विरोधी पक्ष नेता प्रीतम म्हात्रे यांनी दिले अजगराला जीवनदान
पनवेल : जुन्या मुंबई पुणे महामार्ग येथील खालापूर येथे प्रितम म्हात्रे यांच्या फार्म हाऊस मध्ये सकाळ च्या दरम्यान 11 फुटाचा अजगर आढळून आला. स्वतः प्रीतम म्हात्रे आणि फॉर्म हाऊस काम करणारे गणेश महादू कैवारी आणि अनिल शिवाजी पवार यांनी त्याला पकडले. त्यानंतर त्यांनी खालापूरच्या फॉरेस्ट ऑफिसर व त्यांच्या कर्मचार्यांना हा अजगर सुपूर्द केला. त्यामुळे अजगराला जीवनदान मिळाले आहे.
अजगर बघताच अनेकांना धडकी भरते. काही जण त्यांना मारून टाकतात. हल्लीच जेवणाच्या शोधात असणार्या एका गर्भवती हत्तींनीला मारण्यात आले असताना दुसरीकडे विरोधी पक्ष नेत्यांनी या अजगराला जीवदान दिले आहे. त्यामुळे पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या या धाडसाचे व औदार्याचे सर्वञ कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment