कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉक डाऊन चा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेला आहे. उद्योग, व्यवसाय आणि रोजगार-स्वयंरोजगार ठप्प झाल्याने विविध शासकीय देयके भरताना नाकीनऊ येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि लघु उद्योजकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने तीन महिन्यांचा मालमत्ता कर आणि पाणी कर माफ करावा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे 28 एप्रिल 2020 रोजी पत्र पाठवून केलेली आहे.
मार्चपासून सुरू झालेल्या लॉक डाऊन मुळे कामगार वर्ग घरी बसला आहे कारखाने बंद आहेत स्वयंरोजगार देखील करता येत नाही. उदरनिर्वाहाची साधने लॉक झाली आहेत. नागरिकांचे आणि विशेषतः लघुउद्योजकांचे उत्पन्न गोठले असून दुसरीकडे शासकीय देयकांचा मोठा भार त्यांच्या डोक्यावर आहे. या संकटकालीन परिस्थितीमध्ये या घटकांना थोडाफार दिलासा देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा अशी सूचना करीत आमदार नाईक यांनी किमान एप्रिल , मे आणि जून या तीन महिन्यांचा निवासी मालमत्तासाठी आणि लघु उद्योजकांसाठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टीकर माफ करावा,अशी आग्रही मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
No comments:
Post a Comment