Wednesday, August 19, 2020

Dr. Sanjay Mukherjee appointed as CIDCO’s new Vice-Chairman and Managing Director

Dr. Sanjay Mukherjee appointed as CIDCO’s new Vice-Chairman and Managing Director
Dr. Sanjay Mukherjee, an IAS officer has been appointed as new Vice-Chairman and Managing Director of CIDCO today on 19 August 2020. Before noon, he accepted the post’s responsibilities from Shri. Lokesh Chandra, former Vice -Chairman and Managing Director at CIDCO’s Nirmal Bhavan office at Mumbai. At that moment CIDCO’s Shri. Ashwin Mudgal, Joint Managing Director, Dr. Prashant Narnavare, Joint Managing Director, Shri. Ashok Shingare, Joint Managing Director and Shri. Nisar Tamboli, Chief Vigilance Officer were also present. Before being appointed at CIDCO, Dr. Sanjay Mukherjee was working as Secretary at Medical Education, Food and Drug Administration and Department of Cultural Affairs, Maharashtra. 
Dr. Sanjay Mukherjee, a 1996 batch IAS officer of Maharashtra cadre belongs from Nagpur. He secured his (Bachelor’s degree in Surgery) MBBS from Nagpur’s Government Medical College, Short-term course on Public Finance from Indian Institute of Management, Ahmedabad, Chartered Financial Analyst in Finance from Institute of Chartered Financial Analyst of India and Degree of Public Administration and Finance from Toronto University. Before appointment at CIDCO, Dr. Sanjay Mukherjee worked as Additional Commissioner (Projects), Mumbai Municipal Corporation, Commissioner at Maharashtra State Excise Department, Joint Managing Director at Maharashtra Airport Development Company, Commissioner at Jalgaon Municipal Corporation and Additional Commissioner at Nagpur Municipal Corporation.

Monday, August 10, 2020

सोसायटी, वसाहतीपर्यंत मोबाईल अँटीजेन टेस्ट व्हॅन सेवा देणा-या व जनजागृती करणा-या "मिशन झिरो नवी मुंबई" उपक्रमास पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ

सोसायटी, वसाहतीपर्यंत मोबाईल अँटीजेन टेस्ट व्हॅन सेवा देणा-या व जनजागृती करणा-या

 "मिशन झिरो नवी मुंबई" उपक्रमास पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ

 

      कोरोनाबाधित व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन कोरोनाची साखळी खंडित करण्यावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भर दिला जात असून याकरीता भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सोसायटी, वसाहतींमध्ये जाऊन नागरिकांच्या घरापर्यंत मोबाईल व्हॅनव्दारे अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा एक चांगला उपक्रम हाती घेतल्याबद्दल ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी  समाधान व्यक्त करीत यामधून मृत्युदर कमी करण्याचे उद्दीष्ट साध्य होईल अशी खात्री वाटते असे सांगितले.

      भारतीय जैन संघटनेच्या वतीने 'मिशन झिरो नवी मुंबई' या उपक्रमाची सुरुवात ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, खासदार श्री. राजन विचारे यांच्या सन्माननीय उपस्थितीत, वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या आवारात करण्यात आली. याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर, शासनाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती श्री. विजय नाहटा, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री धर्मेशभाई जैन, विजय लखानी, राहुल नाहटा, राजुल व्होरा, शिल्पिन तातर, डॉ. विवेकानंद सावंत व इतर महापालिका अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

      नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 'मिशन ब्रेक द चेन' हाती घेण्यात आले असून त्याव्दारे लवकरात लवकर रुग्ण शोध आणि त्याचे विलगीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेने अर्ध्या तासात तपासणी अहवाल प्राप्त होणाऱ्या अँटीजेन टेस्टींगवर भर दिला असून 22 अँटीजेन टेस्टींग केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. यामुळे रुग्ण शोध मोहिमेला गती प्राप्त्‍ा झाली आहे.

      तरीही अनेक नागरिक अँटीजेन टेस्टींग केंद्रांपर्यंत येऊन टेस्ट करत नसल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 'अँटीजेन टेस्ट आपल्या घरापर्यंत' ही संकल्पना नजरेसमोर ठेवून सोसायटी, वसाहतींपर्यंत अँटीजेन टेस्ट करण्यासाठी 'मोबाईल अँटिजेन टेस्ट व्हॅन' सुरु करण्याचे ठरविले. आयुक्तांच्या या संकल्पनेला भारतीय जैन संघटनेने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या माध्यमातून कोव्हीड-19 प्रतिबंधाचा प्रचार व अँटीजेन टेस्टींग सेवा देण्यासाठी नियोजन करण्यात आले. या उपक्रमास युनायटेड वे, क्रेडाई एम.सी.एच.आय., देश अपनायें या संस्थांचे सहकार्य लाभले आहे.

      या उपक्रमांतर्गत 6 प्रचाररथ तयार करण्यात आले असून त्यावर जिंगल्स, संवाद, निवेदन या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या सोसायटी, वसाहतीमध्ये अँटीजेन टेस्टींग करण्यात येणार आहे त्याठिकाणी आधीच्या दिवशी जाऊन दुसऱ्या दिवशी करण्यात येणाऱ्या अँटीजेन टेस्टींग बाबत माहिती दिली जाणार आहे व तेथील नागरिकांची मानसिकता तयार केली जाणार आहे.

      यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विकार असे आधीपासूनच आजार असणाऱ्या व्यक्तींच्या अँटीजेन टेस्टींगवर भर देण्यात येणार आहे. त्यासोबतच खोकला, ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. याशिवाय ज्या व्यक्ती स्वत:हून अँटीजेन टेस्ट करु इच्छितात त्यांचीही अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे. याकरीता एखादया सोसायटी, वसाहतीमार्फत त्यांच्या येथे अँटीजेन टेस्ट करावयाची मागणी झाल्यास त्या ठिकाणीही 'ऑन कॉल अँटीजेन टेस्ट सुविधा' उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यावेळी पालकमंत्री महोदयांना दिली.

      कोव्हिड - 19 रुग्णांची लवकरात लवकर माहिती मिळून कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी "मिशन झिरो नवी मुंबई" हा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरणार असून नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी घरापर्यंत अँटीजेन टेस्टींग उपलब्ध करुन देणारा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

Friday, July 31, 2020

अपोलो हॉस्पिटल मधील प्लाझमा डोनेशन कॅम्पची पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशंसा


 अपोलो हॉस्पिटलमधील प्लाझमा डोनेशन कॅम्पची पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशंसा

      त्याचप्रमाणे अपोलो हॉस्पिटल या ठिकाणी आयोजित प्लाझमा डोनेशन कॅम्पला भेट देऊन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री ना.श्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. येथे ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री राजन विचारे, मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती श्री विजय नाहटा, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अपोलो हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय प्रमुख श्री.संतोष मराठे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

      कोरोनावर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने कोरोनाशी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझमा अत्यंत महत्वाचा घटक असून प्लाझमा थेरपी एखाद्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरताना दिसत आहे. त्यामुळे प्लाझमा डोनेशन कॅम्पच्या माध्ययमातून नवी मुंबई महानगरपालिकेने अपोलो हॉस्पिटलच्या सहयोगाने उचललेले हे पाऊल प्रशंसनीय आहे. कोरोनामधून बरे झालेले जे नागरिक प्लाझमा डोनेशनसाठी स्वयंस्फुर्तीने पुढे येत आहेत त्यांचे कौतुक करीत ना. श्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्तीचे पालन करावे असे आवाहन केले. यावेळी प्लाझमा डोनेशन करणाऱ्या नागरिकांना मंत्रीमहोदयांच्या शुभहस्ते प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात आली.

नेरूळ रूग्णालयातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड -19 लॅबचीपालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी


      नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरूळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोव्हीड - 19 चाचणी व निदान (Rt-PCR Fully Automatic Lab) प्रयोगशाळेच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री एकनाथ शिंदे यांनी केली. दररोज 1 हजार कोव्हीड 19 चाचण्या होणारी महानगरपालिकेची स्वतःची लॅब नवी मुंबईकर नागरिकांसाठी उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या लॅबव्दारे २४ तासाच्या आत रिपोर्ट प्राप्त होणार असल्याने लवकर निदान होऊन कोव्हीड 19 चा प्रसार रोखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

‌        महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी पालकमंत्री महोदयांना लॅबच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री महोदयांनी लॅबमधील उपकरणांची व त्यांच्या कार्यप्रणालीची प्रक्रिया बारकाईने जाणून घेतली व मौलिक सूचना केल्या. याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री राजन विचारे, मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती श्री विजय नाहटा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


गृहराज्यमंत्री ना.श्री.सतेज पाटील यांचेकडून नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड 19 स्थितीचा आढावा

नवी मुंबईतील कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणा-या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.श्री.सतेज पाटील यांनी आज महापालिका मुख्यालयास भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महापालिका क्षेत्रातील कोव्हीड सद्यस्थितीची सादरीकरणाव्दारे माहिती देत कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या विविध कामांची व आगामी नियोजनाची माहिती मंत्री महोदयांना दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे आणि इतर महापालिका विभागप्रमुख उपस्थित होते.

      कोव्हीड 19 चाचण्यांसाठी काही दिवसातच नवी मुंबई महानगरपालिका स्वत:ची आरटीसीपीआर लॅब सुरू करीत असल्याबद्दल तसेच शहरातील बेड्सची संख्या रिअल टाईम नागरिकांना समजण्यासाठी ऑनलाईन लाईव्ह डॅशबोर्ड कार्यान्वित करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत गृहराज्यमंत्री ना.श्री.सतेज पाटील यांनी शहरातील व्हेंटिलेटर्स बेड्सची संख्या वाढविण्यावर भर द्यावा असे सूचित केले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि डायबेटिस, ब्लडप्रेशर असे इतर आजार असणा-या व्यक्तींकडे अधिक लक्ष द्यावे असे त्यांनी सूचित केले. ए.पी.एम.सी. मार्केट बंद करणे शक्य नाही मात्र त्याठिकाणी येणा-या प्रत्येक नागरिकाची स्क्रिनींग व्हावी याकरिता विशेष उपाययोजना करणेबाबत त्यांनी निर्देशित केले.

      रूग्णशोध व तपासणी वाढविण्यासोबतच मृत्यू दर कमी करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे उद्दिष्ट आयुक्तांनी नजरेसमोर ठेवले असून शहरातील रुग्णालयांशी संपर्क साधून नागरिकांना आवश्यक सेवा शासनाने निश्चित केलेल्या दरांतच मिळतील याकडे काटेकोर लक्ष देण्याचे तसेच महात्मा फुले आरोग्य योजनेतून जास्तीत जास्त नागरिकांना उपचार मिळावेत असे त्यांनी सूचित केले.. त्याचप्रमाणे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना नियमित मास्क वापरण्याचे तसेच बाहेर वावरताना एकमेकांमध्ये सुयोग्य अंतर ठेवण्याचे आवाहन गृहराज्यमंत्री ना.श्री. सतेज पाटील यांनी केले.

