपे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेस व्हेंटिलेटर्स पुरविण्यात येतील असे आश्वासित केले होते. त्याची पूर्तता पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी विशेष प्रयत्न करीत प्राधान्याने नवी मुंबई महानगरपालिकेस 10 अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देत केली आहे. याबाबतच्या कार्यवाहीमध्ये ठाणे जिल्हा आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.

      महाराष्ट्र शासनामार्फत प्राप्त या 10 अत्याधुनिक व्हेंटिलेटर्समुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचे अधिक सक्षमीकरण झाले असून नवी मुंबईकर नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार असल्याने आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.


Maharashtra board SSC result 2020 details

Thursday, July 23, 2020

गणेशोत्सव व नवरात्रौत्सव - 2020 साजरा करणेबाबत जाहीर आवाहन

2020 मधील गणेशोत्सव 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 या कालावधीत तसेच नवरात्रौत्सव 17 ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत साजरा होत असून यावर्षी कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणेकरीता शासनाच्या गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) यांचे दि. 11 जुलै 2020 रोजीच्या परिपत्रकानुसार मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत.

१.      सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महापालिका / स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार गणेशोत्सवासाठी यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

२.      कोविड-19 मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमीत केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबधीत स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.

३.      श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरीता 4 फूट व घरगुती गणपती 2 फूटांच्या मर्यादेत असावी.

४.      यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीं ऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावे. मुर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेश मुर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मुर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरुन आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत:चे व कुटूंबियांचे साथीच्या रोगापासून रक्षण होईल.

५.      उत्सवाकरीता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

६.      सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबीरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

७.      आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.

८.      श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादींव्दारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

९.      गणेशोत्सव मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजीकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क,सॅनिटायझर इ.) पालन करण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

१०.  श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन, विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ  नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील / इमारतीमधील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

११.  महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.


 

---- 2 ----

 

१२.  कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैदयकिय शिक्षण विभाग तसेच संबधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करण्यात यावे.

 

     नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात मंडप, ध्वनी प्रदूषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि रस्ता, पदपथ व पादचारी मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप व तत्सम रचना उभारणे संदर्भात मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 173/2010 संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिकेने विकसित केलेल्या “इ-सेवा संगणक प्रणाली” व्दारे गतवर्षीप्रमाणे या वर्षीही मंडप उभारणेची परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

     सर्व गणेशोत्सव/नवरात्रौत्सवमंडळे व नागरिकयांनी नवी मुंबई महापालिकेच्या www.rtsnmmconline.comया Website वर गणेशोत्सवामध्ये मंडप उभारणेकरीता परवानगी अर्ज करण्यास दि. 25 जुलै 2020 पासून कार्यालयीन वेळेमध्ये ऑनलाईन सेवा सुरु करण्यात येत आहे. तसेच नवरात्रौत्सवासाठी सुध्दा याच Website वर मंडप उभारणेकरीता परवानगी अर्ज सादर करावयाचे आहेत. ऑनलाईन प्रणालीव्दारे दोन्ही उत्सवाच्या 10 दिवस अगोदर परवानगी देणे बंद करण्यात येणार आहे, याची नोंद घेण्यात यावी.   

     गणेशोत्सव व नवरात्रौत्सव या करीता सर्व संबधीत विभागांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी सुरु करण्यात येऊ नयेतसेच केवळ परवानगी अर्ज दाखल केल्यामुळे परवानगी मिळेल असे गृहीत धरण्यात येऊ नये. रितसर परवानगी शिवाय मंडपाची उभारणी सुरु करु नयेमहानगरपालिका हद्दीत कोणत्याही मंडपाची उभारणी परवानगीशिवाय केल्यास अशा मंडपांवर निष्कासनाची कार्यवाही केली जाईलसर्व गणेशोत्सव व नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळ व नागरीकांनी याची दक्षता घ्यावयाची आहे.

     मंडप उभारणी परवानगी अर्ज नमूद कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे www.rtsnmmconline.com या Website वर ऑनलाईन सादर करावयाचे आहेत. लेखी परवानगी प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी करु नयेविशेष करुन गणेशोत्सव नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळानी याची नोंद घ्यावी. उत्सव सुरु होण्याच्या 10 दिवस अगोदर कोणतेही परवानगी अर्ज विभाग कार्यालयात स्विकारले जाणार नाहीत किंवा मंडप उभारणेसाठी परवानगी दिली जाणार नाही.

     या संदर्भात माउच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी व याबाबत सविस्तर माहिती देणेकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या ८ विभाग कार्यालयांमध्ये संबधीत सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत दि. 25 जुलै 2020 रोजी, सकाळी 11.00 वाजता, आठही ठिकाणी विभाग स्तरावर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

या बैठकीसाठी सर्व विभाग कार्यालयांच्या ठिकाणी त्या क्षेत्रातील स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस निरीक्षक, अग्निशमन अधिकारी यांनी उपस्थित रहावयाचे आहे.                                                  तरी याव्दारे सर्व गणेशोत्सव / नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करणा-या मंडळातील मुख्य पदाधिकारी यांनी शनिवार, दि. 25 जुलै 2020 रोजी, सकाळी 11.00 वा. आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधित विभाग कार्यालयामध्ये कोव्हीड 19 च्या सुरक्षा नियमावलीचे पालन करून, सोशल डिस्टन्सींगचे भान राखत, या बैठकीस उपस्थित राहून नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.