Thursday, August 27, 2020

इंटकच्या पाठपुराव्यामुळे पालिका कामगारांची वेतनवाढ

 इंटकच्या पाठपुराव्यामुळे पालिका कामगारांची वेतनवाढ




महापालिका प्रशासनात आरोग्य विभागात काम करणार्‍या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम)  काम करणारे डाटा एंण्ट्री ऑपरेटर, सहाय्यक परिचारिका (एएनएम), वाहनचालक, औषध निर्माता, स्टाफ नर्स या सर्वाच्या वेतनात पालिका प्रशासनाने वेतनवाढ मिळाली आहेे. या कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ व्हावी, समान कामाला समान वेतन हा निकष लावावा या मागणीसाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत हेे गेेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करत होेते. इंटकच्या पाठपुराव्यामुळे वेतनवाढ झाल्याची प्रतिक्रिया संबंधित कर्मचार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहेे.
संबंधित कामगारांच्या वेतनवाढ यासह अन्य समस्यांबबाबत नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी विधानसभा  अध्यक्ष नाना पटोळेे यांच्याकडेही पाठपुरावा  केला होता. या पाठपुराव्याची दखल   घेत नाना पटोळे यांनी त्यांच्या दालनात महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पालिका अधिकारी व कामगार संघटना यांच्यामध्ये बैठक घडवून आणतानना संबंधित कामगारांना लवकरात लवकर न्याय देण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला  दिलेे होेते. स्वत: विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे नवी मुंबईतील कामगार समस्या सोडविण्यात पुढाकार घेत असल्याचे पाहून पालिका प्रशासनाने कामगारांच्या वेतनवाढीच्या प्रक्रियेला गती दिली असल्याची माहिती रवींद्र सावंत यांनी दिली.
या कामगारांना अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेत पालिका प्रशासनाकडून कमी वेतन मिळत आहेे. तेथील महापालिका प्रशासनात काम करणार्‍यांना मिळणारे  वेतन व नवी मुंबई महापालिका प्रशासनातील जुन्या अनुभवी कर्मचार्‍यांना कमी वेतन ही वस्तूस्थिती इंटकच्या माध्यमातून रवींद्र सावंत यांनी महापालिका प्र्रशासनाच्या निदर्शनासही आणून दिली होती. तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याही सतत भेटीगाठी घेत संबंधित कामगारांच्या वेतनवाढीसाठी पाठपुरावा केला होता. मिसाळ यांनी दोन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर संबंधित कामगारांच्या वेतनवाढीच्या एका  फाईलवर सही केल्याची व विद्यमान आयुक्त अभिजित बांगर यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती कामगार नेेते रवींद्र सावंत यांनी दिली. या कामगारांना गेली अनेक वर्षे  अवघ्या 6 ते 7 हजार रूपये मासिक वेतनावर काम करावे लागत होेते.
1 जुलै 2020 पासून या कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्यामुळे किमान वेतन 6 ते 7 हजार  रूपयावर काम करणार्‍या कामगारांना आता 20 हजार 213 रूपये वेतन मिळण्यास या महिन्यापासून सुरूवात झाली आहेे. बहूउद्देशीय संवर्गात काम करणार्‍या अर्धकुशल कामगारांना इतकी वर्षे काम केेल्यामुळे त्यांना कुशल कामगार म्हणून पदोन्नती मिळावी म्हणून इंटकच्या माध्यमातून रवींद्र सावंत यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे पालिका प्रशासनान  संबंधित कामगारांना कुशल कामगार म्हणून बढती दिल्याची व वेतनवाढ झाल्याची माहिती कामगार वर्गाकडून देण्यात येेत आहेे.  
इंटकच्या पाठपुराव्यामुळे यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच  आम्हाला पावला असल्याची प्रतिक्रिया पालिका प्रशासनात काम करणार्‍या परिचारिका, डाटा एण्ट्री ऑपरेटर, औषध निर्माता  आदी  संवर्गातील कामगारांकडून व्यक्त करण्यात येत आहेे.

* पत्रकारांच्या सहकार्यामुळे झाले शक्य
कामगारांच्या प्रश्नाविषयी आम्ही सातत्याने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो. त्या त्या वेळी नवी मुंबईतील पत्रकारांनीही कामगारांच्या समस्यांना, इंटकच्या पाठपुराव्याला प्रसिध्दी देण्याचे काम केलेे. पत्रकारांच्या सहकार्यामुळेच कामगार वर्गाचे प्र्रश्न सुटण्यास मदत झाली असल्याची प्रतिक्रिया नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी दिली.

No comments:

Post a Comment