*संचारबंदीत मनसेकडून १२ रुपये किलोने कांदा वाटप*
नवी मुंबई - कोरोनामुळे ओढवलेल्या संकटात सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे आणि शाखा अध्यक्ष अमन गोळे यांच्याकडून महाराष्ट्राचे तसेच सर्व महाराष्ट्र सैनिकांचे लाडके युवा नेतृत्व, मनसेचे नेते *सन्मा.अमित राजसाहेब ठाकरे* यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विभागातील नागरिकांसाठी शेतकरी ते थेट ग्राहक तत्वावर स्वस्त दरात कांदा वाटप करण्यात आला. यावेळी मनसेकडून सर्व सामान्य नागरिकांसाठी *फक्त १२ रुपये किलोने* सोसायटीच्या प्रवेशद्वारावर कांदा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली.
कोरोनाशी लढण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या काळात लोकांनी भाजीपाला आणण्यासाठी घराबाहेर पडू नये आणि विनाकारण गर्दी करून कोरोनाची साथ आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांना अडसर ठरू नये या हेतूने मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे आणि शाखा अध्यक्ष अमन गोळे यांच्या सौजन्याने संकटकाळी सर्व सामान्यांना मदत म्हणून सोसायटीच्या प्रवेशद्वारावर कांदा उपलब्ध करून देण्याचा लोकोपयोगी उपक्रम मनसेकडून रविवारी हाती घेण्यात आला. विभागातील जवळजवळ १०० ते १५० कुटुंबांना मनसेकडून स्वस्त दरात कांदा वाटप करण्यात आला. संचारबंदीत सर्वसामान्य नागरिकांना सोसायटीच्या प्रवेशद्वारावर स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी मनसेचे शाखा अध्यक्ष अमन गोळे, महाराष्ट्र सैनिक वैभव जिमन, महाराष्ट्र सैनिक शशांक भिकुले, महाराष्ट्र सैनिक अजय घोडेराव यांनी विशेष मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment