Tuesday, May 5, 2020

कोव्हीड केअर सेंटरसाठी (CCC)सिडको एक्झिबिकेशन सेंटरची आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केली पाहणी

कोव्हीड केअर सेंटरसाठी सिडको एक्झिबिकेशन सेंटरची आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केली पाहणी

--------------------------------------------------

तेरणा हॉस्पिटल येथे 100 बेड्सचे डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटलचे नियोजन

--------------------------------------------------

रिलायन्स ऑक्युपेशनल हेल्थ सेंटरमध्ये 60 बेड्सचे कोव्हीड केअर सेंटर कार्यान्वित


 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्यावरील उपचाराकरिता वैद्यकीय व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी विभागप्रमुखांची तातडीने बैठक घेत आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली.

यामध्ये केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोव्हीड केअर सेंटर (CCC), डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (DCHC), डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल (DCH) अशाप्रकारे  तयार करण्यात आलेल्या त्रिस्तरीय रुग्णालय व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेत त्यामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्यासाठी त्यांनी निर्देश दिले.

या अनुषंगाने वाशी येथील सिडको एक्झिबिकेशन सेंटर याठिकाणी कोव्हीड केअर सेंटर (CCC) सुरु करण्याच्या अनुषंगाने आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील व उपआयुक्त श्री. अमरिश पटनिगिरे यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन जागेची पाहणी केली व त्याठिकाणी कोव्हीड केअर सेंटर सुरु करणयाच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्याठिकाणी अंदाजे 1200 बेड्सची व्यवस्था करण्यात येणार असून तेथे दोन स्वतंत्र कक्ष असणार आहेत. यामधील एका कक्षात स्वॅब सॅम्पल टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या व सौम्य स्वरुपाची लक्षणे असलेल्या कोव्हिड - 19 बाधीतांवर स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार आहेत तसेच  दुस-या स्वतंत्र कक्षात कोरोना पॉझिटिव्ह नागरिकाच्या संपर्कात आल्यामुळे क्वारंटाईन केलेल्या संशयित नागरिकांना ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी आवश्यक असलेल्या स्नानगृहे व स्वच्छतागृहांची व्यवस्था मॉड्युलर स्वरुपात त्वरित करण्याचे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागाला दिले.

त्याचप्रमाणे घणसोली येथील रिलायन्स कॉर्पोरेट आय.टी. पार्कमध्ये मेडिकल ॲण्ड ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर या ठिकाणीही कोव्हीड केअर सेंटर (CCC) करिता 120 बेड्स असणार असून त्यामधील 60 बेड्स महानगरपालिका संदर्भित कोरोना संदर्भिय व्यक्तींसाठी राखीव असणार आहेत. येथे महानगरपालिकेमार्फत कामकाज नियंत्रणासाठी नोडल ऑफिसर म्हणून डॉ. वरुण घिलडियाल यांची नियुक्ती महापालिका आयुक्त यांनी केली आहे.  

तसेच सद्यस्थितीत वाशी सार्वजनिक रुग्णालयात 130 बेड्सचे डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल (DCH) कार्यान्वित असून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी सेक्टर 22 नेरुळ येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये पहिल्या टप्प्यात 100 बेड्सचे डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल (DCH) सुरु करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. याठिकाणी महानगरपालिकेमार्फत कामकाज नियंत्रणासाठी नोडल ऑफिसर म्हणून डॉ. रुषिभा जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.  

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड 19  नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना कोरोना बाधीत व्यक्तींवर सुयोग्य उपचार व्हावेत व कोणताही रूग्ण वैद्यकीय उपचारांशिवाय राहू नये याकरिता वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आयुक्त तातडीने निर्णय घेत असून त्याची अंमलबजावणी करण्याकडेही काटेकोर लक्ष दिले जात आहे.

