भांडूप,दि. 1/05/2020: बुधवारी, दि. 29/4/2020 रोजी सायंकाळी 6 वाजता पाली मध्ये आलेल्या वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या पाली उपविभागातील नागोठणे शाखाचे खूप मोठे नुकसान झाले. जोरदार वारा व पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी विद्युत खांब पडले तसेच अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडून महावितरणच्या विद्युत तारावर पडले होते. यामुळे, नागोठणे व त्या लगतच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, महावितरणच्या पाली उपविभागातील नागोठणे शाखातील कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून संपूर्ण भागाचा वीजपुरवठा एका दिवसात पूर्ववत केला.
या वारा व पावसाने उग्र रूप घेतल्यामुळे एम.आय.डी. सी.1 व नागोठणे फीडर ब्रेकडाऊन झाले होते. नागोठणे शहरातील 20-25 लघुदाब वाहिन्या तुटून पडल्या होत्या, 6 लघुदाब वाहिनीचे व 2 उच्चदाब वाहिनीचे खांब पडले होते तसेच सात वेगवेगळ्या ठिकाणी उच्चदाब वाहिनीचे कंडक्टर तुटले होते. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्यात अडचण येत होती. तरी देखील रात्री 11:30 च्या सुमारास नागोठणे फीडर 50% पूर्ववत करण्यात आला होता. एम.आय. डी.सी 1 फीडरवर झाड पडल्याने, या फीडरवरील वीजपुरवठा पूर्ववत झाला नव्हता. दि. 30/4/2020 रोजी सकाळी 6 वाजता परत कामाची सुरुवात करून सकाळी 8 वाजता हा फीडर ही चालू करण्यात आला. नागोठणे फीडरवर उरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा 11:30 वाजता पूर्ववत करण्यात आला. नंतर, पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. दीपक पाटील यांच्या नेतृत्वात नागोठणे शाखेतील सहाय्यक अभियंता श्री. वैभव गायकवाड व इतर कर्मचाऱ्यांनी दोन टीम तयार करून लघुदाब वाहिनीच्या कामासाठी नियोजन करून पूर्ण परिसराचा वीजपुरवठा रात्री 8:30 वाजता पूर्ववत केला. यावेळी, पाली विभागातील उपकार्यकारी अभियंता श्री. जतीन पाटील यांनी मार्गदर्शन केले.
कोरोना संसर्गाच्या संकटात आपली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता सौ. पुष्पा चव्हाण यांनी केले.
No comments:
Post a Comment