Friday, September 4, 2020

Police Commissioner of Navi Mumbai visited at Covid Care center 'Nivara' at Kalamboli, Navi Mumbai

Today Mr. Bipin Kumar Singh sir, Police Commissioner of Navi Mumbai visited at Covid Care center 'Nivara' at Kalamboli where all the corona infected polices are admitted, where he inquired about the health of admitted Police staff.
आज नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री बिपिन कुमार सिंह सर यांनी कोविड केअर सेंटर, कळंबोली 'निवारा' येथे भेट दिली जिथे कोरोना संक्रमित सर्व पोलिसांना दाखल केले जाते. सरांनी दाखल पोलिसांची आरोग्यविषयक विचारपूस केली.

Thursday, September 3, 2020

Mr. Bipin Kumar Singh has taken a charge of Navi Mumbai Police Commissioner from Mr. Sanjay Kumar.






श्री. बिपिन कुमार सिंह यांनी श्री. संजय कुमार यांचे कडून नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला.
Mr. Bipin Kumar Singh has taken a charge of Navi Mumbai Police Commissioner from Mr. Sanjay Kumar.

Tuesday, September 1, 2020

Charge D’Affaires of UAE in Mumbai meets Governor

 Charge D’Affaires of UAE in Mumbai meets Governor


 Saud Abdelaziz Alzarooni, Charge D’Affaires of the Consulate General of the United Arab Emirates in Mumbai called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Monday (31st Aug).

            Stating that the relations between India and the United Arab Emirates date back to several years, Mr Saud Abdelaziz called for further strengthening the relations between the two great countries.

            Recalling that Prime Minister Narendra Modi had opened a big temple in Abu Dhabi, he said UAE is the most peaceful and progressive nation in the Gulf region which respects the religion and culture of all people.

            Mentioning that a large number of people from UAE visit India for medical treatment, tourism, business and family relations, he said these visits will resume once all restrictions on the movement of people placed due to the Coronavirus pandemic are eased.  He expressed the confidence that India will overcome the Covid -19 challenge on its own because of its superior doctors and healthcare infrastructure.

            Governor Koshyari said the relations between India and the UAE have historic contexts. He said the people of the two countries are bound by the common elements of culture, food and traditions. The Governor called for further strengthening the relations between India and the UAE.

Friday, August 28, 2020

*शिवछाया मित्र मंडळाचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा . . . !!*

 *शिवछाया मित्र मंडळाचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा . . . !!*



       या वर्षी शिवछाया मित्रमंडळाचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा असल्याने साहजिकच या वर्षी या माध्यमातून आगळावेगळा देखावा आणि काहीतरी वेगळं विचारधन मिळेल ही भावना व उत्सुकताही गणेश भक्तांच्या मनात होती. मात्र यावर्षी कोरोनाचं वैश्विक  संकट लक्षात घेता, शासकीय नियमांच्या अधीन राहून  या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा आम्ही अगदी  नाईलाजास्तव साधेपणाने साजरा केलेला आहे.
         हा उत्सव साजरा करताना यावर्षी आम्ही  पर्यावरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन *झाडे लावा - झाडे जगवा* हा छोटेखानी देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्यात  झाडे व फुलांची सजावट करण्यात आली होती.  "नवी मुंबईचा राजा" म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गणेशोत्सवादरम्यान सर्व मंडप तसेच आजूबाजूचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला होता.  मंडपांच्या प्रथमदर्शनी सॅनिटायझर स्टॅंड ठेवण्यात आले होते. तसेच ऑक्सिमीटर ने प्रत्येक भाविकांची तपासणी करण्यात आली होती.मास्क घालूनच दर्शन देण्यात आले. दरवर्षी नऊ फुटाच्या मूर्तीची स्थापना करत असताना या वर्षी मात्र फक्त एकवीस इंच (२१) उंचीची शाडूमातीच्या  मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
यावर्षी कोरोनाचं संकट लक्षात घेता मंडळाने कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली नाही. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्याच वर्गणीतून यावर्षी उत्सव साधेपणाने करीत असताना मागील शिल्लक राशीचा वापर  कोरोना संकटाशी लढण्यासाठी, 

मुख्यमंत्री सहायता निधीस १ लाख रुपयांची मदत देण्यात आली. 