तरी नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखून आपले नवी मुंबई शहर कोरोना मुक्त करण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे व घरातच थांबावे आणि कोरोनाची संसर्गाव्दारे वाढणारी साखळी खंडीत करावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

Saturday, May 2, 2020

Navi Mumbai's Quarantine song

Navi Mumbai's Quarantine song
क्वारंटाईन का गाना 
Presenting a  very special  song (link given down) by altogeter 26  children in lockdown with their extra efforts to reach each and every individual  in the country to spread the social message Stay home  - stay safe 
In the most innovative way.
This is a no profit project,  so every    view and share will count in reaching to the poor and needy people in the society in this lockdown situation. 
Concept and lyrics : Trupti Zemse Jadhav 
Composing  and music arrangement : Monika  Jadhav
https://youtu.be/nr5pjCidYQs 


Friday, May 1, 2020

महावितरणच्या नागोठणे शाखातील कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून वीजपुरवठा पूर्ववत केला

भांडूप,दि. 1/05/2020: बुधवारी, दि. 29/4/2020 रोजी सायंकाळी 6 वाजता पाली मध्ये आलेल्या वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या पाली उपविभागातील नागोठणे शाखाचे  खूप  मोठे नुकसान झाले. जोरदार वारा व पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी विद्युत खांब पडले तसेच अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडून महावितरणच्या विद्युत तारावर पडले होते. यामुळे, नागोठणे व त्या लगतच्या परिसरातील  वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, महावितरणच्या पाली उपविभागातील नागोठणे शाखातील  कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून  संपूर्ण भागाचा वीजपुरवठा एका दिवसात पूर्ववत केला. 
या वारा व पावसाने उग्र रूप घेतल्यामुळे एम.आय.डी. सी.1 व नागोठणे फीडर ब्रेकडाऊन झाले होते.  नागोठणे शहरातील 20-25 लघुदाब वाहिन्या तुटून पडल्या होत्या, 6 लघुदाब वाहिनीचे  व 2 उच्चदाब वाहिनीचे  खांब पडले होते तसेच सात वेगवेगळ्या ठिकाणी उच्चदाब वाहिनीचे कंडक्टर तुटले होते. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्यात अडचण येत होती. तरी देखील रात्री 11:30 च्या सुमारास नागोठणे फीडर 50% पूर्ववत करण्यात आला होता. एम.आय. डी.सी 1 फीडरवर झाड पडल्याने, या फीडरवरील वीजपुरवठा पूर्ववत झाला नव्हता. दि. 30/4/2020 रोजी सकाळी 6 वाजता परत कामाची सुरुवात करून सकाळी 8 वाजता हा फीडर ही   चालू करण्यात आला. नागोठणे फीडरवर उरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा 11:30 वाजता पूर्ववत करण्यात आला. नंतर, पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. दीपक पाटील यांच्या  नेतृत्वात नागोठणे शाखेतील सहाय्यक अभियंता श्री. वैभव गायकवाड व इतर कर्मचाऱ्यांनी दोन टीम तयार करून लघुदाब वाहिनीच्या कामासाठी नियोजन करून पूर्ण परिसराचा वीजपुरवठा रात्री 8:30 वाजता पूर्ववत केला. यावेळी, पाली विभागातील उपकार्यकारी अभियंता श्री. जतीन पाटील यांनी मार्गदर्शन केले.
कोरोना संसर्गाच्या संकटात आपली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता सौ. पुष्पा चव्हाण यांनी  केले.

TIA distributed 720 Personal Protective kits to Taloja Police Station, Navi Mumbai

