नवी मुंबई - *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे* यांच्याकडून विभागातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या महापालिकेच्या सफाई कामगारांना *शनिवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२० रोजी* मोफत 'मनसे हेल्थ लॅब कार्ड' चे वाटप करण्यात आले. सध्या कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात रक्त तपासणी तसेच इतर वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मोठा खर्च येत आहे. त्यातच संचारबंदीमुळे सफाई कामगारांचे आर्थिक बजेट सुद्धा कोलमडले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे पी.आर.एस.लॅबमध्ये सफाई कामगारांना रक्त तसेच इतर वैद्यकीय तपासणी करण्यासाठी *५० % सवलत* मिळावी यासाठी मोफत 'मनसे हेल्थ लॅब कार्ड' वाटप करण्यात आले. 'मनसे' तर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा शेकडो सफाई कामगारांनी लाभ घेतला. *सफाई कामगारांच्या परिश्रमामुळे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई महानगरपालिकेला देशातून तिसरे आणि महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकाचे मानांकन मिळाल्या बद्दल सफाई कामगारांचे मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी यावेळी अभिनंदन केले.* यावेळी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अविनाश यादव, सुपर वायजर ज्ञानेश्वर पाटील, सुपर वायजर भगवान हिवाळे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे नवी मुंबई उपचिटणीस दिनेश काकडे, महाराष्ट्र सैनिक वैभव जिमन, महाराष्ट्र सैनिक प्रणिल गडेकर हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment