Thursday, April 30, 2020
खाजगी डॉक्टरांना पीपीई कीट मोफत पुरवा आमदार गणेश नाईक यांची मागणी
नवी मुंबईमध्ये आपापल्या परिसरामध्ये वैद्यकीय उपचाराची सेवा पुरविणारे खाजगी डॉक्टरांनी कोरोनाचा संसर्ग वाढल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून आपले दवाखाने बंद केले होते. ताप, सर्दी खोकला यासारख्या आणि इतर छोट्या-मोठ्या आजारांवर उपचार करून घेण्यासाठी नागरिक या डॉक्टरांकडे जात असतात. इतर आजारांवर उपचार करण्याबरोबरच कोरोना सदृष्य रुग्ण आढळल्यास हे डॉक्टर याची माहिती पुढे महापालिकेला देखील देऊ शकतात. वेळीच कोरोना बाधित असल्याचे निदान झाल्यास संबंधित रुग्णास वेळेवर उपचार मिळून तो लगेच बराही होऊ शकतो. आमदार गणेश नाईक यांनी डॉक्टर आणि त्यांच्या संघटनांबरोबर चर्चा करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. आमदार नाईक यांनी आवाहन केल्यानंतर अनेक डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांची वैद्यकीय उपचाराची गैरसोय दूर होऊ लागली आहे. परंतु संसर्गाचा धोका पत्करून नागरिकांवर उपचार करणाऱ्या या डॉक्टरांच्या जीविताला देखील धोका संभवतो. त्यामुळे त्यांची सुरक्षितता जपणे अत्यावश्यक आहे. या डॉक्टरांना अधिक आत्मविश्वासपूर्वक वैद्यकीय उपचाराची सेवा करता यावी यासाठी त्यांना महापालिकेने पीपीई किट, स्ञानी टायझर आणि दवाखान्यासाठी स्ञानी टायझर सारख्या सुरक्षा साधनांचा पुरवठा मोफत करावा अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी महापालिकेकडे केलेली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment