Thursday, July 30, 2020

दररोज होत आहे 2000 हून अधिक नागरिकांची कोव्हीड 19 टेस्टींग, एपीएमसी मार्केटमध्ये अँटिजेन टेस्ट सेंटरला सुरूवात

दररोज होत आहे 2000 हून अधिक नागरिकांची कोव्हीड 19 टेस्टींग


 

आजमितीस 18 ठिकाणी अँटिजेन टेस्ट सेंटर सुरू असून दररोज साधारणत: 1300 हून अधिक व्यक्तींच्या अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहेत. तसेच अँटिजेन आणि आर.टी.-पी.सी.आर. मिळून 2000 हून अधिक व्यक्तींच्या कोव्हीड 19 टेस्ट करण्यात येत आहेत.

16 जुलै पासून 27 जुलैपर्यंत 7950 व्यक्तींच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यामध्ये 1570 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तथापि अँटिजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाला आणि त्या व्यक्तीमध्ये कोव्हीड 19 सदृष्य लक्षणे आढळत असतील तर त्या व्यक्तीची लगेच आर.टी.-पी.सी.आर. टेस्ट महापालिकेच्या वतीने मोफत करून घेण्यात येत आहे. तसेच पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील 20 पेक्षा अधिक व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात येते.

  एपीएमसी मार्केटमध्ये अँटिजेन टेस्ट सेंटरला सुरूवात

 

तुर्भे येथील ए.पी.एम.सी. च्या 5 मार्केटमध्ये संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातून जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी दररोज हजारो नागरिक विविध ठिकाणाहून येत असल्याने तेथील कोरोना प्रसार नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या ए.पी.एम.सी. प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून त्या ठिकाणी जाहीर केल्याप्रमाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. 27 जुलैपासून विशेष रॅपिड अँटिजेन टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment