Friday, July 31, 2020

अपोलो हॉस्पिटल मधील प्लाझमा डोनेशन कॅम्पची पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशंसा


 अपोलो हॉस्पिटलमधील प्लाझमा डोनेशन कॅम्पची पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशंसा

      त्याचप्रमाणे अपोलो हॉस्पिटल या ठिकाणी आयोजित प्लाझमा डोनेशन कॅम्पला भेट देऊन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री ना.श्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. येथे ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री राजन विचारे, मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती श्री विजय नाहटा, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अपोलो हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय प्रमुख श्री.संतोष मराठे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

      कोरोनावर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने कोरोनाशी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझमा अत्यंत महत्वाचा घटक असून प्लाझमा थेरपी एखाद्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरताना दिसत आहे. त्यामुळे प्लाझमा डोनेशन कॅम्पच्या माध्ययमातून नवी मुंबई महानगरपालिकेने अपोलो हॉस्पिटलच्या सहयोगाने उचललेले हे पाऊल प्रशंसनीय आहे. कोरोनामधून बरे झालेले जे नागरिक प्लाझमा डोनेशनसाठी स्वयंस्फुर्तीने पुढे येत आहेत त्यांचे कौतुक करीत ना. श्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्तीचे पालन करावे असे आवाहन केले. यावेळी प्लाझमा डोनेशन करणाऱ्या नागरिकांना मंत्रीमहोदयांच्या शुभहस्ते प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात आली.

No comments:

Post a Comment