नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरूळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोव्हीड - 19 चाचणी व निदान (Rt-PCR Fully Automatic Lab) प्रयोगशाळेच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री एकनाथ शिंदे यांनी केली. दररोज 1 हजार कोव्हीड 19 चाचण्या होणारी महानगरपालिकेची स्वतःची लॅब नवी मुंबईकर नागरिकांसाठी उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या लॅबव्दारे २४ तासाच्या आत रिपोर्ट प्राप्त होणार असल्याने लवकर निदान होऊन कोव्हीड 19 चा प्रसार रोखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी पालकमंत्री महोदयांना लॅबच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री महोदयांनी लॅबमधील उपकरणांची व त्यांच्या कार्यप्रणालीची प्रक्रिया बारकाईने जाणून घेतली व मौलिक सूचना केल्या. याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री राजन विचारे, मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती श्री विजय नाहटा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment