Friday, May 22, 2020

राज्य सरकार जबाबदारी टाळत आहे लोकनेते आमदार गणेश नाईक यांचा घणाघात


नवी मुंबईत भाजपातर्फे महाराष्ट्र बचाओ आंदोलन
महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणाबाहेर जाण्यास राज्य सरकार मधील असमन्वय कारणीभूत असून सरकार केवळ जबाबदारी टाळण्याच काम करीत आहे, असा घणाघात लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केला आहे.
कोरोनाला आळा घालण्यात राज्य सरकारला सपशेल अपयश आल असून याविरोधात जनतेच्या मनामध्ये आक्रोश धुमसतोय या संतापाला वाट करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यात माझे अंगण माझे रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलनाची हाक दिली होती. सोशल डिस्टन्स पाळून नवी मुंबईत सर्वत्र हे आंदोलन करण्यात आले.
लोकनेते नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोपरखैरणे सेक्टर 11 येथील बालाजी गार्डन सोसायटीमध्ये महाराष्ट्र बचाव आंदोलन पार पडलं. माजी खासदार डॉक्टर संजीव गणेश नाईक माजी महापौर सागर नाईक  समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक, युवा नेते संकल्प नाईक आदी मान्यवरांसह सोसायटीमधील अनेक नागरिक सहभागी झाले होते.
देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येपैकी एक तृतीयांश संख्या महाराष्ट्रात आहे. दिल्ली चेन्नई अहमदाबाद हीदेखील देशातील महानगरे आहेत. या शहरांच्या तुलनेत  मुंबई आणि उपनगरांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे सत्ताधारी आणि प्रशासना मधला असमन्वय असल्याची टीका लोकनेते नाईक यांनी याप्रसंगी केली.  केंद्र सरकार आपली जबाबदारी उचलत असताना राज्य सरकार मात्र ती टाळण्याचा प्रयत्न करीत आहे.  लॉकडाऊन मुळे देशाची अर्थव्यवस्था नाजूक बनली असताना केंद्र सरकारने वीस लाख कोटी रुपयांचे मोठे पॅकेज विविध क्षेत्रांना उभारी देण्यासाठी जाहीर केले आहे. राज्यसरकार याप्रश्नी उदासीन दिसते.
रिक्षा चालक टॅक्सी चालक घर कामगार बारा बलुतेदार यांना भरघोस आर्थिक मदत करा, डाळ साखर आणि इतर किराणा रेशनिंग दुकानांवर देण्यास सुरुवात करा, विज बिल आणि मुलांची शैक्षणिक फी माफ करा, विद्यार्थी महिला वरिष्ठ नागरिक इत्यादी घटकांसाठी मोफत प्रवासाची सोय करा, महाराष्ट्राची आर्थिक घडी बसविण्यासाठी मोठे आर्थिक पॅकेज जाहीर करा
कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयातून मोफत उपचार करावेत, अशा मागण्या लोकनेते नाईक यांनी केल्या आहेत.  त्याच बरोबर पावसाळा तोंडावर आल्याने पावसाळापूर्व कामांना गती देण्याची सूचना देखील सरकारला केली आहे.

No comments:

Post a Comment