Taloja Industries Association (TIA) had approached Industries in Taloja MIDC to 
help in various noble causes like-
a) Helping contribute towards purchase of Food bags and distribute to 
impoverished families in Taloja MIDC.
b) Helping towards purchase of Medical equipment's/provisions, which are 
required to fight Covid19.
Based on this appeal, Pidilite Industries Ltd came forward and expressed their 
desire to distribute Personal Protective kits to Navi Mumbai Police 
Commissionerate. Police personnel’s were chosen for distribution as they are 
actively engaged in prevention of Covid19 pandemic and deal with COIVD-19 
patients and thereby rightly termed as Corona Warriors. 
Further, TODAY, Pidilite Industries has distributed 720 Personal Protective kits 
to Shri Kashinath Chavan, Senior Police Inspector, Taloja Police Station. This 
distribution was done at the hands of Shri Satish Shetty (Anna), Hon President -
Taloja Industries, Association (TIA), Shri Babu George, Proprietor - B.G. 
Enterprise, Shri Binu Pappachan, CEO B.G.Enterprise & Shri Sunil Padhihari, 
Executive Secretary – TIA.
Each Personal Protective kit comprises of 10 Face Masks+2 Hand Gloves+1 
Sanitizer. This kit has been assembled and packed by B.G. Enterprises at their 
Taloja MIDC.
TIA is thankful to Pidilite Industries Ltd and B.G.Enterprise for this humble and 
great contribution.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये अडथळा आणणा-यांवर होणार आता दंडात्मक कारवाई

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोव्हीड - 19 चा प्रसार रोखण्यासाठी राज्य साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 ची अंमलबजावणी 13 मार्च 2020 पासून लागू करण्यात आली असून त्यामधील खंड 2, 3 व 4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 अन्वये दि. 14 मार्च 2020 रोजी अधिसूचना काढण्यात आलेली असून नियमावली तयार केलेली आहे. या अधिसूचनेव्दारे महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी महापालिका आयुक्त यांस सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

या अनुषंगाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपाययोजना प्रभावी रितीने करण्यात येत असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रप्रणालीचाही वापर करण्यात येत आहे.

सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी माणसांचा परस्पर संपर्क टाळणे, यासाठी घरातच थांबणे तसेच काही अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर यायचे झाल्यास नाका-तोंडावर तिपदरी मास्क लावणे व सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींग काटेकोरपणे पाळणे हाच प्रभावी उपाय आहे. तथापि अद्यापही काही नागरिकांना या गोष्टींचे गांभीर्य समजले नसल्याचे व त्यांच्या अशा बेजबाबदार वागणुकीमुळे ते त्यांच्या स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याला हानी पोहचविणारे कोरोना विषाणूचे वाहक होऊ शकतात हे समजले नसल्याचे लक्षात येत आहे.

अशाप्रकारे सार्वजनिक आरोग्याला हानी पोहचवित लॉकडाऊनचे नियम न पाळणा-या बेजबाबदार नागरिकांना लॉकडाऊनमागील उद्देश नीट कळावा आणि लॉकडाऊनमधील प्रतिबंध आपल्याच आरोग्याच्या भल्यासाठी आहेत हे व्यवस्थितपणे लक्षात यावे यादृष्टीने साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करीत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांचेमार्फत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आपल्या वर्तनाने अडथळे आणणा-या नागरिकांकडून दंडात्मक वसूली करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यानुसार -

 

* सार्वजनिक स्थळी चेह-यावर मास्क / रूमाल न वापरणे याकरिता साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये रू. 500/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

 

*  रस्ते, बाजार, रूग्णालय, कार्यालय अशा सार्वजनिक स्थळी थुंकणे याकरिता साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये रू. 1000/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

 

* सर्व दुकानदार / फळे / भाजीपाला विक्रेते / सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते आदी व्यापारी तसेच त्याठिकाणी खरेदीसाठी जाणारे ग्राहक यांनी दोन ग्राहकांमध्ये किमान 3 फूट सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सींग) न राखल्यास ग्राहक / व्यक्ती यांचेकडून रू. 200/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

   तसेच सदर आस्थापना मालक / दुकानदार / विक्रेता यांनी सामाजिक अंतर राखले जाईल असे दुकानांसमोर मार्कींग करून घ्यायचे आहे व ग्राहकांना त्याचे पालन करण्यास सांगायचे आहे. ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राखले न गेल्यास अशा आस्थापना मालक/ दुकानदार/ विक्रेत्यांकडून रू. 2000/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

सदर दंड हा पहिल्यांदा आढळल्यास आहे. मात्र अशा प्रकारचा नियमभंग दुस-यांदा केलेला आढळल्यास दुप्पट दंड अथवा फौजदारी कारवाई अथवा दोन्ही अशी कारवाई करण्यात येईल असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त, परिमंडळ 1 आणि 2 असे दोन्ही उपआयुक्त, विभाग कार्यालयांचे कार्यकारी अभियंता, आठही विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, क्षेत्रीय आरोग्य अधिकारी, विभाग कार्यालयांतील सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

तरी सुजाण नवी मुंबई नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये आपापल्या घरातच थांबून संसर्गातून होणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण योगदान द्यावे. अगदी अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर जावयाचे असल्यास घरातील एकाच व्यक्तीने तिपदरी मास्क लावून बाहेर पडावे, सार्वजनिक ठिकाणी परस्परांमध्ये किमान 3 फूट सामजिक अंतर राखण्याचे भान ठेवावे. जास्त काळ बाहेर न रेंगाळता काम झाल्यावर लगेच घरी परत जावे. सातत्याने साबणाने हात धुवावेत.

नवी मुंबई हे आधुनिक शहर म्हणून नावाजले जात असताना सुशिक्षितांचे शहर अशीही नवी मुंबईची वेगळी ओळख आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये आपल्या फिरण्यावर आलेली बंधने ही आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या आरोग्य हितासाठीच आहेत याची नोंद नागरिकांनी घ्यावी आणि नियम तोडून दंडात्मक कारवाई करण्याची वेळ आपल्यावर येऊ देऊ नये असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.     

 

Thursday, April 30, 2020

प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तू पुरवा.....आमदार गणेश नाईक

एखाद्या विभागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यास तो विभाग सील करून प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केला जातो. या विभागातून बाहेर येण्या जाण्यास परवानगी नसते. अशाप्रकारे जाहीर केलेल्या काही प्रतिबंधात्मक विभागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे होत नसल्याच्या तक्रारी पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे या प्रतिबंधात्मक क्षेत्रातील रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते याकरिता भाजीपाला, किराणामाल, दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विनाअडथळा या विभागातून घरोघरी सुरू रहावा याची दक्षता महापालिकेने घ्यावी अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी महापालिकेकडे केली आहे.

खाजगी डॉक्टरांना पीपीई कीट मोफत पुरवा आमदार गणेश नाईक यांची मागणी

नवी मुंबईमध्ये आपापल्या परिसरामध्ये वैद्यकीय उपचाराची सेवा पुरविणारे खाजगी डॉक्टरांनी कोरोनाचा संसर्ग वाढल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून आपले दवाखाने बंद केले होते. ताप, सर्दी खोकला यासारख्या आणि इतर छोट्या-मोठ्या आजारांवर उपचार करून घेण्यासाठी नागरिक या डॉक्टरांकडे जात असतात. इतर आजारांवर उपचार करण्याबरोबरच कोरोना सदृष्य रुग्ण आढळल्यास हे डॉक्टर याची माहिती पुढे महापालिकेला देखील देऊ शकतात. वेळीच कोरोना बाधित असल्याचे निदान झाल्यास संबंधित रुग्णास वेळेवर उपचार मिळून तो लगेच बराही होऊ शकतो. आमदार गणेश नाईक यांनी डॉक्टर आणि त्यांच्या संघटनांबरोबर चर्चा करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. आमदार नाईक यांनी आवाहन केल्यानंतर अनेक डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांची वैद्यकीय उपचाराची गैरसोय दूर होऊ लागली आहे.  परंतु संसर्गाचा धोका पत्करून नागरिकांवर उपचार करणाऱ्या या डॉक्टरांच्या जीविताला देखील धोका संभवतो. त्यामुळे त्यांची सुरक्षितता जपणे अत्यावश्यक आहे. या डॉक्टरांना अधिक आत्मविश्वासपूर्वक वैद्यकीय उपचाराची सेवा करता यावी यासाठी त्यांना महापालिकेने पीपीई  किट,  स्ञानी टायझर  आणि दवाखान्यासाठी स्ञानी टायझर सारख्या सुरक्षा साधनांचा पुरवठा मोफत करावा अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी महापालिकेकडे केलेली आहे.