Monday, June 8, 2020

एन.एम.एम.टी. कडून प्रवाशांना 215 बसेसव्दारे 858 बसफे-यांची सुविधा उपलब्ध

संपूर्ण देशात कोरोना (COVID-19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखावा याकरिता 25 मार्च 2020 पासून संपूर्ण देशात टाळेबंदी (LOCK DOWN) लागू करण्यात आली आहे. या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने लॉकडाऊनचे उद्दिष्ट साध्य व्हावे व अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कामाचे ठिकाण ते निवासस्थान या दरम्यान बस सेवा उपलब्ध करुन दिली आहे.

      ही सेवा पुरवित असताना कर्मचारी संख्या, कामाच्या वेळा व सोशल डिस्टंन्सींग या नियमांचे उल्लंघन होणार नाही याबाबतची दक्षता घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार बसेस व बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 

      याव्दारे रुग्णालये, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना त्यांच्या निवासस्थानापासून कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी नवी मुंबई शहर तसेच ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, पनवेल, उरण, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, दहिसरमोरी, खारघर, उलवे इत्यादी ठिकाणाहून बस सेवा पूरविली जात आहे. या माध्यमातून  दैनंदिन 112  बसेसच्या 398 फे-यांव्दारे अत्यावश्यक सेवेतील दैनंदिन सरासरी 10 हजार कर्मचा-यांना या प्रवाशी सेवेचा लाभ होत आहे.

      महाराष्ट्र शासनाने मिशन बिगीन अगेन (Unlock – 1) च्या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात प्रवासावरील निर्बंध उठविले आहेत. या पार्श्वभूमीवर 08 जून 2020 पासून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने लॉकडाऊन कालावधीतील अत्यावश्यक दैनंदिन 112 बसेसच्या 398 फे-यांच्या सेवेबरोबरच सर्वसामान्य प्रवासी नागरिकांसाठी तसेच सरकारी, खाजगी कार्यालयांमधील सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सोशल व फिजीकल डिस्टंन्सींग या नियमाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेत प्रवाशांना मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बसमधील आसन क्षमतेच्या 50% व 5 अथवा 3 प्रवाशांना उभे राहून प्रवासाची मुभा असेल. एन.एम.एम.टी मार्फत पुर्वीच्या 112 बसेस सोबतच वाढीव 22 बस मार्गांवर दैनंदिन 103 जादा बसेसचे जादा शेडयुल एन.एम.एम.टी. मार्फत कार्यान्वित करण्यात आलेले आहे. एन.एम.एम.टी. मार्फत प्रवाशांना 215 बसेसव्दारे 858 बस फे-यांची प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

आज 08 जून 2020 पासून नवी मुंबई शहर व लगतच्या परिसरातील प्रवासी नागरिकांना 215 बसेसच्या माध्यमातून 858 बस फेऱ्यांव्दारे प्रवासी वाहतूकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार व प्रवाशी संख्येचा आढावा घेऊन गरजेनुसार बस फेऱ्यांमधे वाढ करण्यात येईल असे सूचित करण्यात येत आहे.



No comments:

Post a Comment