Friday, August 28, 2020

*शिवछाया मित्र मंडळाचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा . . . !!*

 *शिवछाया मित्र मंडळाचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा . . . !!*



       या वर्षी शिवछाया मित्रमंडळाचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा असल्याने साहजिकच या वर्षी या माध्यमातून आगळावेगळा देखावा आणि काहीतरी वेगळं विचारधन मिळेल ही भावना व उत्सुकताही गणेश भक्तांच्या मनात होती. मात्र यावर्षी कोरोनाचं वैश्विक  संकट लक्षात घेता, शासकीय नियमांच्या अधीन राहून  या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा आम्ही अगदी  नाईलाजास्तव साधेपणाने साजरा केलेला आहे.
         हा उत्सव साजरा करताना यावर्षी आम्ही  पर्यावरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन *झाडे लावा - झाडे जगवा* हा छोटेखानी देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्यात  झाडे व फुलांची सजावट करण्यात आली होती.  "नवी मुंबईचा राजा" म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गणेशोत्सवादरम्यान सर्व मंडप तसेच आजूबाजूचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला होता.  मंडपांच्या प्रथमदर्शनी सॅनिटायझर स्टॅंड ठेवण्यात आले होते. तसेच ऑक्सिमीटर ने प्रत्येक भाविकांची तपासणी करण्यात आली होती.मास्क घालूनच दर्शन देण्यात आले. दरवर्षी नऊ फुटाच्या मूर्तीची स्थापना करत असताना या वर्षी मात्र फक्त एकवीस इंच (२१) उंचीची शाडूमातीच्या  मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
यावर्षी कोरोनाचं संकट लक्षात घेता मंडळाने कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली नाही. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्याच वर्गणीतून यावर्षी उत्सव साधेपणाने करीत असताना मागील शिल्लक राशीचा वापर  कोरोना संकटाशी लढण्यासाठी, 

मुख्यमंत्री सहायता निधीस १ लाख रुपयांची मदत देण्यात आली. 

तसेच परराज्यातील कामगार, नागरिक या ठिकाणी अडकून पडले होते. अशा तुर्भे, वाशी परिसरातील ८०० नागरिकांना रोज दुपारचे जेवण सतत ४० दिवस पुरवण्यात आले. 

तसेच गरीब व गरजूंना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.तसेच मुंबई विद्यापीठ कॅम्पस, गरवारे कॅन्टीन येथे शासनामार्फत कम्युनिटी किचन हा गरीब व गरजू लोकांना भोजनाची  व्यवस्था व्हावी  म्हणून एक चांगला उपक्रम सुरू  केलेला होता.  त्यासाठी मंडळाने पाचशे किलो अन्नधान्याची (तांदूळ, तुरडाळ, कांदे, बटाटे, टोमॅटो आणि भाजपाला)  वस्तुरूपाने मदत दिली.
 
वाडा येथील आदिवासी कुटुंबातील पाच विद्यार्थ्यांना बारावीनंतर शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली.

आई वडील हयात नसलेल्या कुमारी योगेश्वरी भाऊ चामणर हिला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे वादळात  नुकसान झालेल्या  कुटुंबियांना मंडळाकडून आर्थिक मदत देण्यात देण्यात आली.

यावर्षी कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे भव्यदिव्य आरास, देखावा जरी आम्हाला साजरा करता आला नसला तरीही सामाजिक जाणिवेत मात्र आमचे मंडळ कुठेही कमी पडले नाही. *कारण आम्ही जपतो सामाजिक बांधिलकी...*

                   अंकुश वैती      
                         अध्यक्ष
          शिवछाया मित्र मंडळ                                          
                  तुर्भे, नवी मुंबई 


सेक्रेटरी  : अशोक पाटील







No comments:

Post a Comment