Thursday, July 30, 2020

कोव्हीड 19 टेस्टींग संख्येत वाढ करून लवकर रूग्णशोध व विलगीकरणातून कोरोनाची साखळी खंडीत करण्यावर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा भर

कोव्हीड 19 टेस्टींग संख्येत वाढ करून लवकर रूग्णशोध व विलगीकरणातून कोरोनाची साखळी

खंडीत करण्यावर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा भर

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना नियंत्रणासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 'मिशन ब्रेक द चेन' ची प्रभावी अंमलबजावणी होण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. याव्दारे लवकरात लवकर रूग्णशोध करून त्यांचे त्वरित विलगीकरण करण्यावर भर दिला जात असल्याने या कोरोना बाधितांच्या माध्यमातून संसर्गातून पसरणारी कोरोनाची साखळी खंडीत करण्यावर भर दिला जात आहे. याकरिता पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत हॉटस्पॉट क्षेत्रे म्हणून लॉकडाऊन घोषित केलेल्या भागात घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी केली जात आहे व कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या व्यक्तींची लगेच ॲटिजेन टेस्ट करण्यात येत आहे.

रॅपीड अँटिजेन टेस्टींगव्दारे केवळ अर्ध्या तासाच्या आत तपासणी अहवाल प्राप्त होत असल्याने व त्यामधून कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती त्वरित समजत असल्याने अँटिजेन टेस्ट सेंटर वाढविण्यावर आयुक्तांनी भर दिला आहे.  16 जुलै रोजी सेक्टर 10 वाशी येथील महापालिकेच्या सार्वजनिक डेडिकेटेड कोव्हीड रूग्णालय येथून रॅपीड अँटिजेन टेस्टला प्रारंभ करण्यात आला असून या टेस्ट सेंटरच्या संख्येत दररोज वाढ होईल याकडे आयुक्तांचे कटाक्षाने लक्ष आहे.


No comments:

Post a Comment