तसेच परराज्यातील कामगार, नागरिक या ठिकाणी अडकून पडले होते. अशा तुर्भे, वाशी परिसरातील ८०० नागरिकांना रोज दुपारचे जेवण सतत ४० दिवस पुरवण्यात आले. 

तसेच गरीब व गरजूंना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.तसेच मुंबई विद्यापीठ कॅम्पस, गरवारे कॅन्टीन येथे शासनामार्फत कम्युनिटी किचन हा गरीब व गरजू लोकांना भोजनाची  व्यवस्था व्हावी  म्हणून एक चांगला उपक्रम सुरू  केलेला होता.  त्यासाठी मंडळाने पाचशे किलो अन्नधान्याची (तांदूळ, तुरडाळ, कांदे, बटाटे, टोमॅटो आणि भाजपाला)  वस्तुरूपाने मदत दिली.
 
वाडा येथील आदिवासी कुटुंबातील पाच विद्यार्थ्यांना बारावीनंतर शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली.

आई वडील हयात नसलेल्या कुमारी योगेश्वरी भाऊ चामणर हिला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे वादळात  नुकसान झालेल्या  कुटुंबियांना मंडळाकडून आर्थिक मदत देण्यात देण्यात आली.

यावर्षी कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे भव्यदिव्य आरास, देखावा जरी आम्हाला साजरा करता आला नसला तरीही सामाजिक जाणिवेत मात्र आमचे मंडळ कुठेही कमी पडले नाही. *कारण आम्ही जपतो सामाजिक बांधिलकी...*

                   अंकुश वैती      
                         अध्यक्ष
          शिवछाया मित्र मंडळ                                          
                  तुर्भे, नवी मुंबई 


सेक्रेटरी  : अशोक पाटील







Thursday, August 27, 2020

मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांच्याकडून महापालिकेच्या सफाई कामगारांना मोफत 'मनसे हेल्थ लॅब कार्ड' वाटप



नवी मुंबई - *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे* यांच्याकडून विभागातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या महापालिकेच्या सफाई कामगारांना *शनिवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२० रोजी* मोफत 'मनसे हेल्थ लॅब कार्ड' चे वाटप करण्यात आले. सध्या कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात रक्त तपासणी तसेच इतर वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मोठा खर्च येत आहे. त्यातच संचारबंदीमुळे सफाई कामगारांचे आर्थिक बजेट सुद्धा कोलमडले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे पी.आर.एस.लॅबमध्ये सफाई कामगारांना रक्त तसेच इतर वैद्यकीय तपासणी करण्यासाठी *५० % सवलत* मिळावी यासाठी मोफत 'मनसे हेल्थ लॅब कार्ड' वाटप करण्यात आले. 'मनसे' तर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा शेकडो सफाई कामगारांनी लाभ घेतला. *सफाई कामगारांच्या परिश्रमामुळे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई महानगरपालिकेला देशातून तिसरे आणि महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकाचे मानांकन मिळाल्या बद्दल सफाई कामगारांचे मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी यावेळी अभिनंदन केले.* यावेळी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अविनाश यादव, सुपर वायजर ज्ञानेश्वर पाटील, सुपर वायजर भगवान हिवाळे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे नवी मुंबई उपचिटणीस दिनेश काकडे, महाराष्ट्र सैनिक वैभव जिमन, महाराष्ट्र सैनिक प्रणिल गडेकर हे उपस्थित होते.

