Thursday, April 30, 2020
प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तू पुरवा.....आमदार गणेश नाईक
एखाद्या विभागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यास तो विभाग सील करून प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केला जातो. या विभागातून बाहेर येण्या जाण्यास परवानगी नसते. अशाप्रकारे जाहीर केलेल्या काही प्रतिबंधात्मक विभागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे होत नसल्याच्या तक्रारी पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे या प्रतिबंधात्मक क्षेत्रातील रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते याकरिता भाजीपाला, किराणामाल, दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विनाअडथळा या विभागातून घरोघरी सुरू रहावा याची दक्षता महापालिकेने घ्यावी अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी महापालिकेकडे केली आहे.
खाजगी डॉक्टरांना पीपीई कीट मोफत पुरवा आमदार गणेश नाईक यांची मागणी
नवी मुंबईमध्ये आपापल्या परिसरामध्ये वैद्यकीय उपचाराची सेवा पुरविणारे खाजगी डॉक्टरांनी कोरोनाचा संसर्ग वाढल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून आपले दवाखाने बंद केले होते. ताप, सर्दी खोकला यासारख्या आणि इतर छोट्या-मोठ्या आजारांवर उपचार करून घेण्यासाठी नागरिक या डॉक्टरांकडे जात असतात. इतर आजारांवर उपचार करण्याबरोबरच कोरोना सदृष्य रुग्ण आढळल्यास हे डॉक्टर याची माहिती पुढे महापालिकेला देखील देऊ शकतात. वेळीच कोरोना बाधित असल्याचे निदान झाल्यास संबंधित रुग्णास वेळेवर उपचार मिळून तो लगेच बराही होऊ शकतो. आमदार गणेश नाईक यांनी डॉक्टर आणि त्यांच्या संघटनांबरोबर चर्चा करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. आमदार नाईक यांनी आवाहन केल्यानंतर अनेक डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांची वैद्यकीय उपचाराची गैरसोय दूर होऊ लागली आहे. परंतु संसर्गाचा धोका पत्करून नागरिकांवर उपचार करणाऱ्या या डॉक्टरांच्या जीविताला देखील धोका संभवतो. त्यामुळे त्यांची सुरक्षितता जपणे अत्यावश्यक आहे. या डॉक्टरांना अधिक आत्मविश्वासपूर्वक वैद्यकीय उपचाराची सेवा करता यावी यासाठी त्यांना महापालिकेने पीपीई किट, स्ञानी टायझर आणि दवाखान्यासाठी स्ञानी टायझर सारख्या सुरक्षा साधनांचा पुरवठा मोफत करावा अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी महापालिकेकडे केलेली आहे.
नागरिक आणि लघु उद्योजकांना तीन महिन्यांचा मालमत्ता कर आणि पाणीकर माफ करावा आमदार गणेश नाईक यांची मागणी
कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉक डाऊन चा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेला आहे. उद्योग, व्यवसाय आणि रोजगार-स्वयंरोजगार ठप्प झाल्याने विविध शासकीय देयके भरताना नाकीनऊ येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि लघु उद्योजकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने तीन महिन्यांचा मालमत्ता कर आणि पाणी कर माफ करावा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे 28 एप्रिल 2020 रोजी पत्र पाठवून केलेली आहे.
मार्चपासून सुरू झालेल्या लॉक डाऊन मुळे कामगार वर्ग घरी बसला आहे कारखाने बंद आहेत स्वयंरोजगार देखील करता येत नाही. उदरनिर्वाहाची साधने लॉक झाली आहेत. नागरिकांचे आणि विशेषतः लघुउद्योजकांचे उत्पन्न गोठले असून दुसरीकडे शासकीय देयकांचा मोठा भार त्यांच्या डोक्यावर आहे. या संकटकालीन परिस्थितीमध्ये या घटकांना थोडाफार दिलासा देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा अशी सूचना करीत आमदार नाईक यांनी किमान एप्रिल , मे आणि जून या तीन महिन्यांचा निवासी मालमत्तासाठी आणि लघु उद्योजकांसाठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टीकर माफ करावा,अशी आग्रही मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
रेशनकार्ड आधार लिंक नसेल तरीही मिळेल धान्यआमदार गणेश नाईक यांच्या मागणीला यश
आमदार गणेश नाईक यांनी मागणी केल्याप्रमाणे नवी मुंबईतील ज्या नागरिकांचे रेशन कार्ड आधार कार्ड बरोबर लिंक नाही त्यांनाही रेशनिंग दुकानांवर अल्पदरात अन्नधान्य मिळणार आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या लोक डाऊन मुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असताना रेशनिंग दुकानांवरील धान्य त्यांच्यासाठी मोठा आधार ठरतो. मात्र रेशनिंग दुकानांवर अन्नधान्य मिळवण्यासाठी रेशनिंग कार्ड आधार लिंक असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात शेकडो नागरिकांचे रेशन कार्ड अद्याप आधार लिंक झालेले नाही त्यामुळे या नागरिकांना रेशनिंग दुकानांवर शिधा मिळत नव्हता. ही अडचण लक्षात घेऊन आमदार गणेश नाईक यांनी कोकण विभागीय आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना 15 एप्रिल 2020 रोजी पत्र पाठवून रेशन कार्ड आधार लिंक असो किंवा नसो सर्वांना रेशनिंग पुरवण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनानेच आता निर्णय घेतला असून ज्यांचे आधार कार्ड रेशन कार्ड बरोबर लिंक नाही त्यांनाही रेशनिंग दुकानांवर अन्नधान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. शासन निर्णयानुसार अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सध्या रेशनिंग दुकानांवर प्रति मानसी दोन किलो तांदूळ आणि तीन किलो गहू दिला जातो आहे.
तांदूळ 3 रुपये किलो आणि गहू 2 रुपये किलो अशा अल्पदरात दिला जातो आहे. केशरी कार्डधारकांसाठी गहू आठ रुपये किलो आणि तांदूळ बारा रुपये किलो ने उपलब्ध आहे
डाळी देखील देण्याचा निर्णय झालेला आहे परंतु अध्याप डाळींचा पुरवठा रेशनिंग दुकानांवर झालेला नाही. डाळींचा पुरवठा लवकरात लवकर करून सर्वसामान्यांना त्याचे वितरण तातडीने करावे अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी केली आहे.
शिधा मिळवण्यासाठी नागरिकांनी त्यांच्यासोबत रेशनिंग कार्ड आणि आधार कार्ड घेऊन रेशनिंग दुकानावर जायचे आहे अशी माहिती शिधावाटप अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Wednesday, April 29, 2020
*A message from Rishi Kapoor’s family*
*A message from Rishi Kapoor’s family*
Our dear Rishi Kapoor passed away peacefully at 8:45am IST in hospital today after a two-year battle with leukemia. The doctors and medical staff at the hospital said he kept them entertained to the last.
He remained jovial and determined to live to the fullest right through two years of treatment across two continents. Family, friends, food and films remained his focus and everyone who met him during this time was amazed at how he did not let his illness get the better of him.
He was grateful for the love of his fans that poured in from the world over. In his passing, they would all understand that he would like to be remembered with a smile and not with tears.
In this hour of personal loss, we also recognise the world is going through a very difficult and troubled time. There are numerous restrictions around movement and gathering in public. We would like to request all his fans and well-wishers and friends of the family to please respect the laws that are in force.
He would not have it any other way.
Corporator Mr Patel distribute Grocery in Khairane Village Navi Mumbai
Welcome move to avoid rush in the markets haji Fakir Mohammad fdn.and social worker, local corporator Mr Munawar Patel in Khairne Village Navi Mumbai on Wednesday April 29 keeps Ramzan Grocery kits for Distribution among faithful ahead holy month of Ramadan
Subscribe to:
Posts (Atom)