अनलॉककाळात महिला नोकरदारांना नवी मुंबई ते मुंबई प्रवास करण्यासाठी विशेष बस व रेल्वेची सुविधा उपलब्ध करणेबाबत आमदार मंदाताई म्हात्रे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नवी मुंबई:- कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना याचा सर्वाधिक फटका महिला नोकरदार वर्गाला झाला आहे. यातच लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेले 4 महिने कार्यालये बंद असल्याने सक्तीच्या रजेवर असलेल्या नोकरदार महिलांना नवी मुंबई ते मुंबई अशा प्रवासाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नोकरदार महिलांना प्रवासाची होणारी वाताहत पाहता नवी मुंबई ते मुंबई ये-जा प्रवास करण्याकरिता विशेष बस व रेल्वेची सुविधा उपलब्ध करण्याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांजकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, कोरोना महामारीने लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गेली महिने नवी मुंबईसह मुंबईतील नोकरदार महिला या विनावेतन रजेवर होत्या. सद्यस्थितीत अनलॉक सुरू झाल्यानंतर नवी मुंबई मधून मुंबईकडे किंवा मुंबईमधून नवी मुंबईकडे नोकऱ्यांसाठी महिलांचा प्रवास अनियमित होत असतो. परंतु सध्याच्या नियमावलीप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांना बस,ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी हेच पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी मध्यमवर्गीय नोकरदार महिलांना ऑटो किंवा टॅक्सी हा पर्याय परवडणारा नसल्याने शेवटी बस हाच एक पर्याय या महिलांसाठी आहे. परंतु कोविडची नियमावली पाहता बसमधून प्रत्येक सीटवर एक प्रवासी व उभे पाच प्रवासी अशा पद्धतीने प्रवास करता येऊ शकतो परंतु बस डेपोमधून बसेस या नेहमी भरून येत असल्याने उर्वरित बस स्टॉपवरील महिलांना बस मिळण्यासाठी साधारण दीड ते दोन तास वाट बघावी लागत आहे. एकूण बस थांबे पाहता कोणत्याही बस थांब्यावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय नाहीअशावेळी महिलांना प्रचंड त्रासास सामोरे जावे लागते. दुसरीकडे लोकल ट्रेन केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व शासकीय कर्मचाऱ्यांनाच प्रवासासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. नोकरदार महिलांना प्रवासाची होणारी वाताहत पाहता विशेष बस किंवा रेल्वेची सुविधा उपलब्ध करण्याबाबत एक महिला आमदार म्हणून अनेक महिलांची सातत्याने माझ्याकडे मागणी होत आहे. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांजकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 


Thursday, July 30, 2020

दररोज होत आहे 2000 हून अधिक नागरिकांची कोव्हीड 19 टेस्टींग, एपीएमसी मार्केटमध्ये अँटिजेन टेस्ट सेंटरला सुरूवात

दररोज होत आहे 2000 हून अधिक नागरिकांची कोव्हीड 19 टेस्टींग


 

आजमितीस 18 ठिकाणी अँटिजेन टेस्ट सेंटर सुरू असून दररोज साधारणत: 1300 हून अधिक व्यक्तींच्या अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहेत. तसेच अँटिजेन आणि आर.टी.-पी.सी.आर. मिळून 2000 हून अधिक व्यक्तींच्या कोव्हीड 19 टेस्ट करण्यात येत आहेत.

16 जुलै पासून 27 जुलैपर्यंत 7950 व्यक्तींच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यामध्ये 1570 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तथापि अँटिजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाला आणि त्या व्यक्तीमध्ये कोव्हीड 19 सदृष्य लक्षणे आढळत असतील तर त्या व्यक्तीची लगेच आर.टी.-पी.सी.आर. टेस्ट महापालिकेच्या वतीने मोफत करून घेण्यात येत आहे. तसेच पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील 20 पेक्षा अधिक व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात येते.

  एपीएमसी मार्केटमध्ये अँटिजेन टेस्ट सेंटरला सुरूवात

 

तुर्भे येथील ए.पी.एम.सी. च्या 5 मार्केटमध्ये संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातून जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी दररोज हजारो नागरिक विविध ठिकाणाहून येत असल्याने तेथील कोरोना प्रसार नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या ए.पी.एम.सी. प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून त्या ठिकाणी जाहीर केल्याप्रमाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. 27 जुलैपासून विशेष रॅपिड अँटिजेन टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले आहे.