इंटकच्या पाठपुराव्यामुळे पालिका कामगारांची वेतनवाढ

 इंटकच्या पाठपुराव्यामुळे पालिका कामगारांची वेतनवाढ




महापालिका प्रशासनात आरोग्य विभागात काम करणार्‍या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम)  काम करणारे डाटा एंण्ट्री ऑपरेटर, सहाय्यक परिचारिका (एएनएम), वाहनचालक, औषध निर्माता, स्टाफ नर्स या सर्वाच्या वेतनात पालिका प्रशासनाने वेतनवाढ मिळाली आहेे. या कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ व्हावी, समान कामाला समान वेतन हा निकष लावावा या मागणीसाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत हेे गेेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करत होेते. इंटकच्या पाठपुराव्यामुळे वेतनवाढ झाल्याची प्रतिक्रिया संबंधित कर्मचार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहेे.
संबंधित कामगारांच्या वेतनवाढ यासह अन्य समस्यांबबाबत नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी विधानसभा  अध्यक्ष नाना पटोळेे यांच्याकडेही पाठपुरावा  केला होता. या पाठपुराव्याची दखल   घेत नाना पटोळे यांनी त्यांच्या दालनात महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पालिका अधिकारी व कामगार संघटना यांच्यामध्ये बैठक घडवून आणतानना संबंधित कामगारांना लवकरात लवकर न्याय देण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला  दिलेे होेते. स्वत: विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे नवी मुंबईतील कामगार समस्या सोडविण्यात पुढाकार घेत असल्याचे पाहून पालिका प्रशासनाने कामगारांच्या वेतनवाढीच्या प्रक्रियेला गती दिली असल्याची माहिती रवींद्र सावंत यांनी दिली.
या कामगारांना अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेत पालिका प्रशासनाकडून कमी वेतन मिळत आहेे. तेथील महापालिका प्रशासनात काम करणार्‍यांना मिळणारे  वेतन व नवी मुंबई महापालिका प्रशासनातील जुन्या अनुभवी कर्मचार्‍यांना कमी वेतन ही वस्तूस्थिती इंटकच्या माध्यमातून रवींद्र सावंत यांनी महापालिका प्र्रशासनाच्या निदर्शनासही आणून दिली होती. तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याही सतत भेटीगाठी घेत संबंधित कामगारांच्या वेतनवाढीसाठी पाठपुरावा केला होता. मिसाळ यांनी दोन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर संबंधित कामगारांच्या वेतनवाढीच्या एका  फाईलवर सही केल्याची व विद्यमान आयुक्त अभिजित बांगर यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती कामगार नेेते रवींद्र सावंत यांनी दिली. या कामगारांना गेली अनेक वर्षे  अवघ्या 6 ते 7 हजार रूपये मासिक वेतनावर काम करावे लागत होेते.
1 जुलै 2020 पासून या कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्यामुळे किमान वेतन 6 ते 7 हजार  रूपयावर काम करणार्‍या कामगारांना आता 20 हजार 213 रूपये वेतन मिळण्यास या महिन्यापासून सुरूवात झाली आहेे. बहूउद्देशीय संवर्गात काम करणार्‍या अर्धकुशल कामगारांना इतकी वर्षे काम केेल्यामुळे त्यांना कुशल कामगार म्हणून पदोन्नती मिळावी म्हणून इंटकच्या माध्यमातून रवींद्र सावंत यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे पालिका प्रशासनान  संबंधित कामगारांना कुशल कामगार म्हणून बढती दिल्याची व वेतनवाढ झाल्याची माहिती कामगार वर्गाकडून देण्यात येेत आहेे.  
इंटकच्या पाठपुराव्यामुळे यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच  आम्हाला पावला असल्याची प्रतिक्रिया पालिका प्रशासनात काम करणार्‍या परिचारिका, डाटा एण्ट्री ऑपरेटर, औषध निर्माता  आदी  संवर्गातील कामगारांकडून व्यक्त करण्यात येत आहेे.

* पत्रकारांच्या सहकार्यामुळे झाले शक्य
कामगारांच्या प्रश्नाविषयी आम्ही सातत्याने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो. त्या त्या वेळी नवी मुंबईतील पत्रकारांनीही कामगारांच्या समस्यांना, इंटकच्या पाठपुराव्याला प्रसिध्दी देण्याचे काम केलेे. पत्रकारांच्या सहकार्यामुळेच कामगार वर्गाचे प्र्रश्न सुटण्यास मदत झाली असल्याची प्रतिक्रिया नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी दिली.

वाशीचे पालिका रुग्णालय १५ सप्टेंबरपासून सर्व उपचारांसाठी खुले होणार


 वाशीचे पालिका रुग्णालय १५ सप्टेंबरपासून सर्व उपचारांसाठी खुले होणार

लोकनेते आ.गणेश नाईक यांची मागणी पूर्ण
नवी मुंबई प्रतिनिधी
वाशीचे प्रथम संदर्भ पालिका रुग्णालय कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यरत असल्याने कोरोना व्यतिरिक्त आजारांवरील उपचार बंद होते.  इतर व्याधींच्या रुग्णांना उपचारासाठी एकमेव आधार असलेले हे रुग्णालय सर्व आजारांवरील उपचारासाठी खुले करावे, अशी मागणी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी लावून धरली होती. त्या मागणीवर कार्यवाही होणार असून येत्या १५ सप्टेंबर २०२०नंतर हे रुग्णालय जनरल रुग्णालय म्हणून काम करणार आहे.
नवी मुंबईत कोरोना प्रतिबंधासाठी लोकनेेते आ.नाईक सातत्याने प्रयत्नशील आहेत. पालिका आयुक्तांच्या त्या नियमित भेटी घेत आहेत. या आढावा बैठकांमधून त्यांनी केलेल्या उपयुक्त सुचनांवर पालिकेने सकारात्मक कार्यवाही केली आहे. प्रथम संदर्भ रुग्णालय १५ सप्टेंबरपासून  जनरल रुग्णालय म्हणून काम करण्यास सुरुवात करेल, अशी माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी लोकनेते नाईक यांना सोमवारच्या भेटीत दिली आहे. नेरुळच्या डॉ डि. वाय. पाटील  रुग्णालयाबरोबर पालिकेने करार केला असून या अंतर्गत त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यात २०० आय.सी.सी.यू. बेड व्हेंटिलेटर सुविधेसह उपलब्ध करुन दिले जात आहेत. या नंतर वाशीचे कोविड रुग्णालय नेरुळ येथे हलविण्यात येणार आहे. लोकनेते आ. नाईक यांच्या समवेत आयुक्तांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळात माजी खासदार डॉ संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी सभापती नेत्रा शिर्के, माजी सभापती डॉ जयाजी नाथ, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी सभापती सुरज पाटील, माजी सभापती शंकर मोरे,  माजी सभापती विशाल डोळस आदी मान्यवरांचा समावेश होता. 
लॉकडाउनच्या काळात नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. मुलांचा शैक्षणिक खर्च कसा करायचा? असा गहन प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती लवकरात-लवकर अदा करावी, अशी मागणी लोकनेते नाईक यांनी केली होती. या मागणीवर पालिकेचा शिक्षण विभाग अंतिम टप्प्यावर काम करीत असून लवकरच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. या शिवाय राज्य आणि केंद्र शासनाच्या शालेय पोषण आहाराचा लाभही विद्यार्थ्यांना द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी पालिकेकडे केली आहे.
कोविड सेंटरमधून व्हिटॅमिनच्या गोळया नसल्याच्या बातम्या येत असल्याबददल प्रसिध्दी माध्यमांनी विचारले असता ५० हजार गोळयांचा साठा सद्यस्थितीत पालिकेकडे असल्याची माहिती आपल्याला आयुक्त बांगर यांनी दिल्याचे लोकनेते नाईक म्हणाले. कोविडसह इतर सर्व पालिका रुग्णालयांमधून औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, अशी सुचना लोकनेते नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.
कोरोना निर्मुलनासाठी आरोग्यावर प्राधान्याने खर्च करीत असताना शहर विकासाच्या बाबींकडे लक्ष देण्याची सुचना त्यांनी पालिका आयुक्तांना केली. बगिचे, रस्ते, पदपथ, उडडाणपूल, परिवहन बसेस,शाळांच्या इमारती अशा सर्व सेवा आणि वास्तूंच्या देखभालीसाठी पालिकेला खर्च करावा लागणार आहे.  त्यामुळे पालिकेने आपले उत्पन्न, झालेला खर्च, विनियोग न झालेला निधी यांचा समग्र आढावा घेवून खर्चाचे नियोजन करावे, असा सल्ला त्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
केंद्रीय स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबईने प्राप्त केलेले यश हे जागरुक नवी मुंबईकर, सतर्क लोकप्रतिनिधी, कर्तव्यदक्ष पालिका कर्मचारी-अधिकारी आणि विशेषकरुन प्रत्यक्ष काम करणारे सफाई कर्मचारी तसेच या सर्वांना मार्गदर्शन करणारी प्रसिध्दी माध्यमं यांना असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. स्वच्छ सर्वेक्षणात देशस्तरावर तिसरा क्रमांक नवी मुंबईला मिळाला आहे.पुढच्या वर्षी पाहिले स्थान पटकाविण्याचा प्रयत्न व्हावा,असे आवाहन त्यांनी केले.
अवतरण...
नवी मुंबईत जोपर्यंत कोरोनावर नियंत्रण येत नाही तोपर्यंत आम्ही आमचे प्रयत्न सुरुच ठेवणार आहोत. पालिका आयुक्तांबरोबर आढावा बैठका होत राहतील. 
-लोकनेते आ.गणेश नाईक